नवी दिल्ली: भारताचे माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे गुरुवारी (26 डिसेंबर) रोजी रात्री 9.51 वाजता निधन झाले. मनमोहन सिंग यांची प्रकृती रात्री अचानक बिघडल्यामुळे त्यांना त्यांना तातडीने एम्समध्ये दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी त्यांना वाचवण्याचे अनेक प्रयत्न केले पण रूग्णालयातच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ९२ वर्षांचे होते. आज दुपारी 1 वाजता दिल्लीतील निगमबोध स्मशान घाटावर त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. काँग्रेसकडून दिल्लीतील राजघाटावर त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात यावेत अशी मागणी केली जात होती. पण नंतर निगमबोध स्मशान घाटावर अंति संस्कार करण्यात आले. ज्या निगमबोध घाटावर त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले त्या घाटाचा वेगळा इतिहास आहे.
निगम बोध घाट सध्या दिल्लीतील सर्वात व्यस्त स्मशानभूमी आहे. महाभारत काळात पांडवांचा मोठा भाऊ आणि इंद्रप्रस्थचा राजा युधिष्ठिर याने याची स्थापना केली होती असे मानले जाते. येथे हिंदू रितीरिवाजांनुसार अंत्यसंस्कार केले जातात. दिल्लीचा हा सर्वात जुना घाट ऐतिहासिक लाल किल्ल्यामागे आहे. निगम बोध घाट हा सर्वात व्यस्त घाटांपैकी एक आहे. येथे एका दिवसात सरासरी 50-50 मृतदेहांवर अंत्यसंस्कार केले जातात.निगम बोध घाट येथे 1950 च्या दशकात बांधलेले विद्युत स्मशानभूमी देखील आहे. 2006 साली महापालिकेने येथे सीएनजीवर चालणारे दुसरे स्मशानभूमी बांधले होते.
राजेश खन्ना यांची अजरामर कलाकृती ‘आनंद’ मराठीमध्ये येणार, कुसुमाग्रजांनी लिहिलेल्या
निगम बोध घाट महाभारत काळात पांडवांचा मोठा भाऊ आणि इंद्रप्रस्थचा राजा युधिष्ठिर याने याची स्थापना केली होती असे मानले जाते. येथे हिंदू रितीरिवाजांनुसार अंत्यसंस्कार केले जातात. घाटाच्या प्रवेशद्वाराजवळ भगवान शिवाला समर्पित नील छत्री मंदिर आहे. मान्यतेनुसार त्याची स्थापना युधिष्ठिराने केली होती. कोरोनाच्या काळात येथे मोठ्या प्रमाणात लोकांचे मृतदेह जाळण्यात आले होते.
भारतातील अनेक बड्या व्यक्तींचे अंत्यसंस्कार निगम बोध घाटावर झाले आहेत. दिल्लीच्या माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित आणि भाजपचे ज्येष्ठ नेते अरुण जेटली यांच्यावरही येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. शीला दीक्षित यांचे 20 जुलै 2019 रोजी निधन झाले. तर अरुण जेटली यांचे 24 ऑगस्ट 2019 रोजी निधन झाले.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात चर्चेत असणारा वाल्मिक कराड आहे तरी कोण? धनंजय मुंडेंशी