Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

मध्यप्रदेशमध्ये अमित शहांच्या कार्यक्रमावरून परतणाऱ्या बसला ट्रकची धडक; 14 जणांचा मृत्यू 50 जखमी

ट्रकने दोन बसला धडक दिली. यातील एक बस पलटी झाली तर दुसऱ्या बसला जोरदार धक्का बसला.

  • By Pravina Shirpurkar
Updated On: Feb 25, 2023 | 08:40 AM
मध्यप्रदेशमध्ये अमित शहांच्या कार्यक्रमावरून परतणाऱ्या बसला ट्रकची धडक;  14 जणांचा मृत्यू 50 जखमी
Follow Us
Close
Follow Us:

सिधी : मध्य प्रदेशातील शुक्रवारी रात्री उशिरा मोठ भीषण अपघात (MP Accident) झाला. सिधी जिल्ह्यात (Sidhi Accident) हा अपघात झाला असुन ट्रकच्या धडकेने तीन बस उलटल्या. या अपघातात 14 जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. तर,  एकूण 50 जण जखमी झाले आहेत. यातील 15-20 जणांची प्रकृती चिंताजनक आहे. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी अपघातानंतर रात्री उशिरा घटनास्थळी आणि रुग्णालयाला भेट दिली. अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांच्या कुटुंबीयांना 10 लाख रुपये, गंभीर जखमींना दोन लाख रुपये आणि किरकोळ जखमींना एक लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. तर, मृतांच्या नातेवाइकांना त्यांच्या गुणवत्तेनुसार सरकारी नोकरी दिली जाईल, असेही ते म्हणाले.

[read_also content=”पुतीन यांना युद्ध पडले महागात ! युक्रेन युद्धाच्या एका वर्षात 9 ट्रिलियन डॉलर्स गमावले; 6300 टँक, 300 लढाऊ विमाने झाली नष्ट https://www.navarashtra.com/world/vladimir-putin-lost-half-of-tanks-pay-heavy-price-in-one-year-war-with-zelensky-ukraine-war-nrka-371984.html”]

 

कुठे झाला अपघात

मिळालेल्या माहितीनुसार, सिधी जिल्ह्यात मोहनिया बोगद्याजवळील बरोखर गावाजवळ हा अपघात झाला. भरधाव वेगात आलेल्या ट्रकचा टायर फुटल्याने बाजूला उभ्या असलेल्या तीन बसेसवर धडकली. त्यानंतर दोन बस उलटल्या, तर तिसऱ्या बसचे मोठे नुकसान झाले. या अपघातात 14 जणांचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे तर, प्रत्यक्षदर्शींच्या मते हा अपघात भीषण असला तरी मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. गंभीर जखमींना रेवा येथे रेफर करण्यात आले आहे.

अमित शहांच्या कार्यक्रमावरून परतत होत्या बस

काल सतना येथे अमित शाह यांचा कार्यक्रम होता. या  कार्यक्रमातून या बस परतत होत्या. सतना येथील कोल जमातीच्या शबरी उत्सवात सहभागी होण्यासाठी सिधी येथुन काही लोक बसने निघाले होते दरम्यान, संध्याकाळी 5.30 वाजता कार्यक्रम संपला, त्यानंतर सर्व बसेस निघाल्या होत्या.

कसा झाला अपघात

सतना येथून रामपूर बघेलान आणि रेवा मार्गे मोहनिया बोगद्यातुन बस जात होत्या. बोगद्यापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या सिधी जिल्ह्यातील चुरहट पोलिस स्टेशन हद्दीतील बरखडा गावाजवळ तीन बस काही काळ थांबल्या होत्या. दरम्यान, मागून येणाऱ्या सिमेंटने भरलेल्या ट्रकने तिन्ही बसेसला धडक दिली. यातील एक बस पलटी झाली तर दुसऱ्या बसला जोरदार धक्का बसला. उलटलेल्या बसमधील काही जण गंभीर जखमी झाले आहेत.

अमित शहा यांनी अपघाताबद्दल व्यक्त केला शोक

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सिधी येथील रस्ता अपघातावर शोक व्यक्त केला आहे. सिधी (M.P.) येथील रस्ता अपघात अत्यंत दुःखद आहे. या दुर्घटनेत ज्यांनी प्राण गमावले त्यांच्या कुटुंबियांप्रती मी मनापासून संवेदना व्यक्त करतो. ईश्वर त्यांना हे दु:ख सहन करण्याची शक्ती देवो. जखमींवर प्रशासनाकडून उपचार सुरू आहेत. जखमींच्या लवकरात लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करुया असं त्यांनी ट्विट केलं.

Web Title: Trucks hit buses returning from amit shahs program in mp 10 people died 35 admitted

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 25, 2023 | 08:24 AM

Topics:  

  • amit shaha

संबंधित बातम्या

श्री लक्ष्मी नारायण मंदिराच्या १५० व्या जयंती उत्सवाचे आयोजन; अमित शाह आणि मुख्यमंत्री फडणवीस यांची उपस्थिती
1

श्री लक्ष्मी नारायण मंदिराच्या १५० व्या जयंती उत्सवाचे आयोजन; अमित शाह आणि मुख्यमंत्री फडणवीस यांची उपस्थिती

Pahalgam Terror Attack: पर्यटकांवर दहशतवादी हल्ला अन् PM मोदींनी सूत्र फिरवली; अमित शहांना फोनवरून थेट…
2

Pahalgam Terror Attack: पर्यटकांवर दहशतवादी हल्ला अन् PM मोदींनी सूत्र फिरवली; अमित शहांना फोनवरून थेट…

भाजप नेते मिथुन चक्रवर्तींनी ममता बॅनर्जींविरुद्ध थोपटले दंड; म्हणाले, “लष्कराला बोलवा अन् राष्ट्रपती…”
3

भाजप नेते मिथुन चक्रवर्तींनी ममता बॅनर्जींविरुद्ध थोपटले दंड; म्हणाले, “लष्कराला बोलवा अन् राष्ट्रपती…”

Devendra Fadnavis: “… तर त्यांचा कडेलोटच केला पाहिजे”; राजधानी रायगडावरून कडाडले मुख्यमंत्री फडणवीस
4

Devendra Fadnavis: “… तर त्यांचा कडेलोटच केला पाहिजे”; राजधानी रायगडावरून कडाडले मुख्यमंत्री फडणवीस

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.