लोकसेवा आयोगाने UPSC CSE अंतिम निकाल २०२४ चा अंतिम निकाल जाहीर केला आहे. निकाल पाहण्यासाठी परिक्षार्थीं upsc.gov.in वर भेट देऊन एका क्लिकवर पाहू शकतात
, सर्वात प्रतिष्ठित मानल्या जाणाऱ्या भारतीय प्रशासकीय सेवेत म्हणजेच (IAS) एकूण १८० पदे भरली जातील. यापैकी ७३ पदे अनारक्षितांसाठी, २४ एससीसाठी, १३ एसटीसाठी, ५२ ओबीसीसाठी आणि १८ ईडब्ल्यूएस प्रवर्गासाठी राखीव आहेत.
तर यावर्षी आयपीएस म्हणजेच भारतीय पोलिस सेवेसाठी १५० पदांची घोषणा करण्यात आली आहे. यामध्ये ६० पदे अनारक्षित आहेत, २३ एससी, १० एसटी, ४२ ओबीसी आणि १५ ईडब्ल्यूएससाठी राखीव आहेत.
यावेळी, भारतीय परराष्ट्र सेवा (IFS) अंतर्गत भारताच्या परराष्ट्र धोरण आणि राजनैतिक कूटनीतिशी संबंधित एकूण ५५ पदे भरली जातील, ज्यामध्ये २३ अनारक्षित, ९ एससी, ५ एसटी, १३ ओबीसी आणि ५ ईडब्ल्यूएस श्रेणीतील पदांचा समावेश आहे.
भारतीय लेखापरीक्षण आणि लेखा सेवा, गट अ – २० पदे
भारतीय नागरी लेखा सेवा, गट अ – २५ पदे
भारतीय संरक्षण लेखा सेवा, गट अ – २४ पदे
भारतीय माहिती सेवा, गट अ – ३७ पदे
भारतीय महसूल सेवा (आयकर), गट अ – १८० पदे
भारतीय रेल्वे व्यवस्थापन सेवा (IRMS), गट अ – १५० पदे
दिल्ली, अंदमान निकोबार पोलिस सेवा (DANIPS), गट ब – ७९ पदे
हार्वर्ड विद्यापीठाने न्यायालयात घेतली धाव; ट्रम्प प्रशासनाविरोधात खटला दाखल, प्रकरण काय?
सर्वप्रथम UPSC च्या अधिकृत वेबसाइट upsc.gov.in वर जा.
होमपेजवर दिलेल्या “UPSC नागरी सेवा अंतिम निकाल २०२४” या लिंकवर क्लिक करा.
आता एक नवीन पीडीएफ फाइल उघडेल, ज्यामध्ये रोल नंबरची यादी दिली जाईल.
यामध्ये तुमचा रोल नंबर काळजीपूर्वक तपासा.
ही फाईल डाउनलोड करा आणि प्रिंटआउट जपून ठेवा.