Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कुनो नॅशनल पार्कमध्ये दोन चित्त्यांच्या पिलांचा मृत्यू, आत्तापर्यंत पाच चित्ते पडले मृत्यूमुखी, नक्की असं घडलं तरी काय?

वन विभागाने एक प्रेस नोट जारी करून त्यात म्हटलं आहे की, मादी चित्ता ज्वालाच्या निगराणी पथकाला ती तिच्या पिल्लांसह एका जागी बसलेली आढळली. काही वेळाने तिची दोन पिल्लं मृत्यूमुखी पडल्याचं दिसून आलं.

  • By साधना
Updated On: May 25, 2023 | 07:07 PM
cheetah cubs in kuno

cheetah cubs in kuno

Follow Us
Close
Follow Us:

भोपाळ: मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) कुनो नॅशनल पार्कमध्ये (Kuno National Park) चित्त्यांचे एकापाठोपाठ एक मृत्यू होत आहेत. ज्वाला नावाच्या मादी चित्त्याच्या आणखी दोन पिल्लांचा आज मृत्यू (Two Cheetah Cubs Die) झाला आहे. या घटनेनंतर मरण पावलेल्या चित्त्यांची संख्या पाचावर पोहोचली आहे. यामध्ये आफ्रिकेतून आणलेल्या दोन बिबट्यांचा समावेश आहे. चित्याच्या या पिल्लांचा मृत्यू अशक्तपणामुळे आणि वाढत्या उकाड्यामुळे झाला असल्याचं स्पष्टीकरण वन विभागाने दिलं आहे.

Two more India-born cheetah cubs die at Kuno National Park: forest official — Press Trust of India (@PTI_News) May 25, 2023

वन विभागाने एक प्रेस नोट जारी करून त्यात म्हटलं आहे की, “मादी चित्ता ज्वालाच्या निगराणी पथकाला ती तिच्या पिल्लांसह एका जागी बसलेली आढळली. काही वेळाने तिची दोन पिल्लं मृत्यूमुखी पडल्याचं दिसून आलं. निरीक्षण पथकाने पशुवैद्यकांना कळवलं आणि त्यानंतर ते घटनास्थळी पोहोचले. जन्मापासूनच अशक्त असल्याने अशक्तपणामुळेच पिल्लांचा मृत्यू झाल्याचं दिसत असल्याचं वनविभागाने सांगितलं आहे. चित्ता ज्वालाला सप्टेंबर 2022 मध्ये नामिबियातून मध्य प्रदेशातील कुनो राष्ट्रीय उद्यानात आणण्यात आलं होतं. तिला पूर्वी सिया नावाने ओळखले जायचे. यावर्षी मार्चच्या शेवटच्या आठवड्यात तिने चार पिल्लांना जन्म दिला होता.

भारतातील चित्ता नामशेष घोषित झाल्यानंतर 70 वर्षांनी त्यांचं पुनर्वसन करण्यासाठी ‘प्रोजेक्ट चीता’ कार्यान्वित करण्यात आला. या अंतर्गत दक्षिण आफ्रिकेतील देशांतून दोन तुकड्यांमध्ये चित्ते भारतात आणण्यात आले. नामिबियातील चित्त्यांपैकी एक असलेल्या साशाचा 27 मार्च रोजी मूत्रपिंडाच्या आजारामुळे मृत्यू झाला. दक्षिण आफ्रिकेतून आणलेल्या उदय या चित्त्याचा 23 एप्रिल रोजी मृत्यू झाला. त्याच वेळी दक्षिण आफ्रिकेतून आणलेली दक्षा ही मादी चित्ता जखमी झाली होती, त्यानंतर तिचा मृत्यू झाला. भारतातील वाढतं तापमान हे चित्यांच्या मृत्यूचं कारण असल्याचं सांगण्यात येत आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमात गेल्या वर्षी 17 सप्टेंबर रोजी राष्ट्रीय उद्यानात पाच मादी आणि तीन नरांसह आठ नामिबियाच्या चित्त्यांना सोडण्यात आलं होतं. पुढे मग यावर्षी फेब्रुवारीमध्ये दक्षिण आफ्रिकेतून आणखी 12 चित्ते येथे आणण्यात आले. भारतामध्ये जन्मलेल्या चार पिल्लांसह 24 चित्तांपैकी, कुनो नॅशनल पार्कमध्ये आता 17 प्रौढ आणि तीन पिल्ले आहेत.

Web Title: Two more cheetah cubs died in kuno nationa park nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 25, 2023 | 06:58 PM

Topics:  

  • Cheetah news
  • madhya pradesh
  • national news

संबंधित बातम्या

कफ सिरप की विष! Cough syrup प्यायल्याने ११ निष्पाप मुलांचा मृत्यू, दोन सिरपवर तात्पुरती बंदी
1

कफ सिरप की विष! Cough syrup प्यायल्याने ११ निष्पाप मुलांचा मृत्यू, दोन सिरपवर तात्पुरती बंदी

Rain Update: पाऊस थांबेना! महाराष्ट्रासह १३ राज्यात पावसाचे अलर्ट, अनेक राज्यात कडाडणार वीज
2

Rain Update: पाऊस थांबेना! महाराष्ट्रासह १३ राज्यात पावसाचे अलर्ट, अनेक राज्यात कडाडणार वीज

मोठी बातमी! दुर्गा विसर्जनादरम्यान ट्रॅक्टर ट्रॉली नदीत कोसळली, ११ जणांचा मृत्यू, 3 जण बेपत्ता
3

मोठी बातमी! दुर्गा विसर्जनादरम्यान ट्रॅक्टर ट्रॉली नदीत कोसळली, ११ जणांचा मृत्यू, 3 जण बेपत्ता

Bareilly Violence: बरेलीमध्ये आता भीती कशासाठी? ४८ तासांसाठी इंटरनेट आणि एसएमएस सेवा बंद, योगी सरकारचा मोठा निर्णय
4

Bareilly Violence: बरेलीमध्ये आता भीती कशासाठी? ४८ तासांसाठी इंटरनेट आणि एसएमएस सेवा बंद, योगी सरकारचा मोठा निर्णय

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.