फोटो सौजन्य - सोशल मिडिया
भारताच्या स्टार खेळाडूंनी काल झालेल्या बीडब्लूएफ वर्ल्ड चॅम्पियनशीप 2025 राउंड ऑफ 16 मध्ये कहर पाहायला मिळाला. भारताची स्टार खेळाडू पीव्ही सिंधू, सात्विक – चिराग जोडीने धूमाकुळ घातला तर तनिषा क्रिस्टो आणि ध्रुव कपिला यांनी तर सर्वानाच चकीत केले आणि जागतिक क्रमवारीमध्ये सहाव्या स्थानावर असलेल्या जोडीला पराभूत करुन उप उपांत्य फेरीमध्ये प्रवेश केला आहे. भारतीय चाहत्यांना आता या भारतीय बॅडमिंटनपटूंचे सामने कधी आणि कुठे खेळवले जाणार आहे त्याचबरोबर भारतीय प्रेक्षकांसाठी या सामन्यांची लाईव्ह स्ट्रिमिंग कुठे पाहायला मिळणार यासंदर्भात सविस्तर वाचा.
मिश्र दुहेरीत, तनिषा क्रॅस्टो आणि ध्रुव कपिला यांनी पाचव्या मानांकित तांग चुन मान आणि त्से यिंग सुएत यांना हाँगकाँग, चीनच्या १९-२१, २१-१२, २१-१५ असे पराभूत करून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. आज, म्हणजे शुक्रवारी, भारतीय जोडी मलेशियाच्या चेन तांग जी आणि तोह ई वेई यांच्याशी लढेल. हा सामना दुपारी १ वाजता होईल.
Cheteshwar Pujara Retirement : अचानक निवृत्तीचा निर्णय का घेतला? चेतेश्वर पुजाराने अखेर मौन सोडलेच, वाचा सविस्तर
पीव्ही सिंधूने दुसऱ्या मानांकित चीनच्या वांग झी यीचा पराभव करून क्वार्टर फायनलमध्ये प्रवेश केला. सिंधूने २१-१९, २१-१५ असा सरळ गेममध्ये विजय मिळवला. आता सिंधू आज दुपारी ४:२० वाजता होणाऱ्या क्वार्टर फायनल सामन्यात इंडोनेशियन बॅडमिंटनपटू पी.के. वर्दानीविरुद्ध खेळेल. आज रात्री ११:५० वाजता, सात्विक-चिरागचा पुढचा सामना दुसऱ्या मानांकित मलेशियाच्या आरोन चिया आणि सोह वूई यिक यांच्याशी होईल. अशा परिस्थितीत, सात्विक-चिरागला त्यांना पराभूत करून उपांत्य फेरीत प्रवेश करण्याची संधी असेल.
क्वार्टर फायनलचे सामने हे 29 ऑगस्ट रोजी सुरु होणार आहेत. या सामन्यांची सुरुवात बी डब्ल्यू एस वर्ल्ड चॅम्पियनशिप क्वार्टर फायनलचे सामने हे आज सुरू होणार आहेत. भारतीय प्रेक्षकांसाठी हे सामने जिओहॉटस्टार वर पाहायला मिळणार आहेत. त्याचबरोबर बी डब्ल्यू एफ यूट्यूब चैनल वर या सामन्यांची लाइव्ह स्ट्रीमिंग बॅडमिंटन प्रेमी पाहू शकतात.
३० वर्षीय सिंधूने तिची जुनी लय परत मिळवली आणि या हंगामातील सर्वात सातत्यपूर्ण शटलर्सपैकी एक असलेल्या जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकाच्या वांग झी यीचा सरळ गेममध्ये पराभव केला. २०२१ नंतर पहिल्यांदाच सिंधूने BWF जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत वांग झी यीवर २१-१७, २१-१५ असा शानदार विजय मिळवत BWF जागतिक अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. सिंधू आता तिच्या सहाच्या जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत पदक जिंकण्यापासून फक्त एक विजय दूर आहे. १५ व्या मानांकित सिंधूचा शुक्रवारी होणाऱ्या उपांत्यपूर्व फेरीत नवव्या मानांकित इंडोनेशियाच्या पुत्री कुसुमा वर्दानीशी सामना होईल.