पश्चिम बंगाल: नुकतेच संदेचे अधिवेशन पार पडले. हे अधिवेशन वादळी ठरले. कारण या अधिवेशनात वक्फ संशोधन विधेयक सादर करण्यात आले. हे विधेयक लोकसभेत आणि त्यानंतर राज्यसभेत मंजूर करण्यात आले. मात्र या कायद्याला पश्चिम बंगालमधून मोठ्या प्रमाणात विरोध होत आहेत. मुर्शिदाबाद येथे मोठ्या प्रमाणात हिंसाचार भडकला आहे. दरम्यान पश्चिम बंगालच्या राज्यपालांनी आणि मानवाधिकार आयोगाने आज हिंसाग्रस्त भागाला भेट दिली.
पश्चिम बंगालचे राज्यपाल आनंद बोस यांनी मुर्शिदाबादचा दौरा केला. मानवाधिकार आयोग आणि राज्यपालांनी पीडित कुटुंबाच्या भेटी देखील घेतल्या. पीडित कुटुंबाची भेट घेतल्यानंतर राज्यपाल काय म्हणाले ते जाणून घेऊयात. ‘येथील पीडित कुटुंबांना सुरक्षेची खात्री हवी आहे. अर्थातच त्यांच्या काही इतर मागण्या किंवा सूचना देखील आहेत. या सर्वांचा विचार केला जाईल.”
राज्यपाल सी.व्ही. आनंद बोस, राष्ट्रीय महिला आयोग आणि राष्ट्रीय मानवाधिकार आयोग यांच्या हिंसाचारग्रस्त मुर्शिदाबाद दौऱ्यानंतर, राज्याच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची चिंता वाढण्याची शक्यता आहे. कारण ते सर्वजण केंद्र सरकारला हिंसाचाराशी संबंधित अहवाल पाठवतील.
वक्फ कायद्यावरून बंगाल पेटलं
मुर्शिदाबाद येथे मोठ्या प्रमाणात हिंसाचार भडकला आहे. या हिंसाचारात आतापर्यंत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. दरम्यान या ठिकाणी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी सुरक्षा दलाला पाचारण करण्यात आले आहे.
मुर्शिदाबाद येथे होणाऱ्या हिंसाचारावर केंद्र आणि राज्य सरकार लक्ष ठेवून आहे. हिंसाचाराचे लोण आणखी पसरू नये यासाठी मुर्शिदाबाद आणि अन्य काही जिल्ह्यांत इंटरनेट सेवा बंद करण्यात आली आहे. या हिंसाचारात आतापर्यंत १५० लोकांना अटक करण्यात आली आहे. पश्चिम बंगालचे राज्यपाल सिव्ही आनंद बोस व राजभवनाकडून परिस्थितीवर लक्ष ठेवले जात आहे.
मुर्शिदाबादमध्ये केंद्र सरकारने बीएसएफच्या जवळपास ९ तुकड्या तैनात केल्या आहेत. वेळ पडल्यास या ठिकाणी सीआरपीरफ आणि आरपीएफ दल सुद्धा तैनात केले जाऊ शकते. केंद्र सरकार त्या ठिकाणी संकटात साडपलेल्या लोकांना मदत करत आहे. पश्चिम बंगालमधील मुरशीदाबाद जिल्ह्यात उमरपूर-बानिपूर परिसरात आंदोलनाला हिंसक वळण लागले आहे. या वेळी आंदोलकांनी पोलिसांवर दगडफेक केली आहे. पोलिसांची वाहने पेटवली गेली आहेत. राष्ट्रीय महामार्ग देखील जाम केला गेला आहे. पोलिसांच्या वाहनाला आग लावल्याने येथे सध्या तानावाचे वातावरण निर्माण झाले आहे. पोलिसांनी या ठिकाणी कडक बंदोबस्त ठेवला आहे.