Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Urjit Patel News: उर्जित पटेल यांची IMF च्या कार्यकारी संचालकपदी नियुक्ती: मोदी सरकारने दिली मंजुरी

गव्हर्नर होण्यापूर्वीही त्यांनी IMF (आंतरराष्ट्रीय नाणेनिधी) मध्ये काम केले आहे. त्यांनी १९९२ मध्ये वॉशिंग्टन डीसी आणि नवी दिल्ली येथे IMF मध्ये काम केले.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Aug 29, 2025 | 11:51 AM
Urjit Patel News: उर्जित पटेल यांची IMF च्या कार्यकारी संचालकपदी नियुक्ती: मोदी सरकारने दिली मंजुरी
Follow Us
Close
Follow Us:
  • उर्जित पटेल यांची IMF च्या कार्यकारी संचालकपदी नियुक्ती
  • उर्जित पटेल यांच्या कार्यकाळात नोटाबंदीचा निर्णय
  • आरबीआयसाठी ४% ची महागाई मर्यादा निश्चित केली होती

Urjit Patel News: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर डॉ. उर्जित पटेल यांची आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या कार्यकारी संचालक पदी नियुक्ती करण्यात आली आहे,. पुढीलतीन वर्षांसाठी ही नियुक्ती करण्यात आली आहे. सप्टेंबर २०१६ मध्ये रघुराम राजन यांच्यानंतर उर्जित पटेल यांनी आरबीआयचे २४ वे गव्हर्नर म्हणून पदभार स्वीकारला. त्यांचा कार्यकाळात अनेक महत्तवाचे निर्णय घेण्यात आले. उर्जित पटेल यांच्याच कार्यकाळात केंद्र सरकारने नोव्हेंबर २०१६ मध्ये नोटाबंदीसारखा मोठा निर्णय घेतला. उर्जित पटेल यांनी सादर केलेल्या अहवालाच्या आधारे हा निर्णय घेण्यात आला होता.

२०१८ मध्ये ‘वैयक्तिक कारणांमुळे’ राजीनामा

डिसेंबर २०१८ मध्ये, उर्जित पटेल यांनी त्यांच्या काही ‘वैयक्तिक कारणांमुळे’ आपल्या पदाचा राजीनामा दिला, त्यानंतर ते १९९२ नंतर सर्वात कमी कालावधीसाठी आरबीआय गव्हर्नर राहणारे पहिले व्यक्ती बनले. पण आपल्या कमी कार्यकाळातही उर्जित पटेल यांनी महागाई नियंत्रित करण्यासाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला. त्यांनी आरबीआयसाठी ४% ची महागाई मर्यादा निश्चित केली होती. ही मर्यादा लक्ष्य म्हणून ठेवून, मध्यवर्ती बँकेने आपले चलनविषयक धोरण राबविण्याचा निर्णय घेतला. उर्जित पटेल यांच्या अहवालाच्या आधारे, भारताने ४% सीपीआय (ग्राहक किंमत निर्देशांक) महागाई दर लक्ष्य म्हणून स्वीकारला.

Maratha Jarange Maratha Arakshan: आझाद मैदानात मनोज जरांंगेचे उपोषण सुरू

आरबीआय गव्हर्नर पदावर नियुटी होण्यापूर्वी, उर्जित पटेल यांनी मध्यवर्ती बँकेत डेप्युटी गव्हर्नर म्हणूनही काम केले. या काळात त्यांनी चलनविषयक धोरण, आर्थिक धोरण संशोधन, सांख्यिकी आणि माहिती व्यवस्थापन, ठेव विमा आणि माहितीचा अधिकार यासारखे अनेक महत्त्वाचे विभाग हाताळले.

आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत अनुभव

डॉ. उर्जित पटेल यांची कारकीर्द केवळ आरबीआयपुरती मर्यादित नाही, तर त्यांचा अनुभव आंतरराष्ट्रीय आणि देशांतर्गत दोन्ही पातळ्यांवर बराच विस्तृत आहे. त्यांनी यापूर्वी पाच वर्षे आयएमएफमध्ये काम केले आहे. त्यांनी वॉशिंग्टन डीसीमध्ये आणि नंतर १९९२ मध्ये नवी दिल्लीमध्ये आयएमएफचे उपनिवासी प्रतिनिधी म्हणून काम केले. याव्यतिरिक्त, ते १९९८ ते २००१ पर्यंत अर्थ मंत्रालयाचे सल्लागार देखील होते. त्यांनी रिलायन्स इंडस्ट्रीज, आयडीएफसी लिमिटेड, एमसीएक्स लिमिटेड आणि गुजरात स्टेट पेट्रोलियम कॉर्पोरेशन सारख्या सार्वजनिक आणि खाजगी कंपन्यांमध्ये उच्च पदांवर काम केले आहे.

आधी IMF मध्ये काम

गव्हर्नर होण्यापूर्वीही त्यांनी IMF (आंतरराष्ट्रीय नाणेनिधी) मध्ये काम केले आहे. त्यांनी १९९२ मध्ये वॉशिंग्टन डीसी आणि नवी दिल्ली येथे IMF मध्ये काम केले. त्यानंतर, १९९८ पासून २००१ पर्यन्त त्यांनी अर्थ मंत्रालयात सल्लागार म्हणूनही काम केले आहे. त्यांनी रिलायन्स, IDFC लिमिटेड आणि पेट्रोलियम कॉर्पोरेशन ऑफ गुजरात सारख्या देशातील आघाडीच्या कंपन्यांमध्येही काम केले आहे.

BWF World Championships चे भारतीय बॅडमिंटन खेळाडूंचे सामने कधी आणि कुठे पाहता येणार? येथे पाहता

पटेल यांनी येल विद्यापीठातून अर्थशास्त्रात पीएचडी

डॉ. पटेल यांनी येल विद्यापीठातून अर्थशास्त्रात पीएचडी, ऑक्सफर्ड विद्यापीठातून एम.फिल. आणि लंडन विद्यापीठातून बी.एससी. केली आहे. त्यांचा व्यापक अनुभव आणि शिक्षण त्यांना आयएमएफमधील नवीन जबाबदारीसाठी योग्य पर्याय बनवते. ही नियुक्ती जागतिक आर्थिक स्तरावर भारताची वाढती भूमिका देखील प्रतिबिंबित करते.

आंतरराष्ट्रीय नाणेनिधी

आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (आयएमएफ) ही एक जागतिक संस्था असून त्याची स्थापना १९४४ मध्ये झाली, जी १९० देशांमधील आर्थिक सहकार्याला प्रोत्साहन देते. जगभरातील आर्थिक स्थिरता, आंतरराष्ट्रीय व्यापार, आर्थिक विकास आणि दारिद्र्य निर्मूलनाला पाठिंबा देणे हे त्याचे मुख्य उद्दिष्ट आहे. आयएमएफ सदस्य देशांना आर्थिक मदत, धोरणात्मक सल्ला आणि तंत्रज्ञान सहाय्य प्रदान करते. त्याचे मुख्यालय वॉशिंग्टन डी.सी. येथे आहे.

Web Title: Urjit patel appointed as imf executive director modi government approves

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 29, 2025 | 11:51 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.