Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बृजभूषण सिंह यांच्याकडेच राहणार कुस्ती महासंघाची कमान; संजय सिंह ठरले विजयी; प्रतिस्पर्धी अनिता शेरॉन पराभूत

  • By युवराज भगत
Updated On: Dec 21, 2023 | 06:06 PM
बृजभूषण सिंह यांच्याकडेच राहणार कुस्ती महासंघाची कमान; संजय सिंह ठरले विजयी; प्रतिस्पर्धी अनिता शेरॉन पराभूत
Follow Us
Close
Follow Us:
WFI Election : कुस्ती महासंघाच्या अध्यक्षपदासाठी आज निवडणूक पार पडली. या निवडणुकीत संजय कुमार सिंह यांनी माजी कुस्तीपटू अनिता शेरॉन यांचा पराभव केला आहे. रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या (WFI) निवडणुकीचा निकाल समोर आला असून संजय कुमार सिंह यांनी ही निवडणूक जिंकली आहे. संजय सिंह हे भाजपाचे माजी खासदार आणि कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांचे निकटवर्तीय मानले जातात.
रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदासाठी
रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाच्या अध्यक्षपदासाठी आज (२१ डिसेंबर) निवडणूक पार पडली. संजय सिंह यांनी या निवडणुकीत माजी कुस्तीपटू अनिता शेरॉन यांचा पराभव केला आहे. एकूण ४७ जणांनी या निवडणुकीत मतदान केलं. यापैकी ४० मतं संजय सिंह यांच्या पारड्यात पडली तर अनिता यांना केवळ सात मतं मिळाली आहेत. दरम्यान, देवेंद्र कार्तियान यांची कुस्ती महासंघाच्या उपाध्यक्षपदी आणि प्रेमचंद लोजब यांची सरचिटणीसपदी नियुक्ती करण्यात आली आहे.
महिला कुस्तीपटूंचं लैंगिक शोषण
संजय सिंह याआधी कुस्ती महासंघाचे सदस्य होते. तसेच २०१९ मध्ये राष्ट्रीय कुस्ती महासंघाचे संयुक्त सचिवदेखील होते. तर माजी कुस्तीपटू अनिता शेरॉन यांना लोकप्रिय कुस्तीपटू बजरंग पूनिया, साक्षी मलिक, विनेश फोगाट यांच्यासह देशातल्या अनेक दिग्गज कुस्तीपटूंचं समर्थन मिळालं होतं. या कुस्तीपटूंनी बृजभूषण सिंह यांच्यावर महिला कुस्तीपटूंचं लैंगिक शोषण केल्याचे आरोप केले होते.
विरोधकांचे दिल्लीतल्या जंतर-मंतर मैदानावर आंदोलन
देशातल्या अनेक कुस्तीपटूंनी बृजभूषण शरण सिंह यांच्याविरोधात दिल्लीतल्या जंतर-मंतर मैदानात आंदोलनही केलं होतं. या आंदोलनानंतरही बृजभूषण यांच्याविरोधात कोणतीही मोठी कारवाई झाली नाही. दरम्यान, कुस्तीपटूंनी बृजभूषण यांना तसेच त्यांच्या घरातील कोणत्याही सदस्यांना कुस्ती महासंघाच्या निवडणुकीत उतरवू नये अशी मागणी केली होती. त्यामुळे संजय सिंह यांनी ही निवडणूक लढवली आणि जिंकली आहे. ते आता कुस्ती महासंघाचे नवे अध्यक्ष असतील.
बृजभूषण सिंह हे त्यांचा मुलगा प्रतीक आणि जावई विशाल सिंह यांना कुस्ती महासंघाच्या निवडणुकीत उतरवण्याच्या तयारीत होते. परंतु, कुस्तीपटूंच्या विरोधानंतर त्यांना हा निर्णय घेता आला नाही. त्यामुळे संजय सिंह यांनी ही निवडणूक लढवली. संजय सिंह हे बृजभूषण शरण सिंह यांचे निकटवर्तीय आहेत. दरम्यान, या निवडणुकीच्या निकालानंतर बृजभूषण सिंह यांचे जावई विशाल सिंह म्हणाले, “आमचं पॅनल जिंकलं आहे. आमचे सर्वच उमेदवार मोठ्या बहुमताने जिंकले आहेत.”

Web Title: Wfi election brijbhushan singh is incharge of wrestling federation sanjay singh wins anita sharon loses nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 21, 2023 | 05:48 PM

Topics:  

  • brijbhushan singh

संबंधित बातम्या

Brijbhushan Singh : ब्रिजभूषण सिंह भाजपला सोडचिठ्ठी देणार? अखिलेश यादव यांचं केलं तोंडभरून कौतुक
1

Brijbhushan Singh : ब्रिजभूषण सिंह भाजपला सोडचिठ्ठी देणार? अखिलेश यादव यांचं केलं तोंडभरून कौतुक

“राहुल गांधी हे कठपुतली, ते पंतप्रधान कधीच होणार नाही…; बृजभूषण शरण सिंह यांचा जोरदार घणाघात
2

“राहुल गांधी हे कठपुतली, ते पंतप्रधान कधीच होणार नाही…; बृजभूषण शरण सिंह यांचा जोरदार घणाघात

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.