मोठी बातमी! अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा राजीनामा, कारणही सांगितलं
संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली. मात्र अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. आरोग्याच्या चिंता आणि वैद्यकीय सेवेला प्राधान्य देण्याची गरज असल्याचे कारण देत त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी प्रकृती अस्वास्थ्याचे कारण देत संविधानाच्या कलम ६७ (अ) अंतर्गत राजीनामा देत असल्याची घोषणा केली असून सहकार्य आणि सौहार्दपूर्ण संबंधांबद्दल राष्ट्रपतींचे आभार मानले आहेत.
ट्रम्प यांच्या दाव्यावरून संसदेत गदारोळ ; पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी काय काय घडलं?
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना लिहिलेल्या पत्रात त्यांनी म्हटले आहे की, “आपल्या महान लोकशाहीत उपराष्ट्रपती म्हणून मिळालेल्या अमूल्य अनुभवांबद्दल मी मनापासून आभारी आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सहकार्य आणि पाठबळ अमूल्य आहे. माझ्या कार्यकाळात त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळालं.” असं त्यांनी म्हटलं आहे.”संसदेतील सर्व सन्माननीय सदस्यांकडून मला मिळालेला स्नेह, विश्वास आणि आदर कायम स्मरणात राहिल, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या आहेत.
— Vice-President of India (@VPIndia) July 21, 2025
उपराष्ट्रपती म्हणून घालवलेला कालावधी हा माझ्यासाठी शिकण्याचा आणि सन्मानाचा काळ होता. भारताच्या आर्थिक प्रगतीचा साक्षीदार होणे आणि त्यात सहभागी होणे हे समाधानकारक होते. आपल्या देशाच्या इतिहासातील या परिवर्तनाच्या टप्प्यावर सेवा देणे ही माझ्यासाठी एक मोठी गौरवाची गोष्ट होती. भारताच्या जागतिक पातळीवर निर्माण झालेला दबदबा, अभिमानाची गोष्ट असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.
उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचं वय ७४ असून त्यांनी ऑगस्ट २०२२ मध्ये भारताचे १४वे उपराष्ट्रपती म्हणून कार्यभार स्वीकारला होता. याआधी ते एक ज्येष्ठ वकील आणि पश्चिम बंगालचे राज्यपाल होते. राज्यपालपदाच्या काळात त्यांचा पश्चिम बंगालमधील ममता बॅनर्जी सरकारसोबत अनेक वेळा वाद झाला. त्यांनी राज्य सरकार आणि सत्ताधारी पक्षावर भ्रष्टाचार, राजकीय हिंसाचार, प्रशासन आणि शैक्षणिक संस्थांमध्ये राजकारण आणि अलोकशाही वर्तन यासारख्या मुद्द्यांवर टीका केली होती.
राज्यसभेच्या अध्यक्षपदाच्या शेवटच्या काही तासांतच त्यांनी राजीनामा दिला. पावसाळी अधिवेशनाच्या सुरुवातीला धनखड यांनी पक्षीय सदस्यांना कटुता कमी करून रचनात्मक राजकारणात सहभागी होण्याचे आवाहन केलं होत. “एक समृद्ध लोकशाही सतत कटुता टिकवू शकत नाही. राजकीय तणाव कमी केला पाहिजे, कारण संघर्ष हा राजकारणाचा सार नाही,” असं मत त्यांनी व्यक्त केलं होतं.