Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

यंदा निवडणुकीचे वारे NOTA कडे गेल्यास काय होणार; सर्वोच्च न्यायालयाची आयोगाला नोटीस; उत्तर देण्याचे निर्देश

मतदान यंत्रावरील नोटा पर्यायाला जर सर्वाधिक मतदान झाले, तर त्या मतदारसंघात नव्याने निवडणुका घेण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला उत्तर दाखल करण्यास नोटीस बजावली आहे.

  • By युवराज भगत
Updated On: Apr 26, 2024 | 03:48 PM
What happens if the note is voted on; Supreme Court Notice to Commission

What happens if the note is voted on; Supreme Court Notice to Commission

Follow Us
Close
Follow Us:

Supreme Court on Nota : देशात लोकसभा निवडणुकीचा आज (दि. २६ एप्रिल) दुसरा टप्पा सुरू आहे. देशभरातील ८८ मतदारसंघात आज मतदान पार पडत आहे. अशातच देशाच्या सर्वोच्च न्यायालयात एक महत्त्वूपर्ण याचिका दाखल झाली आहे. मतदान यंत्रावर सर्व उमेदवारांच्या यादीखाली ‘नोटा’चा पर्याय दिलेला असतो. वरीलपैकी एकही उमेदवार योग्य वाटला नसल्यास या पर्यायाला मतदान करून मतदार आपली असहमती दर्शवत असतात.

नोटाला जर सर्वाधिक मतदान मिळाले तर….

पण या पर्यायाला जर सर्वाधिक मतदान झालं तर पुढे काय? असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. नोटाला केलेले मतदान वाया जाते, असेही अनेकांचे मत आहे. त्यामुळेच नोटाला जर सर्वाधिक मतदान मिळाले, तर त्या मतदारसंघातील निवडणूकच बाद ठरविण्यात यावी, अशी मागणी करणाची याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे.

निवडणूक आयोगाला नोटीस बजावली….

सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणात आता निवडणूक आयोगाला नोटीस बजावली असून त्यावर उत्तर दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत. एएनआय वृत्तसंस्थेने याबाबतचे वृत्त दिले आहे.
“नोटापेक्षा कमी मतदान मिळवणाऱ्या उमेदवारंना पाच वर्षांच्या कालावधीसाठी सर्व निवडणुका लढवण्यापासून रोखले जावे. तसेच नोटा हा काल्पनिक उमेदवार म्हणून सुनिश्चित करण्यासाठी नियमावली तयार करण्यात यावी, अशी मागणी याचिकेद्वारे करण्यात आली.

मतदारसंघातील निवडणूकच रद्द करावी

२०२१ सालीदेखील अशाच प्रकारची याचिका दाखल झाली होती. जर नोटा या पर्यायाला सर्वाधिक मतदान झाले तर त्या मतदारसंघातील निवडणूकच रद्द करावी, असे याचिकेतून म्हटले गेले. त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे तत्कालीन सरन्यायाधीश शरद बोबडे, न्या. ए. एस. बोपण्णा आणि न्या. व्ही. रामसुब्रमण्यम यांनीही निवडणूक आयोग आणि कायदा व सामाजिक न्याय विभागाला लेखी उत्तर देण्याचे आदेश दिले होते.

‘नोटा’ म्हणजे काय?
मतदान यंत्रावर दिलेल्या यादीमध्ये दिलेल्या उमेदवारांपैकी एकही उमेदवार पसंत नसेल तर? तर अशावेळी NOTA चा पर्याय निवडणूक आयोगाने दिला आहे. पण नोटा म्हणजे काय? तर नोटा म्हणजे None Of The Above (‘यापैकी कुणीही नाही’). जर EVM वर असलेला उमेदवार तुम्हाला पसंत नसेल तर नोटाला मत देण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे. पहिल्यांदा नोटाचा वापर २०१३ मध्ये झाला. छत्तीसगड, मिझोरम, राजस्थान आणि मध्यप्रदेश, दिल्ली या ठिकाणी झालेल्या मतदानावेळी नोटाचा वापर झाला होता.

उमेदवारांना तिकिट देऊ नये

राजकीय पक्षांनी गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या उमेदवारांना तिकिट देऊ नये या हेतूने ‘नोटा’चा पर्याय अंमलात आणण्याची गरज भासल्यामुळे, सर्वोच्च न्यायालयाने सप्टेंबर २०२३मध्ये ‘नोटा’च्या बाजूने निकाल दिला होता. गेल्या पाच वर्षांमध्ये झालेल्या लोकसभा निवडणुका आणि विधानसभा निवडणुका यामध्ये १.२९ कोटींपेक्षा जास्त मतदारांनी ‘नोटा’चा पर्याय निवडला. असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक असोसिएशनच्या (एडीआर) अहवालानुसार, या कालावधीमध्ये लोकसभा, तसेच विधानसभांमधील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या विजयी उमेदवारांची संख्याही वाढली.

Web Title: What happens if the note is voted on supreme court notice to commission nryb

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Apr 26, 2024 | 03:42 PM

Topics:  

  • Lok Sabha Election 2024

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.