सौजन्य - नवराष्ट्र टीम
बीड : राज्यामध्ये बीड हत्या प्रकरणावरुन जोरदार वातावरण तापले आहे. बीडचे मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख यांचे अपहरण करुन त्यांची निर्घुणपणे हत्या करण्यात आली. यामुळे लातूर, बीडसह राज्यभरातून रोष व्यक्त केला जात आहे. या प्रकरणातील आरोप देखील अद्याप अटक न झाल्यामुळे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांना विरोधकांनी घेरले आहे. तसेच या प्रकरणाचा मास्टरमाईंड वाल्किम कराड हा देखील फरार असल्यामुळे तसेच त्याचे मंत्री धनंजय मुंडे यांच्याशी निकटचे संबंध असल्यामुळे महायुती सरकारवर निशाणा साधला जात आहे. मात्र हे वाल्मिक कराड आहे तरी कोण? जाणून घेऊयात.
वाल्मिक कराडला वाल्मिक अण्णा म्हणून बीड तालुक्यामध्ये ओळखले जाते. मात्र वाल्मिक कराड यांच्याशिवाय धनंजय मुंडे यांचे पानदेखील हालत नाही’, हे विधान स्वत: पंकजा मुंडे यांनी एका भाषणात केले होते. भाजप आमदार सुरेश धसही जाहीरपणे बोलले आहेत. गोपीनाथ मुंडेंनी घरकामासाठी ठेवलेला मुलगा अशी कराडांची ओळख होती. वाल्मिक कराड हा गोपीनाथ मुंडे यांच्या घरी काम करत होता असं म्हटलं जातं. वाल्मिक कराड आणि धनंजय मुंडे दोघे चांगले मित्र होते, जेव्हा धनंजय मुंडे यांनी गोपीनाथ मुंडेपासून दूर झाले तेव्हा वाल्मिक कराड हा धनंजय मुंडेसोबत आला. त्यानंतर धनंजय मुंडेंचे सर्व आर्थिक व्यवहार आणि मोठे कार्यक्रम घेण्याची जबाबदारी वाल्मिक कराड पार पाडत होता.
वाल्मिक कराड हे परळी नगर परिषदेचे माजी नगरसेवक व उपनगराध्यक्ष माझी गटनेते आहे. नाथं प्रतिष्ठानचे सदस्य व लाडकी बहीण योजनेचे तालुका स्तरावरील समितीचे सदस्य अथवा अध्यक्ष जिल्हा स्थायी समिती सदस्य आणि मंत्री धनंजय मुंडे यांचे कट्टर समर्थक म्हणून ओळखले जातात. मंत्री धनंजय मुंडे यांचे जिवलग मित्र म्हणून ओळखले जाते. गेल्या दहा वर्षापासून परळी मतदारसंघातील राजकीय व्यवस्थापनाची जबाबदारी कराडने सांभाळली आहे.
हे सुद्धा वाचा : अंजली दमानियांचा बीडमध्ये एल्गार! वाल्मिक कराड अन् मुंडेंना दिला इशारा
धनंजय मुंडे पालकमंत्री असताना एक प्रकारे कराड जिल्हा चालवायचा. धनंजय मुंडे पालकमंत्री असताना दरारा होता. विशेष म्हणजे, यापूर्वीही वाल्मिक कराड याच्यावर गंभीर गुन्हे दाखल झालेले आहेत. कराड याचे अनेक नेत्यांसोबत फोटो आहेत, ज्यात सध्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे व शरदचंद्र पवार यांच्यासह अन्य प्रमुख राजकीय नेत्यांचा समावेश आहे. आता केज पोलीस ठाण्यात कराडविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.