VP Election of India:
VP Election of India : भारताच्या उपराष्ट्रपतीपदासाठी काल (9 सप्टेंबर) मतदान प्रक्रिया पार पडली. भाजपप्रणित एऩडीएचे उमेदवार सी.पी. राधाकृष्णन यांचा विजय झाला. राधाकृष्णन यांना 452 मते पडली, तर इंडिया आघाडीचे उमेदवार बी. सुदर्शन रेड्डी यांना 300 मते मिळाली. राधाकृष्णन यांचा 152 मतांनी विजय झाली. पण निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यापासून विरोधी पक्षातील १५ खासदारांची मते फुटल्याची चर्चा राजकीय वर्तुळात जोर धरू लागली आहे.
इंडिया आघाडीच्या उमेदवाराला किमान ३१५ मते मिळतील असा दावा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी केला होता. पण निकाल जाहीर झाल्यानंतर त्यांचा सुदर्शन रेड्डी यांनी 300 मते मिळाल्याचे उघड झाले. त्यामुळे आता विरोधी पक्षातील कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केल्याचा दावा भाजपकडून करण्यात आला आहे.
क्रॉस व्होटिंगच्या मुद्द्यावरून भाजप आयटी सेलचे प्रमुख अमित मलवीय यांनी इंडिया आघाडीवर निशाणा साधला आहे. ” “विरोधकांच्या सर्व 315 खासदारांनी मतदान केलं. पण ते कुणासाठी केले हा खरा प्रश्न आहे. एवढी घोषणाबाजी करूनही त्यांच्या उमेदवाराला 300 मते मिळाली.” असा टोला मालवीय यांनी लगावला आहे.
दरम्यान, जयराम रमेश यांनी रेड्डी यांना जास्तीची 15 मते मिळतील असा दावा केला होता, मग ही मते कुठे गेली, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. जर 15 खासदारांनी क्रॉस व्होटिंग केले आणि 15 खासदारांची मते अवैध ठरवण्यात आली. म्हणजे त्यांनी चुकीच्या पद्धतीने मतदा केले, त्यामुळए त्यांची मते अवैध ठरवण्यात आली. या सर्व प्रकारावर काँग्रेस खासदार शक्ती सिंह गोहिल म्हणाले, की आमची 15 मते अवैध ठरल्यामुळे आम्हाला फक्त 300 मते मिळाली
मग कोणत्या खासदारांनी क्रॉस व्होटिंग केलं, असा प्रश्न उपस्थित होत आहे. यात महाराष्ट्रासह तामिळनाडू, केरळ आणि पंजाबमधील खासदारांनी क्रॉस व्होटिंग केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे भाजपने या उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी मोठी फिल्डिंग लावल्याचेही बोलले जात आहे.
Nashik Crime: पोट साफ होत नाही म्हणून केली सोनोग्राफी, गर्भवती असल्याचं स्पष्ट; DNA तपासल्यानंतर
भाजपच्या या प्रयत्नांना यश मिळाल्याचे बोलले जात आहे. कारण महाराष्ट्रातील काही खासदार एनडीएबाबत सकारात्मक भूमिका मांडत होते, तर केरळ, पंजाबसह इतर राज्यांतील काही नेते आपल्या पक्षाच्या विरोधात उघडपणे भूमिका घेताना दिसले. त्यामुळे या राज्यांतील खासदारांनी क्रॉस व्होटिंग केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
मात्र, उपराष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतील मतदान पूर्णपणे गुप्त स्वरूपाचे असल्यामुळे नेमके कुणी क्रॉस व्होटिंग केले किंवा चुकीचे मतदान केले हे उघड करता येत नाही. त्यामुळे केवळ संशयच व्यक्त केला जात असून, ठोसपणे कुणावरही आरोप करता येत नाही.