Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ladki Bahin Yojana |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • crime news |
  • devendra fadnavis
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Cockroach Janata Party: सोशल मीडियावर ‘कॉकरोच जनता पार्टी’चं वादळ; मस्करीतून सुरू झालेली CJP लाखो तरुणांचा आवाज कशी बनली?

Cockroach Janata Party: अभिजीत दीपके यांना सोशल मीडिया कॅम्पेन आणि राजकीय संदेश व्हायरल करण्याचा अनुभव असल्याचे सांगितले जाते. 2020 ते 2022 या कालावधीत ते आम आदमी पार्टीच्या सोशल मीडिया टीममध्ये स्वयंसेवक म्हणून कार्यरत होते.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: May 20, 2026 | 04:21 PM
Cockroach Janata Party, CJP Viral Trend, Abhijit Deepke,

Cockroach Janata Party, CJP Viral Trend, Abhijit Deepke,

Follow Us
Close
Follow Us:
  • ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) 72 तासांत सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल
  • तीन दिवसांतच 20 लाखांहून अधिक फॉलोअर्स झाल्याची चर्चा
  • अभिजीत दीपके यांना सोशल मीडिया कॅम्पेन आणि राजकीय संदेश व्हायरल करण्याचा अनुभव
Cockroach Janata Party: सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X आणि इन्स्टाग्रामवर गेल्या 72 तासांपासून ‘कॉकरोच जनता पार्टी’ (CJP) हे नाव प्रचंड चर्चेत आले आहे. सुरुवातीला केवळ विनोदी आणि व्यंगात्मक स्वरूपात सुरू झालेल्या या ऑनलाइन मोहिमेला अल्पावधीत मोठा प्रतिसाद मिळाला असून, तीन दिवसांतच लाखाहून अधिक युवक या अभियानाशी जोडले गेल्याचा दावा केला जात आहे. तसेच इन्स्टाग्रामवर या पेजचे 20 लाखांहून अधिक फॉलोअर्स झाल्याची चर्चा आहे.

या संपूर्ण व्हायरल मोहिमेच्या केंद्रस्थानी आहेत अभिजीत दीपके हे 30 वर्षीय तरुण. बेरोजगार तरुण, सोशल मीडियावर सतत सक्रिय असलेले युवक आणि व्यवस्थेविरोधातील नाराजी यांना व्यंगात्मक पद्धतीने आवाज देण्याचा प्रयत्न या मोहिमेतून होत असल्याचे मानले जात आहे.

Rahul Gandhi criticism:  ‘हे नेतृत्व नाही, तर नौटंकी…’; नरेंद्र मोदी- जॉर्जिया मेलोनींच्या भेटीवरून राहुल गांधींनी वाभाडे काढले

कोण आहेत अभिजीत दीपके?

मुळचे महाराष्ट्रातील छत्रपती संभाजीनगर (औरंगाबाद) येथील अभिजीत दीपके हे व्यावसायिक पॉलिटिकल कम्युनिकेशन स्ट्रॅटेजिस्ट म्हणून ओळखले जातात. त्यांनी पुण्यात पत्रकारितेचे शिक्षण पूर्ण केले असून त्यानंतर उच्च शिक्षणासाठी अमेरिकेत गेले. नुकतीच त्यांनी अमेरिकेतील Boston University मधून पब्लिक रिलेशन्स (PR) विषयात मास्टर ऑफ सायन्स (MS) पदवी पूर्ण केली आहे.

सोशल मीडिया आणि राजकारणाशी जुडलेला अनुभव

अभिजीत दीपके यांना सोशल मीडिया कॅम्पेन आणि राजकीय संदेश व्हायरल करण्याचा अनुभव असल्याचे सांगितले जाते. 2020 ते 2022 या कालावधीत ते आम आदमी पार्टीच्या सोशल मीडिया टीममध्ये स्वयंसेवक म्हणून कार्यरत होते. दिल्ली विधानसभा निवडणुकीदरम्यान व्हायरल झालेल्या अनेक मीम मोहिमांमध्ये त्यांची भूमिका महत्त्वाची असल्याची चर्चा होती.

याशिवाय ते दिल्ली शिक्षण विभागात कम्युनिकेशन अॅडव्हायझर म्हणूनही काम पाहत होते. सोशल मीडियाची भाषा, तरुणांची मानसिकता आणि इंटरनेटवरील ट्रेंड्स यांची त्यांना चांगली जाण असल्याचे मानले जाते.

Chemist Strike: देशभरात आज औषध विक्रेत्यांचा संप; 15 लाख केमिस्ट्स राहणार बंद, तुमच्या राज्यातील स्थिती काय?

‘कॉकरोच जनता पार्टी’ची कल्पना कशी सुचली?

मीडिया रिपोर्टनुसार, या व्यंगात्मक मोहिमेची सुरुवात सर्वोच्च न्यायालयातील एका कथित मौखिक टिप्पणीपासून झाली. 15 मे 2026 रोजी बनावट पदवी प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी काही बेरोजगार युवक ‘कॉकरोचप्रमाणे व्यवस्थेत घुसतात’ अशा आशयाची टिप्पणी केल्याचा दावा सोशल मीडियावर करण्यात आला.

नंतर न्यायालयाकडून नंतर, ही टिप्पणी सर्वसामान्य बेरोजगार युवकांसाठी नसून बनावट पदवीधारकांसाठी असल्याचे म्हटलं. मात्र तोपर्यंत सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात प्रतिक्रिया उमटू लागल्या होत्या.

नीट पेपर लीक, बेरोजगारी आणि स्पर्धा परीक्षांमधील गोंधळामुळे आधीच नाराज असलेल्या युवकांच्या भावना लक्षात घेऊन अभिजीत दीपके यांनी 16 मे रोजी X वर एक व्यंगात्मक पोस्ट केली. “जर सगळे कॉकरोच एकत्र आले तर?” असा प्रश्न विचारत त्यांनी ‘कॉकरोच जनता पार्टी’ नावाची वेबसाइट आणि गूगल फॉर्म सुरू केला.

‘क्रॉनिकली ऑनलाइन’ तरुणांना आकर्षण

या मोहिमेत सहभागी होण्यासाठी ठेवलेल्या अटींनी Gen-Z पिढीचे विशेष लक्ष वेधले. “बेरोजगार, आळशी, सतत इंटरनेटवर असणारे (Chronically Online) आणि प्रोफेशनल पद्धतीने दुःख व्यक्त करू शकणारे” अशी मजेशीर पात्रता या फॉर्ममध्ये नमूद करण्यात आली होती.

याच व्यंगात्मक शैलीमुळे ही मोहीम झपाट्याने व्हायरल झाली. सोशल मीडियावर अनेकांनी याला बेरोजगार तरुणांच्या नाराजीचा नवा चेहरा असे संबोधले.

Web Title: What is cockroach janata party viral cjp campaign takes social media by storm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 20, 2026 | 04:21 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.