नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीचा निकाल (Lok Sabha Elections Result 2024) मंगळवारी (दि.4) जाहीर झाला. यामध्ये भाजप असो की काँग्रेस कोणत्याही पक्षाला पूर्ण बहुमत मिळाले नाही. त्यामुळे मित्रपक्षांच्या मदतीने आकड्यांची जुळवाजुळव केली जात आहे. त्यात भाजपप्रणित एनडीए बहुमताचा आकडा पार करू शकणार आहे. असे असताना तेलुगू देसम पक्षाचे प्रमुख चंद्राबाबू नायडू (Chandrababu Naidu) यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
भाजपला स्पष्ट बहुमत न मिळाल्याने आता चंद्राबाबू नायडू आणि जेडीयूचे नितीशकुमार हे दोन्ही नेते काँग्रेस की भाजप कोणाला पाठिंबा देणार हे पाहणे गरजेचे आहे. असे असतानाच चंद्राबाबू नायडू यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. माध्यमांशी बोलताना नायडू म्हणाले, ‘तुम्हाला नेहमी बातमी हवी असते. मी अनुभवलंय आणि मी पाहिलंय भारतात काही ठिकाणी थोडा बदल जाणवत आहे. पण आम्ही एनडीएसोबत आहोत. मी एनडीएच्या बैठकीलाही जाणार आहे’.
#WATCH | Vijayawada, Andhra Pradesh: TDP chief N Chandrababu Naidu says, "You always want news. I am experienced and I have seen several political changes in this country. We are in NDA, I’m going to the NDA meeting. In course of time, we will report it." pic.twitter.com/IdDvaywjmd
— ANI (@ANI) June 5, 2024
दरम्यान, एनडीएला बहुमत मिळाल्यानंतर सत्तास्थापनेसाठी पुढील रणनीती ठरवण्यासाठी दिल्लीत बैठक होत आहे. या बैठकीला एनडीएचे घटक पक्षातील नेते उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उपस्थित राहणार आहेत. मात्र, उपमुख्यमंत्री अजित पवार हे या बैठकीला जाणार नसल्याची माहिती मिळत आहे.
अजित पवार राहणार अनुपस्थित
भाजपच्या सर्व विजयी खासदारांच्या व्यतिरिक्त घटक पक्षांच्या खासदारांनाही आज दिल्लीत येण्याच्या सूचना देण्यात आल्यात. अजित पवार जरी उपस्थित राहणार नसले तरी त्यांच्याऐवजी राष्ट्रवादीकडून प्रफुल्ल पटेल हे या बैठकीला हजर राहणार असल्याची माहिती दिली जात आहे.