Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

त्सुनामीच्या धोक्याला तोंड देण्यासाठी भारताचा मोठा निर्णय; कुठे आहे भारतातील पहिले त्सुनामी प्रतिरोधक मेट्रो स्टेशन?

रशिया आणि जपान सारख्या विकसित अर्थव्यवस्था अजूनही नैसर्गिक आपत्तींशी झुंजत आहेत. त्याच वेळी, आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर करून भारत पुढे जात आहे.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jul 30, 2025 | 04:27 PM
त्सुनामी प्रतिरोधक मेट्रो स्टेशन

त्सुनामी प्रतिरोधक मेट्रो स्टेशन

Follow Us
Close
Follow Us:

Tusnami-resistant metro station:  रशियाच्या कामचटका द्वीपकल्पाजवळील समुद्रात ८.८ तीव्रतेच्या भूकंपाने संपूर्ण पॅसिफिक प्रदेश हादरला आहे. या भूकंपाचे धक्के इतके शक्तिशाली होते की रशिया आणि जपानच्या किनारपट्टी भागात ४ मीटर उंचीपर्यंतच्या त्सुनामीच्या लाटा उसळल्या. या नंतर रशिय प्रशासनाने सकर्तकेचा इशारा जारी केला असून समुद्रकिनाऱ्यावरील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. या त्सुनामीमध्ये किनारपट्टीवरील अनेक इमारती बुडाल्या आहेत आणि मोठ्या प्रमाणात समुद्राचे पाणी शहरी भागात शिरले आहे. रशियाच्या सखालिन प्रदेशात परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. तर उत्तर कुरिल बेटांवर आणीबाणी जाहीर करण्यात आली आहे.

त्याच वेळी, जपानच्या राष्ट्रीय हवामान विभागाकडून लाटा आणखी मोठ्या होऊ शकतात असा इशारा दिला आहे. पूर्व आणि उत्तरेकडील किनारी शहरांना सतर्क राहण्यास सांगितले आहे. अमेरिकेच्या हवामान विभागाने हवाई, ग्वामा आणि कॅलिफोर्नियाच्या काही भागांसाठी त्सुनामीचा इशाराही जारी केला आहे. भविष्यात अशा आपत्तींना तोंड देण्यासाठी भारताने आता तयारी सुरू केली आहे. पण त्याचवेळी भारतात एक असे मेट्रो स्टेशन बांधले जात आहे जे पूर्णपणे त्सुनामी प्रतिरोधक असेल.

Congress Politics: जालन्यात काँग्रेसचा गड ढासळला! वरपुडकर यांच्यापाठोपाठ आणखी एक माजी आमदार भाजपच्या गळाला

रशिया आणि जपानसारख्या देशांना त्सुनामीसारख्या समुद्रातून येणाऱ्या नैसर्गिक आपत्तींचा मोठा फटका बसतो. अशा आपत्तींपासून बचाव करण्यासाठी भारतानेही महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. चेन्नईतील मरीना बीचजवळ उभारले जाणारे ‘लाइटहाऊस मेट्रो स्टेशन’ हे देशातील पहिले त्सुनामी-प्रतिरोधक मेट्रो स्टेशन ठरणार आहे.

या स्टेशनची रचना चेन्नई मेट्रो रेल लिमिटेड (CMRL) ने विशेष युरोपीयन तंत्रज्ञानाच्या मदतीने केली आहे. या रचनेत स्वयंचलित पूरदरवाज्यांचा समावेश असून, समुद्राची पातळी वाढल्यास हे दरवाजे आपोआप बंद होतील. त्यामुळे समुद्राचे पाणी स्टेशनच्या आत शिरू शकणार नाही.२००४ साली आलेल्या विनाशकारी त्सुनामीनंतर मरीना बीच परिसरातील सुरक्षेबाबत अनेक प्रश्न उपस्थित झाले होते. त्यामुळे भविष्यातील संभाव्य धोके लक्षात घेऊन हे अत्याधुनिक व संरक्षक पाऊल उचलण्यात आले आहे.

Malegaon Bomb Blast Case: ‘ती’ चिमुरडी वडापाव आणण्यासाठी गेली ती परत आलीच नाही

मेट्रो स्टेशनचे आधुनिक बांधकाम आणि वैशिष्ट्ये

लाईटहाऊस मेट्रो स्टेशनची लांबी ४१४ मीटर आणि रुंदी ३५ मीटर आहे, ज्यामुळे ते चेन्नई सेंट्रल मेट्रो स्टेशनपेक्षा मोठे आहे. या स्थानकात १२ गाड्या सामावून घेण्याची क्षमता असलेले ६ ट्रॅक आहेत आणि त्याचे प्लॅटफॉर्म कॉन्कोर्स पातळीच्या वर आहेत. त्याच वेळी, फ्लेमिंगो नावाची टनेल बोरिंग मशीन येथे २ किलोमीटर लांबीचा बोगदा खोदत आहे, जो स्टेशनला कचारी रोड आणि थिरुमयलाई मेट्रो स्टेशनशी जोडेल. चेन्नई मेट्रोच्या दुसऱ्या टप्प्याअंतर्गत, हा कॉरिडॉर २०२५ ते २०२८ दरम्यान सर्वसामान्यांसाठी खुला केला जाईल.

त्सुनामीच्या धोक्याला तोंड देण्यासाठी भारताचे पहिले ठोस पाऊल

रशिया आणि जपान सारख्या विकसित अर्थव्यवस्था अजूनही नैसर्गिक आपत्तींशी झुंजत आहेत. त्याच वेळी, आपत्ती व्यवस्थापन क्षेत्रात तंत्रज्ञानाचा वापर करून भारत पुढे जात आहे. चेन्नईचे त्सुनामी प्रतिरोधक स्टेशन केवळ भविष्यातील गरजा लक्षात घेऊन बांधले जात नाही तर ते जागतिक स्तरावर आपत्ती व्यवस्थापनासाठी एक उदाहरण देखील बनू शकते.

 

Web Title: Which is the first tsunami resistant metro station to be built in india to address the threat of tsunamis

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 30, 2025 | 04:25 PM

Topics:  

  • Russia Earthquake

संबंधित बातम्या

रशियातील कामचटका प्रदेश हादरला; भूकंपानंतर आता ज्वालामुखीचा स्फोट, VIDEO
1

रशियातील कामचटका प्रदेश हादरला; भूकंपानंतर आता ज्वालामुखीचा स्फोट, VIDEO

10 Most Powerful Earthquakes in the World: जगातील आतापर्यंतचे १० शक्तीशाली भुकंप- पाहा फोटो
2

10 Most Powerful Earthquakes in the World: जगातील आतापर्यंतचे १० शक्तीशाली भुकंप- पाहा फोटो

Russia Earthquake : जमीन हादरली, वस्तू पडल्या… क्षणार्धात झालं नष्ट ; रशियाचा भूकंपाचा अंगावर काटा आणणारा VIDEO
3

Russia Earthquake : जमीन हादरली, वस्तू पडल्या… क्षणार्धात झालं नष्ट ; रशियाचा भूकंपाचा अंगावर काटा आणणारा VIDEO

शक्तिशाली भूकंपाने हादरला रशिया; 8.7 तीव्रतेचा मोठा भूकंप, जपानपासून अमेरिकेपर्यंत त्सुनामीचा इशारा
4

शक्तिशाली भूकंपाने हादरला रशिया; 8.7 तीव्रतेचा मोठा भूकंप, जपानपासून अमेरिकेपर्यंत त्सुनामीचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.