Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 17 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Diwali |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

India National Animal : कधीकाळी सिंह होता भारताचा राष्ट्रीय प्राणी! 1972 मध्ये वाघाला का मिळाला हा मान? जाणून घ्या रंजक इतिहास

India National Animal : भारताचा राष्ट्रीय प्राणी आधी वाघ नव्हे तर सिंह होता. 1969 मध्ये सिंहाला हा मान मिळाला होता. मात्र, 18 नोव्हेंबर 1972 रोजी रॉयल बंगाल टायगरला राष्ट्रीय प्राणी घोषित करण्यात आले. जाणून घ्या यामागचा इतिहास आणि वाघ संवर्धनाची माहिती.

  • By Rakesh Khedekar
Updated On: Nov 17, 2026 | 08:54 PM
India National Animal : कधीकाळी सिंह होता भारताचा राष्ट्रीय प्राणी! 1972 मध्ये वाघाला का मिळाला हा मान? जाणून घ्या रंजक इतिहास

India National Animal : कधीकाळी सिंह होता भारताचा राष्ट्रीय प्राणी! 1972 मध्ये वाघाला का मिळाला हा मान? जाणून घ्या रंजक इतिहास

Follow Us
Follow Us:
  • वाघ पर्यावरणीय संतुलनासाठी महत्त्वाचा
  • 1973 मध्ये सुरू झाला ‘प्रोजेक्ट टायगर’
  • देशात 58 व्याघ्र प्रकल्पांचे जाळे
 

India National Animal : भारताचा राष्ट्रीय प्राणी असलेला वाघ केवळ शक्ती आणि शौर्याचे प्रतीक नाही, तर देशाच्या जैवविविधतेचा आणि पर्यावरणीय संतुलनाचा महत्त्वाचा घटकही आहे. मात्र, वाघाला सुरुवातीपासूनच भारताचा राष्ट्रीय प्राणी म्हणून मान्यता मिळाली नव्हती. कारण 1969 मध्ये सिंहाला राष्ट्रीय प्राणी घोषित करण्यात आले होते.
त्यानंतर 18 नोव्हेंबर 1972 रोजी रॉयल बंगाल टायगरला भारताचा राष्ट्रीय प्राणी म्हणून मान्यता देण्यात आली. आज भारतात जगातील 70 टक्क्यांहून अधिक वाघ असल्याचे सांगितले जाते.

आधी सिंह होता भारताचा राष्ट्रीय प्राणी

भारताच्या इतिहासात वाघाला शक्ती आणि वर्चस्वाचे प्रतीक मानले गेले आहे. जुन्या नाण्यांपासून राजमुद्रा आणि मंदिरांवरील कोरीव शिल्पांपर्यंत अनेक ठिकाणी वाघाचे चित्र पाहायला मिळते. मात्र, 9 जुलै 1969 रोजी सिंहाला भारताचा राष्ट्रीय प्राणी घोषित करण्यात आले होते. त्यानंतर 18 नोव्हेंबर 1972 रोजी रॉयल बंगाल टायगरला हा मान देण्यात आला. तेव्हापासून वाघ भारताची समृद्ध जैवविविधता आणि नैसर्गिक वारसा यांचे प्रतीक बनला आहे.

Sahayata Setu : भीषण चक्रीवादळाचा सामना करण्यासाठी भारताची मोठी तयारी; 24 मित्रदेशांसोबत ‘सहायता सेतू-2026’ सराव सुरू!

वाघ पर्यावरणीय संतुलनासाठी महत्त्वाचा

वाघ हा जंगलातील सर्वोच्च शिकारी प्राणी असून त्याला ‘अंब्रेला स्पीशीज’ म्हणजेच संरक्षण छत्र प्रजाती म्हणूनही ओळखले जाते. वाघांच्या नैसर्गिक अधिवासाचे संरक्षण केल्यामुळे जंगले, नद्या आणि इतर असंख्य प्रजातींचेही संरक्षण होते.

जंगलांमुळे जलस्रोतांचे नियमन, मातीचे संरक्षण, परागीभवन आणि स्थानिक हवामानाचा समतोल राखण्यास मदत होते. तसेच नैसर्गिक आपत्तींचा धोका कमी करण्यासही जंगलांची महत्त्वाची भूमिका असते. त्यामुळे वाघ आणि त्याच्या अधिवासाचे संरक्षण हे केवळ एका प्रजातीपुरते मर्यादित नसून संपूर्ण पर्यावरणासाठी आवश्यक आहे.

Nitin Nabin : यूपीत विजयाची हॅट्ट्रिक साधणार; 2027 मध्ये पुन्हा सत्ता मिळवण्याचा नितीन नवीन यांचा दावा

1973 मध्ये सुरू झाला ‘प्रोजेक्ट टायगर’

भारतात वाघांची घटणारी संख्या लक्षात घेऊन त्यांच्या संवर्धनासाठी एप्रिल 1973 मध्ये ‘प्रोजेक्ट टायगर’ सुरू करण्यात आले. उत्तराखंडमधील जिम कॉर्बेट राष्ट्रीय उद्यानातून या प्रकल्पाची सुरुवात झाली. या उपक्रमामुळे देशातील वाघांच्या संरक्षणाला संस्थात्मक स्वरूप मिळाले.

भारताच्या वाघ संवर्धनाच्या प्रयत्नांना जागतिक स्तरावरही महत्त्व प्राप्त झाले आहे. 2006 पासून देशातील वाघांची संख्या दुपटीपेक्षा अधिक झाली आहे. 2022 च्या अखिल भारतीय व्याघ्र गणनेनुसार भारतात 3 हजार 682 वाघांची नोंद झाली होती. या सर्वेक्षणात 20 राज्यांचा समावेश होता. यासाठी 6.41 लाख चौरस किलोमीटरपेक्षा अधिक क्षेत्रात पायी फिरून पाहणी करण्यात आली होती.

देशात 58 व्याघ्र प्रकल्पांचे जाळे

राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या (NTCA) 2023 मधील अहवालानुसार, ‘प्रोजेक्ट टायगर’ अंतर्गत वाघांचे वास्तव्य असलेल्या 18 राज्यांमध्ये 58 व्याघ्र प्रकल्पांचे जाळे उभारण्यात आले आहे. हे प्रकल्प सुमारे 84 हजार 500 चौरस किलोमीटर क्षेत्रात पसरलेले आहेत. हे क्षेत्र भारताच्या एकूण भौगोलिक क्षेत्रफळाच्या सुमारे 2.56 टक्के आहे.

नैसर्गिक अधिवासाचे संरक्षण, शास्त्रीय पद्धतीने वाघांची गणना, नियमित देखरेख आणि विविध यंत्रणांमधील समन्वय यामुळे भारतातील वाघ संवर्धनाच्या प्रयत्नांना बळ मिळत असल्याचेही पाहण्यास मिळाले आहे.

💡

Frequently Asked Questions

  • Que: भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे?

    Ans: रॉयल बंगाल टायगर हा भारताचा राष्ट्रीय प्राणी आहे. तो शक्ती, शौर्य आणि देशाच्या जैवविविधतेचे प्रतीक मानला जातो.

  • Que: भारताचा राष्ट्रीय प्राणी आधी कोणता होता?

    Ans: वाघापूर्वी सिंह हा भारताचा राष्ट्रीय प्राणी होता. 9 जुलै 1969 रोजी सिंहाला हा मान देण्यात आला होता.

  • Que: वाघाला भारताचा राष्ट्रीय प्राणी कधी घोषित करण्यात आले?

    Ans: 18 नोव्हेंबर 1972 रोजी रॉयल बंगाल टायगरला भारताचा राष्ट्रीय प्राणी घोषित करण्यात आले.

Web Title: Why tiger became india national animal lion 1972 history rk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 17, 2026 | 08:54 PM

Topics:  

  • Tiger Project
  • West bengal

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.