
Amit Shah, Kolhapur, Amit Shah Health, Kolhapur News, Maharashtra Politics
अमित शहा यांच्या दौऱ्यानिमित्त कोल्हापूर शहरात स्थानिक नेत्यांकडून स्वागताचे बॅनर लावण्यात आले होते. स्थानिक पोलिस प्रशासनाकडूनही कडक बंदोबस्तात दौऱ्याची तयारी करण्यात आली होती. पण दौरा रद्द झाल्याची माहिती मिळताच शहरातील स्वागताचे फलक आणि बॅनर हटवण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
अमित शाहा यांच्या हस्ते हुपरी येथील कल्लाप्पाणा आवाडे जवाहर शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या परिसरात ‘महालक्ष्मी ग्रीन एनर्जी’ प्रकल्पाचे भूमिपूजन करणार होते. ‘वेस्ट टू बेस्ट’ आणि ‘शून्य कचरा’ (Zero Waste) संकल्पनेवर आधारित या प्रकल्पांतर्गत ६०० कोटी रुपयांची गुंतवणूक केली जाणार आहे. तसेच कर्नाटकातील चिक्कोडी तालुक्यातील एकसंबा येथे विविध विकासकामांचे उद्घाटनही अमित शहा यांच्या हस्ते होणार होते.
भाजपचे स्थानिक आमदार राहुल आवाडे यांच्या माध्यमातून हुपरीतील कार्यक्रमाची मोठी तयारी केली होती. आता अमित शहा यांच्या अनुपस्थितीत हा कार्यक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र, याबाबत अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही.
Water Storage Crisis: पाणीटंचाईचे संकट गडद! धरणे-तलाव कोरडे; २२६ पैकी केवळ ५ प्रकल्पांत ५०