
Maharashtra breaking News Marathi
नाशिक: शहरातील वाहतूक शिस्त सुधारण्यासाठी नाशिक पोलीस आणि स्मार्ट सिटी प्रशासनाने मोठे पाऊल उचलले आहे. नाशिक शहरातील प्रमुख ४० वाहतूक सिग्नलवरील सीसीटीव्ही कॅमेरे आज (दि. २० फेब्रुवारी) पासून पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होत आहेत. त्यामुळे आता वाहतूक नियम मोडणाऱ्यांवर ‘तिसऱ्या डोळ्या’ची करडी नजर राहणार असून, दंडाचा मेस्क थेट वाहनधारकांच्या मोबाईलवर धडकणार आहे. या नियमांच्या उल्लंघनावर होणार कारवाई: नव्याने कार्यान्वित झालेल्या या यंत्रणेद्वारे खालील प्रकारच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर ई-चलन (E-Challan) फाडले जाणार आहे
20 Feb 2026 07:01 PM (IST)
नवी दिल्लीतील सर्वोच्च न्यायालयात नोकरी मिळवण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करण्याची ही एक उत्तम संधी आहे. अलीकडेच, सर्वोच्च न्यायालयाने आणखी एक नवीन भरती मोहीम जाहीर केली आहे, ज्यामध्ये सहाय्यक संपादक, सहाय्यक संचालक, वरिष्ठ न्यायालय सहाय्यक आणि सहाय्यक ग्रंथपाल अशा पदांवर भरती केली जाईल. सर्वोच्च न्यायालयाच्या नोकरीत रस असलेले उमेदवार अर्ज करू शकतात. अर्ज करण्याची वेळ २३ फेब्रुवारी २०२६ रोजी उघडेल.
20 Feb 2026 06:50 PM (IST)
Australia vs Oman, T20 World Cup 2026 : आज टी-२० विश्वचषक २०२६ च्या गट-टप्प्याचा शेवटचा ४० वा सामना ऑस्ट्रेलिया आणि ओमान या संघात खेळला जात आहे. पल्लेकेले येथील आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या जाणाऱ्या या सामन्यात ऑस्ट्रेलिया संघाने टॉस जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. तर ओमान संघ प्रथम फलंदाजी करताना दिसणार आहे.
20 Feb 2026 06:36 PM (IST)
Nanded News: नांदेड : राज्यामध्ये बोर्डाच्या परिक्षा सुरु झाल्या आहेत. मागील आठवड्यात बारावीच्या तर आजपासून दहावीच्या परिक्षा सुरु झाल्या आहेत. यामध्ये नांदेडमध्ये अत्यंत हृदयस्पर्शी घटना घडली आहे. विद्यार्थी जीवनातील महत्वाचा टप्पा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बारावी बोर्डाच्या परीक्षेला (HSC Exam) मंगळवारपासून (दि.१०) सुरुवात झाली आहे. नांदेड येथील पीपल्स महाविद्यालयात बारावी बोर्ड परीक्षा शांततेत व सुरळीत सुरू आहे. केंद्रावर एकूण ८६१ परीक्षार्थी आहेत. प्रशासनाच्या वतीने परीक्षा केंद्रांवर बैठे पथकांमार्फत झूम वेबकास्टद्वारे संपूर्ण वेळ परीक्षेचे नियंत्रण ठेवण्यात येत आहे. परीक्षेतील गैरप्रकार टाळण्यासाठी भरारी पथके बैठकी पथके नेमण्यात आली आहेत. परीक्षा केंद्र परिसरात अनुचित प्रकार घडू नये, यासाठी विशेष उपाययोजना केल्या असून आवश्यक ती दक्षता घेण्यात येत आहे. (Nanded News)
20 Feb 2026 06:27 PM (IST)
US on Russian oil: जागतिक राजकारणात भारताने शुक्रवारी एक अत्यंत महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे. अमेरिकेच्या नेतृत्वाखालील ‘पॅक्स सिलिका’ (Pax Silica) या धोरणात्मक आघाडीत भारत अधिकृतपणे सामील झाला आहे. या ऐतिहासिक करारानंतर भारतातील अमेरिकन राजदूत सर्जियो गोर यांनी व्यापारी करार आणि रशियन तेलाच्या मुद्द्यावर मोठं भाष्य केलं. या दौऱ्यात अमेरिकन राजदूत सर्जियो गोर यांनी ट्रेड डील आणि रुसी तेल यांच्यावरही महत्त्वपूर्ण भाष्य केलं.
20 Feb 2026 06:14 PM (IST)
Nitesh Rane News : कणकवली : राज्य शासनाच्या माध्यमातून कणकवलीत मराठा सांस्कृतिक भवन उभारले जात आहे. या भवनाच्या माध्यमातून सिंधुदुर्गातील सांस्कृतिक चळवळीला हक्काचे व्यासपीठ मिळणार आहे. (Maharashtra News) राणे कुटुंबाचा शब्द म्हणजे बंदुकीतील गोळी असते, तो कधीही चुकत नाही. आज या वास्तूचे भूमिपूजन झाले असून पुढील वर्षी १९ फेब्रुवारी २०२७ रोजी मुख्यमंत्री आणि खासदार नारायण राणे यांच्या उपस्थितीत या वास्तूचे दिमाखात उद्घाटन होईल, असा विश्वास पालकमंत्री नितेश राणे (Nitesh Rane) यांनी व्यक्त केला.
20 Feb 2026 06:05 PM (IST)
Jonathan Trott bids farewell to Afghanistan cricket : अफगाणिस्तान संघाचे टी-२० विश्वचषक २०२६ मधील आव्हान संपुष्टात आले आहे. या दरम्यान, त्यांचा मुख्य प्रशिक्षक जोनाथन ट्रॉट जो गेल्या चार वर्षांपासून अफगाणिस्तान टीमसोबत आहे, त्याने संघाला अलविदा म्हटले आहे. अफगाणिस्तान क्रिकेट संघाला निरोप देताना इंग्लंडचा माजी आंतरराष्ट्रीय खेळाडू जोनाथन ट्रॉट भावुक झाला आहे. चार वर्षांच्या यशस्वी आणि भावनिक कार्यकाळानंतर ट्रॉटने आपल्या भूमिकेतून निरोप घेतला. ट्रॉटने आपल्या कार्यकाळात संघाची वैयक्तिक आणि व्यावसायिक वाढ पाहिल्याबद्दल विशेष अभिमान देखील व्यक्त केला.
20 Feb 2026 05:55 PM (IST)
ओतूर (ता. जुन्नर) वनपरिक्षेत्रात बिबट्यांच्या वावरामुळे स्थानिक नागरीकांसह शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली आहे. मंगळवारी रात्री ओतूरजवळील गाढवपट भागात वनविभागाने बसवलेल्या पिंजऱ्यात दीड वर्ष वयाची बिबट मादी जेरबंद झाली. वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी या बिबट्याला ताब्यात घेत सुरक्षित ठिकाणी हलवून त्याची वैद्यकीय तपासणी सुरू केली आहे. वनविभागाच्या आकडेवारीनुसार, गेल्या नोव्हेंबर महिन्यापासून या परिसरात राबवण्यात आलेल्या विशेष मोहिमेत आतापर्यंत एकूण १४ बिबटे पकडण्यात आले आहेत. यामध्ये मादी, नर व बछड्यांचा समावेश आहे. तरीही या भागातील बिबट्यांची संख्या कमी होताना दिसत नाही, ज्यामुळे वनविभागासमोर मोठे आव्हान उभे आहे.
20 Feb 2026 05:50 PM (IST)
भारतातातील इलेक्ट्रिक मोबिलिटीला मुख्य प्रवाहात आणण्याच्या उद्देशाने टाटा.इव्हीने आपल्या लोकप्रिय पंच.इव्हीचे नवीन रूप अधिक आकर्षक किंमत आणि सुधारित फीचर्ससह सादर केले आहे. 355 किमीची रिअल-वर्ल्ड रेंज, फास्ट चार्जिंग आणि लाइफटाइम एचव्ही बॅटरी वॉरंटी ही या मॉडेलची प्रमुख फीचर्स आहेत.
20 Feb 2026 05:08 PM (IST)
बदलती जीवनशैली, उशिरा होणारे विवाह, करिअरचा वाढता ताण आणि विविध वैद्यकीय कारणांमुळे शहरात गर्भपातांचे प्रमाण चिंताजनकरीत्या वाढत असल्याचे चित्र समोर आले आहे. शासकीय रुग्णालयांच्या आकडेवारीनुसार एप्रिल २०२५ ते जानेवारी २०२६ या दहा महिन्यांच्या कालावधीत तब्बल १६९१ गर्भपातांची नोंद झाली आहे. जिवंत जन्मांच्या तुलनेत हैं प्रमाण लक्षणीय असून साधारण १० बालकांच्या जन्मामागे एक गर्भपात होत असल्याचे दिसून येते. ही स्थिती महिलांच्या आरोग्याबाबत तसेच य भविष्यातील लोकसंख्यात्मक संतुलनाबाबत गंभीर प्रश्न निर्माण करणारी आहे. जिल्हा आरोग्य विभागाने दिलेल्या म माहितीनुसार गर्भातील जन्मजात विकृती, उच्च रक्तदाब व प्री-एक्लॉर्मप्सया, मधुमेहामुळे उद्भवणाऱ्या गुंतागुंती, गर्भाची वाढ न होणे, गर्भाशयातील संसर्ग आदी वैद्यकीय कारणांमुळे गर्भपात करावे लागत आहेत.
20 Feb 2026 04:50 PM (IST)
नालासोपारा येथील प्रगती नगर ओस्वाल नगरी परिसरात तरुण आणि तरुणी दंगामस्ती करत असल्याचे राकेश सिंग यांनी पाहिले त्यांनी त्यांना अटकल्याने त्यांच्या नातेवाईकांना फोन करून जमाव बोलवला आणि राकेश सिंग यांना मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. याप्रकरणी तुळींज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
20 Feb 2026 04:45 PM (IST)
बेलापूर विधानसभेच्या आमदार मंदा म्हात्रे यांनी बेलापूर येथे सुपर स्पेशालिटी रुग्णालय आणि मेडिकल कॉलेज यासाठी प्रयत्न केले. मात्र आता यावर नवी मुंबईतील खेळाडू आणि नागरिकांनी आक्षेप घेतला असून मैदान वाचवा म्हणून थेट महापालिकेवर धडक मोर्चा आणला आहे. या मोर्च्याला मोठ्या संख्येने नागरिक आणि खेळाडू या ठिकाणी जमून मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी सुरु असून मैदान वाचवा असे फलक घेऊन आंदोलक या ठिकाणी जमले आहेत. आमचा विरोध हा रुग्णालयाला नसून ज्या जागेवर होतंय त्याला विरोध आहे. तसेच सदरचा रुग्णालयाचा प्रकल्प हा इतरत्र हलवण्याची देखील मागणी यावेळी आंदोलकांनी केलीय... आता यावर पालिका कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
20 Feb 2026 04:40 PM (IST)
अजित दादांचा दुर्दैवी अपघात झाला आहे याची माहिती 28 तारखेपर्यंत येण्याची शक्यता आहे. अपघाती घात यासंदर्भात तो जो अहवाल येईल त्यानंतर भाष्य करण योग्य राहील. अनेकांनी अनेक आरोप केले आहेत अनेकांच्या अनेक शंका आहेत, या संकेचे निरसन तो अहवाल प्राप्त झाल्यानंतरच होईल.रोहित पवार यांच्या जीवितवाला धोका असेल तर त्यांनी सुद्धा मागणी केली पाहिजे परंतु ही मागणी मान्य करण्यासाठी शासनातर्फे कमिटी नियुक्ती केलेली असते ती कमिटी त्यावर निर्णय घेते.त्यांच्या यंत्रणेमार्फत जर त्यांना असं वाटलं त्यांच्या जीवाला धोका आहे तर निश्चित त्यांना हे संरक्षण दिलं जाईल.हे संरक्षण देण्यामध्ये कुणाचाही काही विरोध असण्याचे कारण नाही.
20 Feb 2026 04:35 PM (IST)
खेळाच्या मैदानावर नियोजित असलेले सुपर स्पेशालिटी रुग्णालय इतरत्र हलवण्याची मागणी स्थानिक नागरिक आणि खेळाडूंनी केली आहे. या मागणीसाठी महापालिकेवर मोर्चा काढण्यात आला आहे. मैदान वाचवा अशा आशयाचे फलक घेऊन नागरिकांनी जोरदार घोषणाबाजी केली.
20 Feb 2026 04:30 PM (IST)
मावळ तालुक्यातील शेतकऱ्यांच्या प्रलंबित प्रश्नांनी आता टोक गाठले असून येत्या ५ मार्च रोजी वडगाव मावळ येथे भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. कर्जमाफी, शेतीपूरक व्यवसायासाठी सुलभ धोरण, धरणग्रस्तांचे प्रश्न, गावठाण हक्क आणि पांदण रस्ते या मागण्यांसह इंद्रायणी नदी खोलीकरणाचा मुद्दा यावेळी आक्रमकपणे मांडला जाणार आहे. दरवर्षी पूरस्थितीमुळे शेतजमिनींचे होणारे नुकसान थांबवण्यासाठी १२ ते १३ गावांना दिलासा देणारे नदी खोलीकरण तातडीने करावे, अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे. शासनाने ३० जूनपर्यंत सरसकट कर्जमाफी जाहीर करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा शेतकरी संघाने दिलाय.
20 Feb 2026 04:25 PM (IST)
काँग्रेसकडून विशाल देवकुळे यांच नाव येणं गरजेचं होत..मात्र आमदार सतेज पाटील व वरीष्ठांशी बोलून त्यांची नाराजी दूर करू , सुनील मोदी कोल्हापूरात शिवसेना ठाकरे गटाचे शहराध्यक्ष सुनील मोदी यांची आज महापालिकेच्या स्विकृत नगरसेवक पदी नियुक्ती झाल्यानंतर शिवसैनिक चांगलेच आक्रमक झालेतं.. सुनील मोदींच्या स्विकृत नगरसेवक पदावरून शिवसेना ठाकरे गटात जोरदार हमरीतुमरी झाली.शिवाय शिवसैनिकांनी सुनील मोदींच्या घरासमोर जोरदार राडा करत त्यांना जाब विचारला.कोल्हापूर महानगरपालिकेच्या आजच्या झालेल्या सर्वसाधारण सभेत सुनील मोदी यांच्या स्वीकृत सदस्य पदावर शिक्कामोर्तब करण्यात आला..एकीकडं स्वीकृत नगरसेवक झाल्याचा आनंद व्यक्त करत मोदी हे गुलालात असताना.. आक्रमक शिवसैनिकांनी त्यांना चांगलाच जाब विचारलाय.दरम्यान विशाल देवकुळे यांच काँग्रेसमधून नाव येणं गरजेचं होतं..मात्र तसं झालं.. त्यामुळे ते नाराज झाले आहेत. मात्र आमदार सतेज पाटील आणि वरिष्ठांशी याबाबतीत बोलून त्यांची नाराजी दूर करु.शिवाय शिवसैनिकांवर अन्याय होणार नाही याची खबरदारी घेवू असं सुनील मोदी यांनी म्हटलं आहे.
20 Feb 2026 04:20 PM (IST)
दिव्यांग क्षेत्रातील शाळांमधून अतिरिक्त झालेल्या शिक्षक कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. राज्यात अशा कर्मचाऱ्यांची संख्या हजारोंमध्ये आहे, लातूर जिल्ह्यात 132 कर्मचारी अतिरिक्त झाले आहेत,समायोजन करायचे दूरच ,मात्र त्यांना गेल्या चार महिन्यांपासून वेतन नसल्याने अडचण निर्माण झाली आहे. समायोजन नाही आणि वेतन देखील नाही ,त्यामुळे हे शिक्षक कर्मचारी जिल्हा परिषदेच्या दारात आंदोलनाला बसले आहेत.
20 Feb 2026 04:15 PM (IST)
नालासोपारा रेल्वे स्थानकावरून दररोज साडेचार लाखांहून अधिक प्रवाशी लोकल प्रवास करत असतात. लोकलच्या कमी फेऱ्या, अस्वच्छता यासह इतर समस्यांनी लोकल प्रवाशी त्रस्त आहेत.
20 Feb 2026 03:55 PM (IST)
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांची टी२० मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील पहिला सामाना भारताने आपल्या नावावर केला आहे. तर १९ फेब्रुवारी कॅनबेरा येथे खेळवण्यात आलेल्या सामन्यात दुसऱ्या ऑस्ट्रेलिया महिला संघाने भारतीय महिला संघाचा १९ धावांनी पराभव केला. या विजयाने ऑस्ट्रेलियाने मालिकेत १-१ अशी बरोबरी साधली. जॉर्जिया वोल (८८) आणि बेथ मुनी (४६) यांच्या १२८ धावांच्या विक्रमी सलामी भागीदारीमुळे, ऑस्ट्रेलियन महिला संघाने १६३ धावा उभ्या केल्या. तर प्रतिउत्तरात भारतीय संघ १४४ धावा करू शकला.
20 Feb 2026 03:50 PM (IST)
शाहिद कपूरच्या बहुप्रतिक्षित “कॉकटेल २” चित्रपटाचे शूटिंग पूर्ण झाले आहे. तो रश्मिका मंदान्ना आणि कृती सेनन यांच्यासोबत मुख्य भूमिकेत दिसणार आहे. शूटिंग पूर्ण झाल्यानंतर, कृतीने अनेक फोटो शेअर केले आणि निर्माते आणि क्रूचे आभार व्यक्त करताना एक पोस्ट लिहिली. हा चित्रपट २०१२ च्या ब्लॉकबस्टर “कॉकटेल” चा सिक्वेल आहे, ज्यामध्ये दीपिका पदुकोण, डायना पेंटी आणि सैफ अली खान यांनी अभिनय केला होता. परंतु प्रत्येकजण “कॉकटेल २” ची आतुरतेने वाट पाहत असताना, चित्रपटाच्या कथेबद्दल काही तपशील लीक झाले आहेत.
20 Feb 2026 03:40 PM (IST)
भिवंडीच्या महापौरपदाच्या निवडणुकीत भाजपचा उमेदवार पराभूत झाला आहे. धर्मनिरपेक्ष आघाडीचे नारायण चौधरी महापौरपदी निवडून आले आहेत. त्यांना ४८ मते मिळाली आहेत. भिवंडी निजामपूर महानगरपालिकेत भारतीय जनता पक्षाला (भाजप) मोठा धक्का बसला आहे. महानगरपालिका निवडणुकीच्या अगदी आधी झालेल्या महापौरपदाच्या शर्यतीत विरोधी गटाला पाठिंबा देत त्यांच्या नऊ नगरसेवकांनी काँग्रेसच्या नेतृत्वाखालील आघाडीला पाठिंबा दिला आहे.
20 Feb 2026 03:35 PM (IST)
राज्यामध्ये नुकत्याच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका झाल्या आहेत. यामध्ये ठाकरे बंधूंच्या युतीला मोठा फटका बसला. मुंबई महापालिकेसाठी एकत्र आलेल्या ठाकरे बंधूंना मुंबईकरांनी पाठ दाखवली (Maharashtra Politics) बीएमसीवरील 25 वर्षांची ठाकरेंची सत्ता गेली असून यामुळे राजकीय समीकरणे बदलली आहेत. दरम्यान, राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी मुंबईतील रंगशारदा सभागृहात मनसेच्या राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला. यावेळी त्यांनी सूचक वक्तव्यं केली असून पदाधिकाऱ्यांना सूचना दिल्या आहेत.
20 Feb 2026 03:30 PM (IST)
फेब्रुवारी महिना ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून खूप खास आहे. पंचांगानुसार, सोमवार, 23 फेब्रुवारी रोजी सकाळी 7.27 वाजता मंगळ कुंभ राशीमध्ये प्रवेश करणार आहे. सध्या, शुक्र आणि बुध आधीच कुंभ राशीत आहेत. मंगळ आणि शुक्राच्या युतीमुळे दुर्मिळ धनशक्ती राज योग तयार होणार आहे. ज्योतिषशास्त्रात, मंगळ हा धैर्य, ऊर्जा आणि भूमीचा कारक मानला जातो, तर शुक्र हा संपत्ती, समृद्धी आणि आरामाचे प्रतीक आहे. या दोन्ही ग्रहांचे एकत्र येणे आर्थिक समृद्धी आणि करिअरमध्ये प्रगती दर्शवते. धनशक्ती योगाचा कोणत्या राशीच्या लोकांना फायदा होणार आहे ते जाणून घ्या
20 Feb 2026 03:20 PM (IST)
शिवसेनेचे आमदार आणि मंत्री संजय शिरसाट यांनी आज छत्रपती संभाजीनगरमध्ये पत्रकार परिषदेला संबोधित केले. यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा विमान अपघात, रोहित पवार, गणेश नाईक आणि राज्यातील अनेक विविध विषयांवर संवाद साधला. या पत्रकार परिषदेत त्यांनी कोणकोणते मुद्दे मांडले ते जाणून घेऊयात.
20 Feb 2026 03:18 PM (IST)
महिलांना मासिक पाळीच्या विविध समस्यांना तोंड द्यावे लागते, जसे की अनियमित मासिक पाळी, जास्त रक्तस्त्राव किंवा हलका प्रवाह. अलिकडेच, एक महिला प्रजनन तज्ज्ञ डॉ. आशिता जैन यांच्याकडे अशाच प्रकारच्या मासिक पाळीच्या समस्येने आली. रूग्णाने सांगितले की तिच्या २२ व्या वर्षी मासिक पाळी थांबली होती. यामुळे तिला गर्भधारणेबद्दल काळजी वाटू लागली. परिस्थिती तपासल्यानंतर, डॉ. आशिता यांनी स्पष्ट केले की हे तिच्या अंडाशयातील साठ्यात लक्षणीय घट झाल्यामुळे ही परिस्थिती उद्भवली आहे. डॉक्टरांनी सविस्तरपणे आणखी काय म्हटले? चला जाणून घेऊया.
20 Feb 2026 02:55 PM (IST)
टेक जायंट कंपनी गुगल पुन्हा एकदा एका नव्या धमाक्यासाठी सज्ज झाली आहे. गुगलने त्यांच्या एआय असिस्टेंटचे लेटेस्ट जेमिनी 3.1 प्रो मॉडेल लाँच केले आहे. या अपडेटसोबतच गूगलचे फ्लॅगशिप एआय मॉडल रिजनिंगमध्ये पूर्वीपेक्षा जास्त शार्प झाले आहे. यासोबतच एआय मॉडेल आता गुंतागुंतीच्या समस्या आणि मल्टी-स्टेप टास्क चांगल्या प्रकारे हाताळू शकणार आहे. हे मॉडेल कंपनीने जेमिनी अॅप, नोटबूकएलएम आणि डेवलपर प्लेटफॉर्म जसे गुगल एआय स्टुडिओ, व्हर्टेक्स एआय आणि अँटीग्रॅव्हिटीसाठी रोलआऊट केलं आहे.
20 Feb 2026 02:50 PM (IST)
‘धुरंधर’मधील भूमिकेमुळे चर्चेत असलेला अभिनेता रणवीर सिंग सध्या एका गंभीर प्रकरणामुळे पुन्हा एकदा चर्चेच्या मध्यस्थानी आला आहे. लॉरेन्स बिश्नोई टोळीशी संबंधित असल्याचा संशय असलेल्या व्यक्तीकडून अभिनेत्याला १० कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या धमकीनंतर मुंबई पोलिसांनी सतर्कता वाढवली असून संपूर्ण प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे.
20 Feb 2026 02:45 PM (IST)
अफगाणिस्तानचा शेवटचा सामना कॅनडाविरूद्ध पार पडला, या सामन्यामध्ये अफगाणिस्तानच्या संघाने ऐतिहासिक विजय नावावर केला. अफगाणिस्तानच्या संघाने त्याच्या शेवटच्या लीग सामन्यामध्ये 82 धावांनी विजय मिळवला आणि त्यांचे कोच जोनाथन ट्रॉट यांना अलविदा केला. भारतात १९ फेब्रुवारी रोजी रमजानची सुरुवात झाली, त्याच दिवशी २०२६ च्या टी-२० विश्वचषकात चेन्नईतील एमए चिदंबरम स्टेडियमवर अफगाणिस्तान आणि कॅनडा यांच्यात सामना झाला होता. इस्लामिक कॅलेंडरच्या पवित्र महिन्यातील एक खास क्षण इतिहासात कोरला गेला, ज्याचे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात कौतुक झाले.
20 Feb 2026 02:40 PM (IST)
टेक कंपनी सॅमसंग लवकरच त्यांची नवीन गॅलेक्सी एस 26 सिरीज लाँच करणार आहे. या सिरीजची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. कंपनीने या स्मार्टफोन सिरीजच्या लाँचिंगसाठी ईव्हेंट देखील आयोजित केला आहे. सॅमसंगच्या आगामी सिरीजची यूजर्स वाट पाहत असतानाच आता एक मोठी अपडेट समोर आली आहे. स्मार्टफोन सिरीजच्या अधिकृत लाँचिंगपूर्वीच या सिरीजमधील हाय एंड डिव्हाईस गॅलेक्सी एस 26 अल्ट्राच्या नावाने एक क्लोन फोन मार्केटमध्ये दाखल झाला आहे. हे कंपनीचे अधिकृत डिव्हाईस नाही तर एक क्लोन फोन आहे. या क्लोन फोनची किंमत सुमारे 72 डॉलर म्हणजेच 6,500 रुपये असल्याचे सांगितले जात आहे. याचा एक व्हिडीओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवर चांगलाच व्हायरल झाला आहे.
20 Feb 2026 02:35 PM (IST)
टीव्हीवरील सर्वात मोठा रिअॅलिटी शो, “द ५०” सध्या चर्चेत आहे. या शोमध्ये दररोज ट्विस्ट आणि वळणे येत आहेत. आता हा शो अंतिम टप्प्यात पोहोचला आहे. स्पर्धक अंतिम फेरीत स्थान मिळवण्यासाठी कठोर परिश्रम करत आहेत. विजेत्याची घोषणा आता झाली आहे. अहवालानुसार, हा ट्रॉफी “बिग बॉस” च्या माजी स्पर्धकाला मिळणार आहे. मात्र निर्मात्यांनी अद्याप या विषयावर अधिकृत विधान जारी केलेले नाही. कोणत्या स्पर्धकाचे विजेते म्हणून नाव देण्यात आले आहे ते आम्ही तुम्हाला सांगतो.
20 Feb 2026 02:25 PM (IST)
Iran fighter jet crash : इराण आणि अमेरिका यांच्यातील संबंध हे जागतिक राजकारणातील सर्वात गुंतागुंतीच्या आणि तणावपूर्ण विषयांपैकी एक आहेत. या दोन्ही देशातील वाढत्या लष्करी तणावादरम्यान इराणला मोठा झटका बसला आहे. पश्चिम इराणमधील हमादान येथे प्रशिक्षणादरम्यान इराणचं एक लढाऊ विमान कोसळलं आणि त्या0त वैमानिकाचा मृत्यू झाला. इराणच्या सरकारी माध्यमांशी संबंधित जोडल्या गेलेल्या प्रेस टीव्हीने या अपघाताची पुष्टी केली आहे. हा अपघात अशावेळी झाला आहे जेव्हा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी इराणला हल्ल्याची धमकी दिली होती.
20 Feb 2026 02:20 PM (IST)
Jeffrey Epstein Case: जगभरात खळबळ उडवणाऱ्या जेफ्री एपस्टीनचे नवनवे कारनामे सातत्याने समोर येत आहे. जेफ्रिच्या कारनाम्यांना जगभरातील हजारो महिला बळी पडल्या. यात भारतातील काही महिलांचाही समवेश होता. अशातच जेफ्रीच्या अत्याचाराला बळी पडलेल्या रिना ओहने दशकांनंतर मौन सोडले आहे. जेफ्रीच्या जाळ्यात अडकलेल्या रिनाने तिच्यासोबत घडलेल्या भयानक घटनांमुळे तिचे आयुष्य कसे बदलून गेले, ही सर्व आपबीती तिने एका इंग्रजी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितली आहे.
20 Feb 2026 02:15 PM (IST)
चौक राज्यमार्ग रस्त्यावर ११ फेब्रुवारी रोजी दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास एसटी गाडीची इर्टिगा गाडीला धडक दिली होती.या अपघातात इर्टिगा गाडी चालक रिंकू सिंग तसेच सोबत असलेल्या एका कामगार मित्राला जबर अपघात झाला होता.गेली दहा दिवस चालक रिंकू सिंग हा मृत्यूशी झुंज देत होता.१९ फेब्रुवारी रोजी उपचार घेत असलेल्या तरुणाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.या तरुणाची रुग्णालयात सुरू असलेली मृत्यूशी झुंज दहा दिवसांनी थांबली आहे.
20 Feb 2026 02:06 PM (IST)
बॉलीवूड अभिनेता बॉबी देओल आपल्या आगामी ‘बंदर’ उर्फ ‘मंकी इन अ केज’ या चित्रपटामुळे सध्या चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये या चित्रपटाचा जागतिक प्रीमियर टोरंटो आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव मध्ये पार पडला होता. आंतरराष्ट्रीय स्तरावर कौतुकाची थाप मिळवल्यानंतर आता हा चित्रपट भारतीय प्रेक्षकांच्या भेटीला येण्यासाठी सज्ज झाला आहे. विशेष म्हणजे, आज शुक्रवारी चित्रपटाची अधिकृत रिलीज तारीख जाहीर करण्यात आली असून चाहत्यांमध्ये उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.
20 Feb 2026 02:00 PM (IST)
महाराष्ट्रामध्ये शेतकऱ्यांना अद्याप कर्जमाफी झालेली नाही. यावरुन विरोधकांनी अनेकदा सरकारवर टीकास्त्र डागले आहे. लवकरच राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार आहे. यामध्ये तरी बळीराजाला दिलासा मिळणार का याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दरम्यान. प्रहार संघटनेचे नेते बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी आवाज उठवण्याचा निर्णय घेतला आहे. अमरावती जिल्ह्यातील मेळघाट भागातील शेतकरी, आदिवासी, कामगार आणि स्थानिक नागरिकांच्या मूलभूत समस्या मांडण्यासाठी बच्चू कडू यांनी २५० किलोमीटरची संघर्ष यात्रा काढणार असल्याचे घोषित केले.
20 Feb 2026 01:50 PM (IST)
कोते (ता. राधानगरी) मधील मौजे मानेवाडी येथे मागील दोन ते अडीच महिन्यांपासून तीव पाणीटंचाई निर्माण झाली असून ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. गावात उपलब्ध होणारे पाणी अपुरे व दूषित असल्याने साथीचे रोग पसरण्याचा धोका वाढला आहे. वारंवार सरपंच व ग्रामसेवक यांना सूचना देऊनही ग्राम प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे.गावासाठी अंदाजे ९५ लाख रुपयांची पेयजल योजना तसेच सुमारे १६ लाख रुपयांची ग्रॅव्हिटी पाणी योजना मंजूर असूनही प्रत्यक्षात गावाला पुरेसे व स्वच्छ पाणी मिळत नसल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे. गावात दोन विहिरी असतानाही पाण्याचा प्रश्न सुटलेला नाही. काही ठिकाणी पाणी तपासणी न करता थेट विहिरीत सोडण्यात आल्याचा आरोप असून त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. गावातील महिला पाण्यासाठी व्याकुळ असून लवकरच ‘घागर मोर्चा’ काढण्याच्या तयारीत असल्याची माहिती मिळाली आहे.
20 Feb 2026 01:40 PM (IST)
या वर्षाच्या सुरुवातीला प्रदर्शित झालेला क्रांतिज्योती विद्यालय मराठी माध्यम हा आशयघन मराठी चित्रपट आता जागतिक प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. 27 फेब्रुवारी 2026 रोजी मराठी भाषा गौरव दिनाच्या औचित्याने या चित्रपटाचा वर्ल्ड डिजिटल प्रीमियर ZEE5 वर होणार आहे. हेमंत ढोमे दिग्दर्शित आणि क्षिती जोग यांच्यासह विराज गवस, उर्फी काझमी आणि अजिंक्य धमाल निर्मित या चित्रपटातून मराठी माध्यमातील शिक्षणाचा अभिमान, जिद्द, सांस्कृतिक ओळख आणि बदलत्या काळातील आव्हानांचा भावनिक वेध घेतला आहे.
20 Feb 2026 01:30 PM (IST)
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनास कारणीभूत ठरलेल्या बारामती विमान अपघाताचा तपास आता निर्णायक टप्प्यावर पोहोचला आहे. या प्रकरणातील सर्वात महत्त्वाचा पुरावा मानल्या जाणाऱ्या ‘ब्लॅक बॉक्स’मधील माहिती मिळवण्यात तपास यंत्रणांना अंशतः यश आले आहे. डीएफडीआर (DFDR) मधील डेटा यशस्वीपणे डाउनलोड झाला असला, तरी सीव्हीआर (CVR) मधील माहिती मिळवण्यासाठी आता परदेशी तज्ज्ञांची मदत घेतली जाणार आहे.
20 Feb 2026 01:20 PM (IST)
सरकारी टेलिकॉम कंपनी बीएसएनएल यूजर्ससाठी एक आनंदाची आणि महत्त्वाची बातमी आहे. बीएसएनएल 5जी ची प्रतिक्षा लवकरच संपणार आहे. येत्या काही महिन्यांत यूजर्सना बीएसएनएल 5 जी सर्विस वापरण्याचा संधी मिळणार आहे. याबाबत कंपनीने दिल्लीमध्ये आयोजित करणाऱ्या इंडिया एआय इंपॅक्ट समिट 2026 मध्ये घोषणा केली आहे. इंडिया एआय इंपॅक्ट समिट 2026 मध्ये कंपनीचे चेयरमॅन आणि मॅनेजिंग डायरेक्टर रॉबर्ट रवि यांनी माहिती दिली आहे.
20 Feb 2026 01:10 PM (IST)
हे प्रकरण एखाद्या चित्रपटाच्या पटकथेपेक्षा कमी नाही. हैदराबादी बिर्याणीपासून सुरुवात झाली आणि देशातील सर्वात मोठ्या करचोरीच्या घोटाळ्यांपैकी एकाने संपले. बिलिंग सॉफ्टवेअरमध्ये फेरफार करून रेस्टॉरंट्सनी ७०,००० कोटींची करचोरीची घटना उघडकीस आली आहे. सुरूवातीला तेलंगणा आणि आंध्र प्रदेशातील काही बिर्याणी रेस्टॉरंट्सच्या नियमित तपासणीने तपास सुरू झाला. अधिकाऱ्यांना रेस्टॉरंटमधील लोकांची संख्या आणि त्यांच्या घोषित कमाईमध्ये लक्षणीय तफावत असल्याचा संशय आला. त्यानंतर, देशभरातील अंदाजे १.७७ लाख रेस्टॉरंट्स वापरत असलेल्या डिजिटल बिलिंग सॉफ्टवेअरची तपासणी करण्यासाठी तपासाची व्याप्ती वाढविण्यात आली.
20 Feb 2026 01:05 PM (IST)
काँग्रेस पक्षाने आज दिल्लीत महत्त्वाची बैठक बोलावली आहे. या बैठकीसाठी 7 राज्यांच्या प्रदेशाध्यक्षांना तातडीने दिल्लीत बोलावलं आहे. तर या बैठकीसाठी महाराष्ट्र काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ देखील दिल्लीकडे रवाना झाले आहेत.
20 Feb 2026 12:55 PM (IST)
भिवंडी महापालिका महापौर पद निवडणूक आज होत आहे. या निवडणुकीच्या तोंडावर भाजपमध्ये दोन गट पडल्याचा फायदा काँग्रेस पक्षाला होणार आहे. मात्र काँग्रेस प्रदेशाध्यक्षांनी समाजवादी पक्षाच्या आमदारांना हाताशी धरून काँग्रेस पक्ष भाजपला विकला असल्याचा आरोप काँग्रेसचे भिवंडी शराध्यक्ष रशीद ताहीर मोमीन यांनी केला आहे.या संदर्भातील लेखी तक्रार मोमीन यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याकडे केली आहे.शहराध्यक्षांच्या नाराजीमुळे काँग्रेसमध्ये देखील नाराजी उफाळून आली असल्याचे बोलले जात आहे.
20 Feb 2026 12:45 PM (IST)
भिवंडी महापालिका महापौर निवडणुकीच्या आधी भाजपने आपल्या उमेदवारांना व्हिप जारी केला आहे. भाजपचे दहा सदस्य फुटले असून ते काँग्रेससोबत गेले आहे. त्यामुळे या निवडणुकीत फुटलेले सदस्य व्हिप पाळणार का? याची चर्चा आहे.
20 Feb 2026 12:32 PM (IST)
भिवंडी महापालिका महापौर निवडणुकीच्या आधी भाजपने आपल्या उमेदवारांना व्हिप जारी केला आहे. भाजपचे दहा सदस्य फुटले असून ते काँग्रेससोबत गेले आहे. त्यामुळे या निवडणुकीत फुटलेले सदस्य व्हिप पाळणार का? याची चर्चा आहे.
20 Feb 2026 12:32 PM (IST)
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात खासदार अमोल कोल्हे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. मात्र, त्यांच्या व्याख्यानाला विद्यार्थी संघटनांकडून विरोध करत ते रद्द करण्याची मागणी कुलगुरूंकडे करण्यात आली आहे. या विद्यार्थी संघटना भाजप समर्थ असल्याची टीका करण्यात येत आहे.
20 Feb 2026 11:40 AM (IST)
खडकवासला धरण साखळी प्रकल्पातून शेतीसाठी उन्हाळी हंगामासाठीच्या आवर्तनाला सुरुवात करण्यात आली असून, धरणातील पाणीसाठ्यापैकी नऊ अब्ज घनफूट (टीएमसी) एवढे पाणी दोन टप्प्यांमध्ये शेतीसाठी दिले जाणार आहे. शहराच्या पाण्याबाबतचा निर्णय जलसंपदा विभागाकडून राखीव ठेवण्यात आला आहे.
20 Feb 2026 11:30 AM (IST)
यश, कियारा अडवाणी आणि मोठ्या स्टारकास्ट अभिनीत “टॉक्सिक” हा चित्रपट त्याच्या शक्तिशाली शीर्षक परिचय व्हिडिओपासूनच चर्चेत आहे. टीझर प्रदर्शित झाला आहे आणि चाहते चित्रपटाच्या प्रदर्शनाची आतुरतेने वाट पाहत आहेत. दिग्दर्शक गीतू मोहनदास यांनी २० फेब्रुवारी रोजी टीझर प्रदर्शित होण्याची घोषणा आधीच केली होती आणि तेव्हापासून चाहते उत्सुकतेने भरलेले आहेत. या टीझरमुळे चित्रपटासाठी उत्सुकता निर्माण झाली आहे. हा चित्रपट रणवीर सिंगच्या “धुरंधर २” हा सिनेमागृहात टक्कर देणार आहेत.
20 Feb 2026 11:20 AM (IST)
टी-२० विश्वचषकाचा उत्साह वाढणार आहे. गट टप्प्यानंतर आता सुपर-८ फेरी सुरू होणार आहे. भारत, पाकिस्तान, वेस्ट इंडिज, इंग्लंड, श्रीलंका, झिम्बाब्वे, दक्षिण आफ्रिका आणि न्यूझीलंड यांनी सुपर-८ साठी पात्रता मिळवली आहे. या ८ संघांना प्रत्येकी ४-४ च्या दोन गटात विभागण्यात आले आहे. यापैकी ४ संघ आता ४ आणि ५ मार्च रोजी खेळवल्या जाणाऱ्या सेमीफायनलसाठी पात्र ठरतील. सुपर-८ सामने सुरू होण्यापूर्वी क्रिकेट पंडितांकडून भाकिते करण्याचा ट्रेंड पुन्हा एकदा सुरू झाला आहे. अशा परिस्थितीत, माजी पाकिस्तानी वेगवान गोलंदाज मोहम्मद आमिरने टीम इंडियाबद्दल मोठी भविष्यवाणी केली आहे.
20 Feb 2026 11:10 AM (IST)
इंडिया एआय इम्पॅक्ट समिटमध्ये, अँथ्रोपिकचे सीईओ डारियो अमोदेई यांनी एआयच्या भविष्याबद्दल एक महत्त्वपूर्ण विधान केले, त्यांनी सांगितले की काही वर्षांत, एआय मानवी विचारसरणी आणि समजुतील मागे टाकू शकते, विशेषतः ज्या कामांना आपण आता संज्ञानात्मक कार्ये म्हणतो. डारियो म्हणाले की एआयची प्रगती इतकी जलद आहे की ती एक प्रकारची ‘बुद्धिमत्तेसाठी मूरचा नियम’ बनली आहे, म्हणजेच संगणकाची शक्ती वेगाने वाढते.
20 Feb 2026 10:59 AM (IST)
छत्रपती शिवाजी महाराजांच्या जन्मोत्सवाच्या औचित्याने डोंबिवलीत एका भव्य आणि ऐतिहासिक संकल्पनेचा शुभारंभ करण्यात आला आहे. भगवती ग्रुप आणि हावरे प्रॉपर्टीज यांनी संयुक्तपणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासावर आधारित ‘स्वराज्य’ या भव्य गृहनिर्माण योजनेची घोषणा केली आहे. इतिहासाचा अभिमान आणि आधुनिक जीवनशैली यांचा संगम घडवणारी ही योजना महाराष्ट्राच्या सांस्कृतिक अस्मितेला साजेशी ठरणार आहे. विशेष म्हणजे या योजनेच्या संकल्पनेला अधिक प्रभावी रूप देण्यासाठी ‘स्वराज्य’ हे शीर्षक गीतही प्रदर्शित करण्यात आले आहे.
20 Feb 2026 10:50 AM (IST)
लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्यासह २५ खासदारांना जीवे मारण्याची धमकी देण्याऱ्याला पोलिसांनी राजस्थानमधील कोटा येथून अटक केली आहे. राज सिंह आमेरा असे या आरोपीचे नाव असून, कोटा शहर पोलिसांनी ही कारवाई केल्याची माहिती आहे.