Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • T20 World Cup 2026 |
  • Gold Rate |
  • Marathi News |
  • Marathi News
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Maharashtra Breaking News Updates Today: महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींचे लाईव्ह अपडेट्स एका क्लिकवर

Top Live Stories India- दरवर्षी शिमग्याला कोकणात जाणाऱ्या भाविकांची आणि पर्यटकांची मोठी गर्दी असते. रेल्वे आणि बसच्या वेटिंग लिस्टमुळे होणारी गैरसोय टाळण्यासाठी हा समुद्री मार्ग अत्यंत सोयीचा ठरणार आहे. "

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Feb 21, 2026 | 01:15 PM
LIVE
Maharashtra breaking News Marathi

Maharashtra breaking News Marathi

Follow Us
Close
Follow Us:
  • 21 Feb 2026 01:15 PM (IST)

    21 Feb 2026 01:15 PM (IST)

    दीपाली सय्यदवर कोसळला दु:खाचा डोंगर, जवळच्या व्यक्तीचं निधन

    बिग बॉस मराठीच्या सहाव्या सीझनमध्ये अभिनेत्री दिपाली सय्यद सहभागी झाली आहे.बिग बॉसच्या घरात असलं की, कलाकरांना बाहेरच्या जगात काय चाललंय, अशा कोणत्याच गोष्टीचा थांगपत्ता लागत नाही. दिपाली सय्यदने या सीझनमध्ये पहिली स्पर्धक म्हणून ग्रँड प्रीमियरच्या दिवशी दिमाखात एन्ट्री केली होती. बिग बॉसच्या घरात खेळ खेळत असलेली सदस्य दिपाली सय्यदच्या घरी एक दुर्देवी घटना घडली आहे, पण त्याबद्दल तिला माहितच नाही.

  • 21 Feb 2026 01:05 PM (IST)

    21 Feb 2026 01:05 PM (IST)

    “पत्नीला कानशिलात मारणे क्रूरता नाही…”, उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

    एका कानशिलात मारल्यामुळे उद्ध्वस्त झालेली दोन आयुष्ये आणि तब्बल तीन दशके चाललेला न्यायालयीन लढा, यावर गुजरात उच्च न्यायालयाने गुरुवारी अत्यंत महत्त्वपूर्ण निकाल दिला आहे. “पत्नीला केवळ एकदा कानशिलात मारणे म्हणजे क्रूरता नव्हे,” असे स्पष्ट करत न्यायालयाने पतीला सुनावण्यात आलेली ७ वर्षांची सक्तमजुरीची शिक्षा रद्द केली आहे. न्यायमूर्ती गीता गोपी यांच्या खंडपीठाने हा ऐतिहासिक निकाल देऊन गेल्या ३० वर्षांपासून प्रलंबित असलेल्या या प्रकरणाचा निपटारा केला.

  • 21 Feb 2026 01:00 PM (IST)

    21 Feb 2026 01:00 PM (IST)

    21 जानेवारीपासून बेपत्ता विद्यार्थिनीचा शोध लागला, मात्र अल्पवयीन गरोदर असल्याची धक्कादायक माहिती

    बीड जिल्ह्यात 21 जानेवारीपासून बेपत्ता असलेल्या 12 वीच्या अल्पवयीन विद्यार्थिनीचा पोलिसांनी शोध लावला. वैद्यकीय तपासणीत ती गरोदर असल्याचे उघड झाले. पोलीस ठाणे हद्दीत आरोपी विरुद्ध अपहरण व पॉक्सो अंतर्गत गुन्हा दाखल.

  • 21 Feb 2026 12:55 PM (IST)

    21 Feb 2026 12:55 PM (IST)

    ‘मोदी माझे मित्र, पण…’ ; सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर ट्रम्प यांचा भारताला टॅरिफबाबत मोठा इशारा

    ट्रम्प यांचा टॅरिफ निर्णय अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने बेकायदेशीर ठरवला आहे. परंतु ट्रम्प यांनी कोर्टाचा निर्णय धुडकावून लावत जगावर १०% टॅरिफ लादले आहे. भारतवरील टॅरिफवरही स्पष्टीकरण दिले आहे.

  • 21 Feb 2026 12:50 PM (IST)

    21 Feb 2026 12:50 PM (IST)

    पुन्हा दहशतवादी स्फोटाचा इशारा! लाल किल्ला आणि देशातील प्रमुख मंदिरे दहशतवाद्यांच्या निशाण्यावर

    होळी सणाच्या आधीच राष्ट्रीय राजधानी दिल्लीत मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या नोव्हेंबरमध्ये लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटानंतर, दिल्लीत पुन्हा एकदा संभाव्य स्फोटाची भीती वाढली आहे. गुप्तचर माहितीच्या आधारे, दिल्लीत मोठ्या दहशतवादी हल्ल्याचा इशारा देण्यात आला आहे. सुरक्षा यंत्रणा हाय अलर्टवर आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, लष्कर-ए-तैयबा लाल किल्ला, चांदणी चौक आणि प्रमुख मंदिरांना आयईडी स्फोटांनी लक्ष्य करण्याची योजना आखत आहे.

  • 21 Feb 2026 12:40 PM (IST)

    21 Feb 2026 12:40 PM (IST)

    हॉलिवूडवर शोककळा! ‘यूफोरिया’ फेम अभिनेता Eric Dane यांचे ५३ व्या वर्षी निधन

     हॉलिवूड मनोरंजन सृष्टीतून एक अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारे प्रसिद्ध अभिनेते एरिक डेन (Eric Dane) यांचे वयाच्या ५३ व्या वर्षी निधन झाले. ‘यूफोरिया’ (Euphoria) या गाजलेल्या मालिकेत ‘कॅल जॅकोब्स’ची भूमिका साकारून त्यांनी जागतिक स्तरावर लोकप्रियता मिळवली होती. त्यांच्या निधनामुळे सिनेविश्वात मोठी पोकळी निर्माण झाली असून जगभरातील चाहत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

  • 21 Feb 2026 12:35 PM (IST)

    21 Feb 2026 12:35 PM (IST)

    २,००० वर्षांपूर्वीची प्रेमपत्रे उलगडली; पोम्पेईच्या भिंतींवर सापडला इतिहासाचा अनोखा वारसा

    शेकडो वर्षांपूर्वी ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे उद्धवस्त झालेल्या रोमन शहराच्या भिंतींवर सुमारे २,००० वर्षे जुनी प्रेमपत्रे लिहिलेली आढळली आहेत. हा शोध आधुनिक तंत्रज्ञानाचा परिणाम आहे. ज्या भिंतींवर हे भित्तिचित्र तयार केले गेले होते ते खूप पूर्वी उत्खनन केले गेले होते, परंतु भित्तिचित्रे उलगडणे कठीण होते.

  • 21 Feb 2026 12:30 PM (IST)

    21 Feb 2026 12:30 PM (IST)

    पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विषय समित्यांवर सदस्यांची निवड; रवी लांडगेंकडून अभिनंदन

    पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आज झालेल्या सर्वसाधारण सभेत स्थायी समितीसह विविध पाच महत्त्वाच्या विषय समित्यांवर सदस्यांची अधिकृत निवड करण्यात आली. महापौर रवी लांडगे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या या सभेत पक्षीय बलाबलानुसार सदस्यांच्या नियुक्त्या जाहीर करण्यात आल्या. पिठासीन अधिकारी या नात्याने महापौर रवी लांडगे यांनी या नावांची अधिकृत घोषणा केली.

  • 21 Feb 2026 12:25 PM (IST)

    21 Feb 2026 12:25 PM (IST)

    सरावादरम्यान भारताच्या संघाला मोठा धक्का! मोहम्मद सिराजला झाली दुखापत

    स्टार फास्ट बॉलर मोहम्मद सिराजला सराव करताना दुखापत झाली. सिराज हा टीम इंडियाचा बॅकअप फास्ट बॉलर आहे. त्याची अचानक झालेली दुखापत भारतीय संघाच्या अडचणी वाढवू शकते.

  • 21 Feb 2026 12:20 PM (IST)

    21 Feb 2026 12:20 PM (IST)

    टॉपर्सचा गट एका बाजूला तर दुसऱ्या स्थानाचा दुसरा गट, रंगणार वेगळाच सामन्यांचा रोमांच

    आफ्रिका, वेस्ट इंडिज आणि झिम्बाव्बे या संघाचा समावेश आहे तर दुसऱ्या गटामध्ये इंग्लड, पाकिस्तान, न्यूझींलड आणि श्रीलंका या देशांचा समावेश आहे. सध्या सोशल मिडियावर त्याचबरोबर जगभरामध्ये मोठ्या प्रमाणात चर्चा पाहायला मिळत आहे की पहिल्या गटामध्ये ग्रुप टाॅपर संघाचा समावेश आहे तर दुसऱ्या गटामध्ये एक सामना गमावलेल्या संघाचा समावेश आहे असे का? टाॅपर संघ एकाच गटामध्ये येणे हे काही पहिल्यांदाच झाले नाही, असे याआधी देखील झाले.

  • 21 Feb 2026 12:15 PM (IST)

    21 Feb 2026 12:15 PM (IST)

    बुधवार पेठेतील मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश; बांगलादेशी महिलांना पुण्यात आणणारा सूत्रधार उघड

    पुण्यातील बुधवार पेठेतील मानवी तस्करीच्या मोठ्या रॅकेटचा पुणे पोलिसांनी पर्दाफाश केल्यानंतर आता या बांगलादेशी महिलांना पुण्यात आणले कसे जाते आणि कोण आणते असा प्रश्न निर्माण झाला होता. त्यात पोलिसांनी तपास करत याचा सूत्रधार ‘बाबू भैया’ उर्फ पापा शेख असल्याचे तपासात समोर आले आहे.

  • 21 Feb 2026 12:10 PM (IST)

    21 Feb 2026 12:10 PM (IST)

    गुहागर किनाऱ्यावर शुकशुकाट; नेहमी गर्दीने गजबजलेला समुद्रकिनारा पडला ओस

    दहावी व बारावीच्या बोर्ड परीक्षा सुरू असल्याने गुहागर तालुक्यातील पर्यटनावर परिणाम झाल्याचे चित्र सध्या दिसून येत आहे. नेहमी गर्दीने गजबजलेला समुद्रकिनारा सध्या ओस पडला असून, पर्यटकांची वर्दळ प्रामुख्याने शनिवार-रविवार पुरती मर्यादित राहिल्याचे स्थानिकांकडून सांगितले जात आहे. परीक्षा संपल्यानंतर पुन्हा पर्यटन हंगामाला वेग येईल, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

  • 21 Feb 2026 11:52 AM (IST)

    21 Feb 2026 11:52 AM (IST)

    विकसित भारता’चे स्वप्न होणार साकार! AI मुळे वाढणार जगाचा जीडीपी

    एआयच्या वापरातून जागतिक आर्थिक विकास दरात वाढ होऊ शकते तसेच त्याचा फायदा होऊन ‘विकसित भारता’चे स्वप्न साकार होऊ शकते, असा विश्वास आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या व्यवस्थापकीय संचालक क्रिस्टलिना जॉर्जिएवा यांनी शुक्रवारी व्यक्त केला. दिल्लीतील एआय इम्पॅक्ट समिटमध्ये त्या बोलत होत्या. एआयचा भारतीय अर्थव्यवस्थेवरही सकारात्मक परिणाम होऊ शकतो. जलद आर्थिक विकासासह नव्या नोकऱ्या निर्माण होतील. २०४७ पर्यंत अर्थव्यवस्था ३० अब्ज डॉलरवर नेणे आणि ‘विकसित भारता’चे लक्ष्य गाठणे शक्य असल्याचे क्रिस्टलिना म्हणाल्या.

  • 21 Feb 2026 11:42 AM (IST)

    21 Feb 2026 11:42 AM (IST)

    अंगावर काळे कपडे, मृतदेहाजवळ पिझ्झा आणि…; निर्जन रानात सापडला तरुणीचा मृतदेह

    नाशिक येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एका २५ वर्षीय तरुणीचा मृतदेह निर्जन रानात सापडल्याचे समोर आले आहे. या घटनेने खळबळ उडाली असून परिसरात भीतीचे वातारण आहे. नाशिक-मुंबई महामार्गालगत असलेल्या वाडीवऱ्हे पोलीस ठाण्याच्या हद्दीत सारूळ शिवारात ही घटना घडली.

  • 21 Feb 2026 11:32 AM (IST)

    21 Feb 2026 11:32 AM (IST)

    कुत्र्यांच्या नसबंदीत कोट्यवधींचा भ्रष्टाचार; PCMCमध्ये ‘प्रशासकीय राजवटी’चा बुरखा फाटला

     गेल्या चार वर्षांपासून लोकप्रतिनिधींशिवाय सुरू असलेल्या पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील ‘प्रशासकीय राजवटी’चा बुरखा अखेर पहिल्याच महासभेत फाटला आहे. ‘प्रशासन म्हणजे खाजगी लिमिटेड कंपनी झाली आहे,’ अशा शब्दांत शिवसेनेच्या सुलभा उबाळे यांनी हल्लाबोल केला, तर भाजपच्या राजू मिसाळ यांनी कुत्र्यांच्या नसबंदीतील कोट्यवधींच्या भ्रष्टाचाराचा थेट ‘पुरावा’च सादर केला. या वादळी चर्चेने शहराच्या राजकारणात आणि प्रशासकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. सुलभा उबाळे यांनी प्रशासकीय काळातील पारदर्शकतेवर टोकदार सवाल उपस्थित केले.

  • 21 Feb 2026 11:22 AM (IST)

    21 Feb 2026 11:22 AM (IST)

    द्विपक्षीय सहकार्यापासून उदयोन्मुख तंत्रज्ञानापर्यंत… पंतप्रधानांनी समेटमध्ये साधला

    इंडिया एआय इम्पॅक्ट शिखर परिषदेच्या पाचव्या दिवशी शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जगभरातून आलेल्या नेत्यांशी आणि उद्योग क्षेत्रातील मान्यवरांशी महत्त्वपूर्ण चर्चा केली. हैदराबाद हाऊस येथील बैठकीत पंतप्रधानांनी अँटोनियो गुटेरेस (संयुक्त राष्ट्र), अनुराकुमार दिसानायके (श्रीलंका), नवीनचंद्र रामगुलाम (मॉरिशस), स्लोवाकियाचे राष्ट्रपती पीटर पेलेग्रिनी आणि लीख्टेनस्टाईनचे राजकुमार अलोइस यांच्यासोबत द्विपक्षीय संबंध, भूराजकीय मुद्दे आणि भविष्यातील आव्हानांवर चर्चा केली. यावेळी द्विपक्षीय सहकार्य वाढवणे, उदयोन्मुख तंत्रज्ञान क्षेत्रात भागीदारी मजबूत करणे आणि जागतिक स्तरावर समन्वय वाढवण्यावर भर देण्यात आला. याशिवाय पंतप्रधानांनी १६ एआय आणि डीपटेक स्टार्टअप्सच्या सीईओंशी संवाद साधत विविध क्षेत्रातील नवकल्पनांवर भर दिला.

  • 21 Feb 2026 11:12 AM (IST)

    21 Feb 2026 11:12 AM (IST)

    धक्कादायक! T20 World Cup 2026 मधून बाहेर झाल्यानंतर बांगलादेशचे दोन खेळाडू

    बांगलादेशचे वरिष्ठ सहाय्यक प्रशिक्षक मोहम्मद सलाहुद्दीन यांनी माजी क्रीडा सल्लागार आसिफ नजरुल यांच्यावर जोरदार टीका केली आहे, ज्यांनी असा दावा केला होता की बांगलादेश टी-२० विश्वचषकातून बाहेर पडल्यानंतर दोन क्रिकेटपटू मानसिक कोमात गेले. सुरक्षेच्या कारणास्तव नजरुलने बांगलादेश संघ भारतात न पाठवण्याचा निर्णय घेतला. परिणामी, बांगलादेशला २०२६ च्या टी२० विश्वचषकातून वगळण्यात आले. त्यांच्या जागी स्कॉटलंडला गट क मध्ये ठेवण्यात आले.

  • 21 Feb 2026 11:02 AM (IST)

    21 Feb 2026 11:02 AM (IST)

    सावकारीच्या तगाद्याला कंटाळून २२ वर्षीय तरुणाची आत्महत्या

    बीड जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. सावकारीच्या त्रासामुळे एका तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेनंतर संतप्त नातेवाईकांनी मृतदेहसह पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन करत संबंधित सावकारांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. ही घटना धारूर तालुक्यातील गावंदरा येथे घडली.

  • 21 Feb 2026 10:52 AM (IST)

    21 Feb 2026 10:52 AM (IST)

    संजू सॅमसनचे पुनरागमन निश्चित!

    भारताच्या सराव सत्रातील फोटो समोर येत आहेत, जे पुढील सामन्यासाठी भारताच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये संभाव्य बदल सूचित करतात. संजू सॅमसनचे पुनरागमन होण्याची शक्यता खूप जास्त दिसते. टीम इंडियाने नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये सुपर ८ साठी सराव केला. दरम्यान, संजू सॅमसनने खूप मेहनत घेतली. त्याने विविध प्रकारच्या गोलंदाजी हल्ल्यांचा सामना केला. गेल्या काही सत्रांमध्ये संजूने तितका सराव केला नव्हता, परंतु यावेळी तो पूर्णपणे लक्ष केंद्रित करत असल्याचे दिसून आले.

  • 21 Feb 2026 10:45 AM (IST)

    21 Feb 2026 10:45 AM (IST)

    नायजेरियात मृत्यूचे तांडव!

    पश्चिम आफ्रिका देश नायजेरिया (Nigeria) सध्या दुहेरी संकटाचा सामना करत आहे. एकीकडे अतिरेकी हल्ला तर दुसरीकडे खाणीच विषारी वायूची गळती झाली आहे. ज्यामुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. अतिरेकी हल्ल्यात अनेकांना जीव गमवावा लागला आहे, तर गॅस गळतीमुळे देखील अनेकांच्या कुटुंबावर शोककळा पसरली आहे. या घटनांमध्ये ७१ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे.

  • 21 Feb 2026 10:37 AM (IST)

    21 Feb 2026 10:37 AM (IST)

    भारतात हवाई टॅक्सीची एंट्री

    राजधानी दिल्लीत आयोजित भारत एआय इम्पॅक्ट परिषदेत अनेक नाविन्यपूर्ण बाबींचे दर्शन घडले, एकीकडे गलगोटिया युनिव्हर्सिटीकडून चिनी रोबोट सादर केल्याने गालबोट लागले असले तरी अनेक नाविन्यपूर्ण आणि चांगल्या बाबीही एआय परिषदेत बघायला मिळाल्या, त्याचे मोठे कौतुकही होत आहे. यापैकी एक एआय-चालित हवाई टॅक्सीचे मॉडेल आहे. आनंदाची गोष्ट म्हणजे, भविष्यात भारतात हवाई टॅक्सी सेवा उपलब्ध होऊ शकेल, एवढी क्षमता त्यात आहे.

  • 21 Feb 2026 10:29 AM (IST)

    21 Feb 2026 10:29 AM (IST)

    T20 World Cup 2026 दरम्यान दक्षिण आफ्रिकेने केली संघाची घोषणा!

    केशव महाराज (कर्णधार), ओटिनेल बार्टमन, इथन बॉश, गेराल्ड कोएत्झी, टोनी डी जिओर्गी, कॉनर एस्टरह्युझेन, डायन फॉरेस्टर, जॉर्डन हरमन, रुबिन हरमन, जॉर्ज लिंडे, नकोबानी मोकोएना, एंडिले सिमेलेन, लुथो सिपामला, प्रिनेलन सुब्रेन आणि एस जेसन.

  • 21 Feb 2026 10:20 AM (IST)

    21 Feb 2026 10:20 AM (IST)

    राज्यात मद्यविक्रीत झाली मोठी वाढ

    राज्यातील मद्यविक्रीत मागील वर्षाच्या तुलनेत जोरदार वाढ झाली आहे. १ एप्रिल २०२५ ते ३१ जानेवारी २०२६ या कालावधीत राज्यभर मद्यविक्री २२४९२ कोटी रुपये झाली. ही रक्कम मागील वर्षीच्या १९२५६ कोटींपेक्षा १६.८ टक्के जास्त आहे. यात ठाणे, सोलापूर, धुळे आणि नंदुरबारसारख्या जिल्ह्यांत विक्रीत विशेष वाढ झाली, तर मुंबई उपनगर आणि नागपूर विभागात तुलनेने विक्री कमी राहिली.

  • 21 Feb 2026 10:11 AM (IST)

    21 Feb 2026 10:11 AM (IST)

    जगभरातील देशांवर लादला १०% टॅरिफ

    अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी एक धक्कादायक निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयाने जागतक व्यापाराला हादरवून टाकले आहे. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने ट्रम्प यांचे टॅरिफ बेकायदेशीर ठरवल्याच्या अवघ्या काही तासानंतर एका मोठ्या कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी केली आहे. ट्रम्प यांनी जगभरातील देशांवर १०% जागतिक टॅरिफ लादले आहे. त्यांनी न्यायालयाचा निर्णय धुडकावून संपूर्ण जगाला धक्का दिला आहे.

  • 21 Feb 2026 10:03 AM (IST)

    21 Feb 2026 10:03 AM (IST)

    AI कंटेंटवर आता लेबल अनिवार्य!

    डिजिटल जगात डीपफेक आणि दिशाभूल करणाऱ्या एआय-जनरेटेड कंटेंटचा प्रसार रोखण्यासाठी भारत शासनाने २० फेब्रुवारीपासून नवीन आयटी नियम लागू केले आहेत. इंटरनेटवर डीपफेक आणि एआय-जनरेटेड कंटेंटचा वेगाने होणाऱ्या वाढीच्या पार्श्वभूमीवर, सरकारने कठोर भूमिका स्वीकारली आहे. नवीन नियमांनुसार, कोणत्याही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर कोणताही बेकायदेशीर, दिशाभूल करणारा किंवा अश्लील डीपफेक कंटेंट आढळल्यास, संबंधित कंपनीला अधिकाअधिक ३ तासांच्या आत तो काढून टाकावा लागेल. या नियमांचे पालन न करणाऱ्या कंपन्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असे शासनाने स्पष्ट केले आहे.

  • 21 Feb 2026 09:45 AM (IST)

    21 Feb 2026 09:45 AM (IST)

    T20 विश्वचषकात अपयशी झालेल्या अभिषेक शर्माला मिळाला गुरूमंत्र

    Abhishek Sharma-Gautam Gambhir : भारताच्या संघाने सुपर 8 मध्ये प्रवेश केला आहे, आता विश्वचषकाची सुपर 8 ची लढत आणखी मनोरंजक होणार आहे. त्याचबरोबर सर्व मजबूत लढत संघामध्ये पाहायला मिळणार आहे. भारतीय संघासाठी या विश्वचषकामध्ये चिंतेची बाब म्हणजेच भारतीय संघाचा स्टार सलामीवीर फलंदाज अभिषेक शर्मा खराब फार्ममध्ये आहे. २०२६ च्या टी-२० विश्वचषकात अभिषेक शर्मा आतापर्यंत पूर्णपणे अपयशी ठरला आहे.  त्याने ग्रुप स्टेजमध्ये एकही धाव घेतली नाही आणि त्याच्या तिन्ही सामन्यात तो शून्यावर बाद झाला. सर्वांना त्याच्याकडून मोठ्या खेळीची अपेक्षा होती, परंतु त्याची बॅट आतापर्यंत शांत राहिली आहे.

  • 21 Feb 2026 09:40 AM (IST)

    21 Feb 2026 09:40 AM (IST)

    सुप्रीम कोर्टालाही जुमानलं नाही! ट्रम्प यांचा ‘बदला’; जगभरातील देशांवर लादला १०% टॅरिफ

    Donald Trump Signs Global Tariff Executive : वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प (Donald Trump) यांनी एक धक्कादायक निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयाने जागतक व्यापाराला हादरवून टाकले आहे. अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाने ट्रम्प यांचे टॅरिफ बेकायदेशीर ठरवल्याच्या अवघ्या काही तासानंतर एका मोठ्या कार्यकारी आदेशावर स्वाक्षरी केली आहे. ट्रम्प यांनी जगभरातील देशांवर १०% जागतिक टॅरिफ लादले आहे. त्यांनी न्यायालयाचा निर्णय धुडकावून संपूर्ण जगाला धक्का दिला आहे.

  • 21 Feb 2026 09:35 AM (IST)

    21 Feb 2026 09:35 AM (IST)

    गादीत काय आहे? पोलिसांच्या एका शंकेने उघडकीस आणले हत्याकांड

    छत्रपती संभाजीनगर: शहरातील तिसगाव चौफुली परिसरात पोलिसांनी एका संशयास्पद रिक्षाची तपासणी केली असता, त्यात एका २० वर्षीय तरुणीचा मृतदेह गादीत गुंडाळलेल्या अवस्थेत आढळला. या धक्कादायक प्रकारामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून वाळूज पोलिसांनी याप्रकरणी तरुणीच्या आई-वडिलांना ताब्यात घेतले आहे.

    नेमकं प्रकरण काय?

    काल एक रिक्षा घरातील सामानासह गावाकडे जात असताना तिसगाव चौफुली येथे पोलिसांनी अडवली. रिक्षातील लोकांच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी तपासणी सुरू केली. तेव्हा घरगुती साहित्यासोबतच एका गादीत काहीतरी गुंडाळल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. गादी उघडली असता त्यात एका तरुणीचा मृतदेह आढळल्याने पोलीसही चक्रावून गेले.

  • 21 Feb 2026 09:30 AM (IST)

    21 Feb 2026 09:30 AM (IST)

     सरसंघचालक मोहन भागवत यांचे मेरठमध्ये मोठे वक्तव्य

    मेरठ (उत्तर प्रदेश): राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी शुक्रवारी मेरठ येथे खेळाडूंना संबोधित करताना संघाच्या ध्येयधोरणांबाबत महत्त्वाचे भाष्य केले. "संघाचा उद्देश राजकीय सत्ता मिळवणे नसून, हिंदू समाजाचे संघटन आणि चारित्र्यवान व्यक्तींच्या माध्यमातून देशाला समर्थ करणे हा आहे," असे त्यांनी स्पष्ट केले.

    संवादातील महत्त्वाचे मुद्दे:

    • कुठे झाला कार्यक्रम: मेरठमधील शताब्दी नगरातील 'माधव कुंज' येथे हा कार्यक्रम पार पडला.

    • सहभागी: देश-विदेशातील जवळपास ९५० खेळाडूंनी या संवाद सत्रात सहभाग घेतला होता.

    • संघाची भूमिका: संघ कोणत्याही सत्तास्पर्धेत नाही किंवा कोणाच्या विरोधाच्या भावनेने प्रेरित नाही.

    • मूळ उद्देश: संपूर्ण हिंदू समाजाला संघटित करणे आणि व्यक्ती निर्माण कार्याद्वारे राष्ट्राला मजबूत करणे, हाच संघाचा पाया आहे.

  • 21 Feb 2026 09:25 AM (IST)

    21 Feb 2026 09:25 AM (IST)

    भारताच्या परकीय चलन साठ्याचा नवा विक्रम 

    मुंबई: भारतीय अर्थव्यवस्थेसाठी एक अत्यंत सकारात्मक बातमी समोर आली आहे. देशाच्या परकीय चलन साठ्याने आतापर्यंतचा सर्वकालीन उच्चांक (All-time High) गाठला आहे. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) शुक्रवारी जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, भारताच्या तिजोरीत मोठी वाढ झाली आहे.

    आकडेवारी एका नजरेत:

    • एकूण परकीय चलन साठा: ७२५.७२७ अब्ज डॉलर्स.

    • आठवड्याभरातील वाढ: ८.६६ अब्ज डॉलर्स (१३ फेब्रुवारी रोजी संपलेल्या आठवड्यात).

    • परकीय चलन मालमत्ता (FCA): ३.५५ अब्ज डॉलर्सने वाढून ५७३.६०३ अब्ज डॉलर्सवर.

  • 21 Feb 2026 09:20 AM (IST)

    21 Feb 2026 09:20 AM (IST)

    अभिषेक शर्माला डच्चू मिळणार?  

    मुंबई: भारतीय संघाचा धडाकेबाज सलामीवीर आणि टी-२० रँकिंगमध्ये अव्वल स्थानी असलेला अभिषेक शर्मा सध्या आपल्या खराब फॉर्ममुळे चर्चेत आहे. ग्रुप स्टेजमधील तीन सामन्यांत सलग तीन वेळा शून्यावर बाद झाल्याने, त्याला 'सुपर-८' फेरीतून वगळले जाणार अशा चर्चांना उधाण आले होते. मात्र, टीम इंडियाचे गोलंदाजी प्रशिक्षक मोर्ने मोर्केल यांनी या सर्व चर्चांना पूर्णविराम दिला आहे.

    प्रशिक्षकांचा अभिषेकवर विश्वास

    २२ फेब्रुवारी रोजी दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱ्या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी पत्रकार परिषदेत बोलताना मोर्केल यांनी अभिषेकची पाठराखण केली:

    • संघाबाहेर नाही: "अभिषेक शर्माला संघातून वगळण्याबाबत संघ व्यवस्थापनात कोणतीही चर्चा झालेली नाही."

    • नेट प्रॅक्टिसमध्ये लय: "तो नेट्समध्ये चेंडूवर चांगले प्रहार करत आहे. त्याच्या फलंदाजीची लय पाहून आम्हाला खात्री आहे की तो लवकरच मोठी धावसंख्या उभारेल."

  • 21 Feb 2026 09:15 AM (IST)

    21 Feb 2026 09:15 AM (IST)

    लाचखोर तहसीलदार व्यंकटेश मुंडे एसीबीच्या जाळ्यात 

    बीड (परळी): बीड जिल्ह्यातील परळीचे तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) मोठी कारवाई केली आहे. लाचेची मागणी केल्याप्रकरणी त्यांना ताब्यात घेण्यात आले असून, या कारवाईमुळे महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, या अटकेनंतर काही संतप्त नागरिकांनी तहसील कार्यालयासमोर फटाके फोडून आनंद व्यक्त केला.

    लाच मागण्याची अनोखी पद्धत: 'चिठ्ठी'चा वापर

    मिळालेल्या माहितीनुसार, एका तक्रारदाराला 'सॉल्वन्सी प्रमाणपत्र' हवे होते. हे प्रमाणपत्र देण्यासाठी तहसीलदार मुंडे यांनी सुरुवातीला ५० हजार रुपयांची मागणी केली होती. एसीबीच्या पडताळणी दरम्यान धक्कादायक माहिती समोर आली:

  • 21 Feb 2026 09:10 AM (IST)

    21 Feb 2026 09:10 AM (IST)

    सोलापूर: १० वीच्या परीक्षेत  तब्बल १० 'तोतया' विद्यार्थी  

    सोलापूर: राज्यात आजपासून दहावीच्या (SSC) बोर्ड परीक्षांना सुरुवात झाली आहे. प्रशासनाकडून 'कॉपीमुक्त अभियान' राबवले जात असतानाच, सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढा तालुक्यात एक अत्यंत धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. येथे मराठीच्या पेपरला चक्क १० तोतया विद्यार्थी दुसऱ्याच्या जागी परीक्षा देताना आढळले आहेत.

    कारवाईचा तपशील:

    • कुठे घडला प्रकार: मंगळवेढा तालुक्यातील परीक्षा केंद्रे.

    • कोणी केली कारवाई: परीक्षा केंद्रावरील भरारी पथक आणि केंद्रप्रमुख.

    • शिक्षा: केंद्रप्रमुखांनी दिलेल्या तक्रारीनंतर, पोलिसांनी या सर्व १० तोतया विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल करत कायदेशीर कारवाई केली आहे.

  • 21 Feb 2026 09:05 AM (IST)

    21 Feb 2026 09:05 AM (IST)

    Free Fire Max: ‘हे’ आहेत गेममधील सर्वात बेस्ट Luck Royale ईव्हेंट्स… ईमोट्स आणि स्किनसह जिंका आकर्षक रिवॉर्ड्स

    फ्री फायर मॅक्समध्ये सतत नवीन नवीन इव्हेंट सुरू असतात. या इव्हेंटमध्ये प्लेयर्सना विविध रिवॉर्ड्स जिंकण्याची संधी मिळते. विशेषतः गेममध्ये सुरू होणारे लक रॉयल इव्हेंट प्लेअर्ससाठी खूप फायदेशीर ठरतात. गेममध्ये सुरू होणाऱ्या लक रॉयल इव्हेंटमध्ये प्लेयर्सना अल्ट्रा-एक्सक्लूसिव गेमिंग आइटम जसे गन स्किन, बंडल आणि इमोट क्लेम करण्याची संधी मिळणार आहे. हे रिवॉर्ड्स क्लेम करण्यासाठी प्लेयर्सना अत्यंत कमी डायमंड्स खर्च करावे लागणार आहेत. या गेमिंग आयटम्सच्या मदतीने प्लेअर्सचा अनुभव पूर्वीपेक्षा अधिक चांगला होतो. सध्या गेममध्ये विविध लक रॉयल इव्हेंट सुरू आहेत. या इव्हेंटमध्ये सहभागी होऊन प्लेयर्सना प्रीमियम रिवॉर्ड्स जिंकण्याची संधी मिळते. चला तर मग गेममध्ये सुरु असलेल्या लक रॉयल इव्हेंटबाबत जाणून घेऊया. वाचा सविस्तर- 

  • 21 Feb 2026 08:59 AM (IST)

    21 Feb 2026 08:59 AM (IST)

    ‘लोक काय म्हणतील?’ भीतीतून आईनेच 20 वर्षीय मुलीची केली हत्या

    छत्रपती संभाजीनगर: छत्रपती संभाजीनगर येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. आईनेच आपल्या २० वर्षीय मुलीची हत्या केल्याचे समोर आले आहे. ही घटना वाळूज एमआयडीसी परिसरातील तिसगाव चौफुली येथे घडली. एका रिक्षात तरुणीचा मृतदेह आढळून आला होता. या घटनेने खळबळ उडाली होती. मात्र पोलिसांनी या प्रकरणाचा छडा लावला. मात्र जन्मदात्या आईनेच आपल्या मुलीची हत्या का केली? नेमकं प्रकरण काय आहे? जाणून घ्या. वाचा सविस्तर- 

Maharashtra to World Breaking News:

कोकणातील चाकरमान्यांसाठी शिमग्याच्या (होळी) मुहूर्तावर राज्य सरकारने एक मोठी आनंदाची बातमी दिली आहे. १ मार्चपासून मुंबई ते तळकोकण असा समुद्री प्रवास सुरू होत असून, यामुळे प्रवाशांचा वेळ आणि श्रम दोन्ही वाचणार आहेत.

महत्त्वाचे मुद्दे आणि वेळापत्रक:

  • सेवेचा प्रारंभ: १ मार्च २०२६ पासून.
  • मार्ग: ‘भाऊचा धक्का’ (मुंबई) ते विजयदुर्ग.
  • प्रवासाचा कालावधी: अवघ्या ७ तासांत मुंबईहून विजयदुर्ग गाठणे शक्य.
  • नियोजन: एम टू एम (M2M) फेरीतर्फे या प्रवासाचे नियोजन करण्यात आले आहे

Web Title: Maharashtra breaking news 21th february live udates in marathi maharashtra national international politics war gold sliver rates cricket sports crime share market live updates

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 21, 2026 | 08:57 AM

Topics:  

  • international news
  • Maharashtra Breaking News update
  • Maharashtra Politics
  • national news

संबंधित बातम्या

Nitesh Rane : मराठा सांस्कृतिक भवनाचे ‘या’ दिवशी उद्घाटन; मंत्री नितेश राणे यांची मोठी घोषणा
1

Nitesh Rane : मराठा सांस्कृतिक भवनाचे ‘या’ दिवशी उद्घाटन; मंत्री नितेश राणे यांची मोठी घोषणा

डोनाल्ड ट्रम्पने दाखवली उदारता! Board of Peace ने केली गाझासाठी 10 अब्ज डॉलर्सच्या मदतीची घोषणा
2

डोनाल्ड ट्रम्पने दाखवली उदारता! Board of Peace ने केली गाझासाठी 10 अब्ज डॉलर्सच्या मदतीची घोषणा

Oceanographic Research 2026: धोक्याची घंटा! हिंद महासागरात वाहतेय गोडे पाणी, शास्त्रज्ञ चिंतेत
3

Oceanographic Research 2026: धोक्याची घंटा! हिंद महासागरात वाहतेय गोडे पाणी, शास्त्रज्ञ चिंतेत

Maharashtra Politics : राजकारणात कायमस्वरुपी काहीही नसतं…; राज ठाकरेंच्या सूचित वक्तव्याने चर्चांना उधाण
4

Maharashtra Politics : राजकारणात कायमस्वरुपी काहीही नसतं…; राज ठाकरेंच्या सूचित वक्तव्याने चर्चांना उधाण

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.