नाशिक : नाशिकमधून एक धक्कदायक आणि संतापजनक घटना समोर आली आहे. सतार वर्षीय अल्पवयीन मुलीवर तिच्या बापाकडूनच अत्याचार झाल्याचे समोर आले आहे. अत्याचारानंतर मुलगी गरोदर राहिली. तिच्या पोटात सतत दुखत असल्याने तिची सोनोग्राफी करण्यात आली. सोनोग्राफी रेपोर्टस्मध्ये ती गरोदर असल्याचे समोर आले. ही बाब पोलिसांनी कळवण्यात आली आणि तपासात धक्कदायक माहिती समोर आली.
नेमकं प्रकरण काय?
मिळालेल्या माहितीनुसार, एका परप्रांतीय कुटुंबातील सतरा वर्षीय मुलीला महिनाभरापूर्वी डोकेदुखीचा त्रास होऊ लागल्याने सातपूरच्या कामगार विमा रुग्णालयात उपचारासाठी तिच्या आईने दाखल केले. तेथे तपासणी केल्यानंतर पोटदुखी व पोट स्वच्छ होत नसल्याची तक्रार तिने सांगितली. यामुळे डॉक्टरांनी सोनोग्राफी केली असता ती मुलगी सात आठवड्यांची गर्भवती असल्याचे निदान झाले. त्यामुळे तिला तत्काळ जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले. घटनेची माहिती गंगापूर पोलिसांना देण्यात आली, घटनेचे गांभीर्य ओळखून गंगापूर पोलिसांनी आईच्या फिर्यादीवरून अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल केला. यानंतर पोलिसांनी दाखल होत पीडित मुलगी व तिच्या आईसोबत संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मात्र या मायलेकींसह तिच्या वडिलांनी माहिती देण्यास टाळाटाळ केली.
पोलिसांनी सखोल तपासणी सुरू केली असता शंभरपेक्षा जास्त संबंधित लोकांची चौकशी केली.पीडित मुलगी ही नाशिक येथे पित्यासोबत राहत होती. पीडित मुलीची आई गेल्या दीड महिन्यापासून घरी नसल्याची माहिती समोर आली. तिची आई ही वारंवार तिच्या मूळगावी जात होती. तर, वडील दिवसभर कामावर असत आणि रात्री उशिरा घरी येत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलिस पथकांनी पीडित मुलगी, व गर्भाचे डीएनए नमुने संकलित करत तपासणीला पाठविले. तपासणीमध्ये वडिलांनी पीडितेवर अत्याचार केल्याचे निष्पन्न झाले.
पिता झाला होता पसार…
पोलिसांनी ‘डीएनए’ नमुने घेतल्यानंतर पीडितेचा बाप हा राहत्या परिसरातून फरार झाला होता. त्याने त्याचा वापरातील मोबाइल हा घरीच ठेवून पळ काढल्याने त्याचे ‘लोकेशन’ शोधण्याचे आव्हान पोलिसांपुढे उभे राहिले होते. मोतीलाल पाटील यांच्या पथकाने तांत्रिक विश्लेषण करत सीबीएस भागातून त्याला अटक केली आहे. पुढील तपास पोलीस करत आहे. या घटनेने सर्वत्र खळबळ उडाली आहे.
परळीत 12 वर्षीय बालिकेवर दोघांकडून लैंगिक अत्याचार
महिला, मुलींवर अत्याचाऱ्याच्या घटना वाढत चालले आहे. मुलींवरचे अत्याचार थांबण्याचं नाव घेत नाही आहे. बीड जिल्यातील परळी शहरात एका १२ वर्षीय अल्पवयीन मुलीवर दोन तरुणांनी अत्याचार केल्याचं समोर आलं आहे. यात आणखी दोन जणांनी या प्रकरणात मदत केल्याचं देखील समोर आलं आहे.आठ दिवसात ही दुसरी घटना आहे. आता पुन्हा अशीच घटना परळीच्या बरकत नगर परिसरात घडल्याने परळी शहरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
Sangli Accident : सांगलीत भीषण अपघात, एकाच कुटुंबातील तिघांचा जागीच मृत्यू, तर…