Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 8 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Amit Shah : ‘हे नरेंद्र मोदींचं सरकार, एक एक अतिरेक्याला शोधून ठेचणार’; अमित शहांनी ठणकावलं

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुरुवारी दिल्लीतील एका कार्यक्रमात बोलताना पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत पाकिस्तानला स्पष्ट शब्दांत इशारा दिला. अमित शहांनी अतिरेक्यांसह पाकिस्तानलाही ठणकावलं.

  • By संदीप गावडे
Updated On: May 01, 2025 | 07:47 PM
'हे नरेंद्र मोदींचं सरकार, एक एक अतिरेक्यांला शोधून ठेचणार'; अमित शहांनी ठणकावलं

'हे नरेंद्र मोदींचं सरकार, एक एक अतिरेक्यांला शोधून ठेचणार'; अमित शहांनी ठणकावलं

Follow Us
Follow Us:

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी गुरुवारी दिल्लीतील एका कार्यक्रमात बोलताना पहलगाम दहशतवादी हल्ल्याबाबत पाकिस्तानला स्पष्ट शब्दांत इशारा दिला. “कोणी समजू नये की आमच्या २७ नागरिकांना मारून ही लढाई जिंकता येईल, प्रत्येकाचा हिशोब चुकता केला जाईल. हे नरेंद्र मोदींचं सरकार आहे. कोणतंही भ्याड कृत्य माफ केलं जाणार नाही, एका एका अतिरेक्याला शोधून बदला घेतला जाईल, असं म्हणत अमित शहांनी अतिरेक्यांसह पाकिस्तानलाही ठणकावलं.

Asim Malik : जनरल असीम मलिक नक्की कोण आहे? पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानने दिलीय NSA ची जबाबदारी

गृहमंत्र्यांनी स्पष्ट केलं की दहशतवादविरोधी लढाई ही भारताची दीर्घकालीन आणि न थांबणारी आहे. “नक्षलवाद असो की काश्मीरमधील उग्रवाद — भारत आता सहन करणार नाही. इंच-इंच जमिनीवरून दहशतवादाचा समूल नाश केला जाईल,” असं त्यांनी नमूद केलं. आज संपूर्ण जग भारतासोबत उभं आहे आणि जोपर्यंत दहशतवादाचा संपूर्ण नायनाट होत नाही, तोपर्यंत लढा चालू राहील, असा इशाराही त्यांनी दिला आहे.

पाकिस्तानविरुद्ध भारताचं कठोर पाऊल

पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकार पाकिस्तानविरुद्ध सातत्याने कठोर निर्णय घेत आहे. बुधवारी भारताने पाकिस्तानी विमानांसाठी आपला हवाई क्षेत्र बंद करण्याचा निर्णय घेतला. त्याआधी, २३ एप्रिल रोजी, हल्ल्यानंतर लगेचच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली सुरक्षा विषयक मंत्रिमंडळ समितीची बैठक झाली होती, ज्यात पाकिस्तानविरुद्ध अनेक मोठे निर्णय घेण्यात आले.

भारताने अटारी सीमेवरील चेक पोस्ट बंद करून पाकिस्तानी नागरिकांना भारतात प्रवेश करण्यापासून रोखले, अगदी वैध व्हिसा असतानाही. यासोबतच, भारताने पाकिस्तानमधील भारतीय दूतावास बंद करण्याचा निर्णय घेतला आणि भारतात असलेल्या सर्व पाकिस्तानी राजनैतिक नेत्यांना ४८ तासांत देश सोडण्याचे आदेश दिले. तसेच, पाकिस्तानातील नागरिकांना भारताचा व्हिसा न देण्याचा कठोर निर्णयही घेण्यात आला.

Mudasir Ahmad Sheikh : शहीद मुदासिर अहमद शेख नक्की कोण आहेत? आई पाकिस्तानची नागरिक की भारतीय? वाचा सविस्तर

याव्यतिरिक्त, पाकिस्तानसाठी असलेली SAARC व्हिसा सवलत योजना त्वरित प्रभावाने रद्द करण्यात आली. यामुळे पाकिस्तानी नागरिकांना भारतात येण्यास परवानगी मिळणार नाही. या बैठकीत भारताने घेतलेला सर्वात मोठा निर्णय म्हणजे सिंधू नदी पाणी वाटप करार (Indus Water Treaty) तात्पुरता स्थगित करण्याचा. त्यामुळे दोन्ही देशांमधील तणाव आणखी वाढला आहे.

Web Title: We will kill every terrorist amit shah warn terrorists on pahalgam attack latest marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 01, 2025 | 07:47 PM

Topics:  

  • Amit Shah
  • Pahalgam Terror Attack
  • Pakistani Terrorist

संबंधित बातम्या

मोदी-शहा भेटीमागचं खरं कारण काय? सुनील तटकरेंचा मोठा खुलासा, राजकीय भेटींमुळे तर्कवितर्कांना उधाण
1

मोदी-शहा भेटीमागचं खरं कारण काय? सुनील तटकरेंचा मोठा खुलासा, राजकीय भेटींमुळे तर्कवितर्कांना उधाण

Priyanka Gandhi Criticized Mohan Bhagwat: जेन-झी ला तुमच्या प्रमाणपत्राची गरज नाही; प्रियांका गांधींचा मोहन भागवतांवर निशाणा
2

Priyanka Gandhi Criticized Mohan Bhagwat: जेन-झी ला तुमच्या प्रमाणपत्राची गरज नाही; प्रियांका गांधींचा मोहन भागवतांवर निशाणा

Bharatpol Digital Platform: ‘भारतपोल’ प्लॅटफॉर्मने बदलला तपासाचा चेहरा; ७ वर्षांत ३६ देशांतून २७४ गुन्हेगारांना आणले भारतात!
3

Bharatpol Digital Platform: ‘भारतपोल’ प्लॅटफॉर्मने बदलला तपासाचा चेहरा; ७ वर्षांत ३६ देशांतून २७४ गुन्हेगारांना आणले भारतात!

Parliament Monsoon Session: अमित शाह संसदेत का येत नाहीत? संसदेबाहेर ‘इंडिया’चा आक्रमक पवित्रा
4

Parliament Monsoon Session: अमित शाह संसदेत का येत नाहीत? संसदेबाहेर ‘इंडिया’चा आक्रमक पवित्रा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.