Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 9 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Nana Patekar |
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

भारतीय आयटी कंपन्यांना अमेरिकेचा ‘दे धक्का’; इन्फोसिस, टाटा, विप्रोसह 8 कंपन्यांवर कारवाई

या निर्णयाचा सर्वात थेट परिणाम अमेरिकेत कार्यरत असलेल्या भारतीय आयटी कर्मचाऱ्यांच्या ग्रीन कार्ड प्रक्रियेवर होऊ शकतो. मात्र, PERM निलंबित झाल्याचा अर्थ विद्यमान एच-१बी वीजा तात्काळ रद्द होणे असा नाही.

  • By कृपादान आवळे
Updated On: Oct 09, 2026 | 11:29 AM
भारतीय आयटी कंपन्यांना अमेरिकेचा 'दे धक्का'; इन्फोसिस, टाटा, विप्रोसह 8 कंपन्यांवर कारवाई

भारतीय आयटी कंपन्यांना अमेरिकेचा 'दे धक्का'; इन्फोसिस, टाटा, विप्रोसह 8 कंपन्यांवर कारवाई

Follow Us
Follow Us:
  • भारतीय आयटी क्षेत्राला अमेरिकेचा मोठा धक्का
  • विद्यमान एच-१बी वीजा तात्काळ रद्द
  • कायमस्वरूपी निवास मिळवण्याच्या प्रक्रियेतील महत्त्वाची पायरी
नवी दिल्ली : अमेरिकेने भारतीय आयटी क्षेत्राला मोठा धक्का देणारी कारवाई केली आहे. अमेरिकेच्या कामगार विभागाने इन्फोसिस, टाटा, विप्रो, एचसीएल, कॉग्निझंट आणि कॅपजेमिनी यांच्यासह मायक्रोसॉफ्ट आणि अॅडोब या आठ कंपन्यांना परमनंट लेबर सर्टिफिकेशन प्रोग्राममधून निलंबित केले आहे. याद्वारे कंपन्यांना पात्र परदेशी कर्मचाऱ्यांसाठी अमेरिकेच्या कायमस्वरूपी निवासाचा म्हणजेच ग्रीन कार्डचा मार्ग मोकळा करता येतो.

अमेरिकेचे कामगार मंत्री कीथ सॉन्डरलिंग यांनी गुरुवारी ही घोषणा केली. या कंपन्यांशी संबंधित नवीन अर्ज स्वीकारले जाणार नाहीत, असे त्यांनी स्पष्ट केले. सॉन्डरलिंग यांनी या कंपन्यांवर अमेरिकन कर्मचाऱ्यांच्या नोकऱ्यांवर परिणाम केल्याचा आरोप केला. २००९ पासून या कंपन्यांनी मिळून जवळपास ३० लाख परदेशी कर्मचाऱ्यांची मागणी केली. त्यापैकी दोन लाख ३० हजारांहून अधिक एच-१बी वीजांना मंजुरी मिळाली, तर एक लाखांहून अधिक कायमस्वरूपी श्रम प्रमाणपत्रे देण्यात आली.

अमेरिकेचे उपराष्ट्राध्यक्ष जेडी वेंस यांनीही या निर्णयाचे समर्थन केले. त्यांच्या मते, परमनंट लेबर सर्टिफिकेशन प्रोग्राम प्रक्रियेत कंपनीला अमेरिकेत उपलब्ध असलेल्या कर्मचाऱ्यांचा विचार केल्यानंतरच परदेशी कर्मचाऱ्याला कायमस्वरूपी नियुक्त करण्याची गरज असल्याचे दाखवावे लागते. या प्रक्रियेचा गैरवापर होत असल्याचा प्रशासनाचा आरोप आहे.

बंगळुरूमध्ये थरार ! फूटपाथवरून ट्रान्सफॉर्मरचा ब्लास्ट ! तरुण गंभीर जखमी; अंगाचा थरकाप उडवणारा Video Viral

दरम्यान, अमेरिकन प्रशासनाने परदेशी विद्यार्थ्यांशी संबंधित जे-१ वीजा कार्यक्रमाबाबतही काही विद्यापीठांची चौकशी सुरू केली आहे. हार्वर्ड, येल आणि स्टॅनफोर्डसह नऊ विद्यापीठांची चौकशी होत असल्याचे जेडी वेंस यांनी सांगितले.

भारतीय कर्मचाऱ्यांवर काय परिणाम?

या निर्णयाचा सर्वात थेट परिणाम अमेरिकेत कार्यरत असलेल्या भारतीय आयटी कर्मचाऱ्यांच्या ग्रीन कार्ड प्रक्रियेवर होऊ शकतो. मात्र, PERM निलंबित झाल्याचा अर्थ विद्यमान एच-१बी वीजा तात्काळ रद्द होणे असा नाही. PERM ही रोजगाराच्या माध्यमातून कायमस्वरूपी निवास मिळवण्याच्या प्रक्रियेतील महत्त्वाची पायरी आहे. त्यामुळे त्यावरील निर्बंधांचा परिणाम प्रामुख्याने भविष्यातील ग्रीन कार्ड अर्ज, कर्मचारी टिकवून ठेवणे आणि अमेरिकेतील मनुष्यबळ नियोजनावर होऊ शकतो.

Web Title: Us takes action against 8 companies including infosys tata and wipro nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 09, 2026 | 11:29 AM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.