शहरी भागात दररोज वाघ आणि बिबट्यांचे आगमन होत असल्याने सामान्य जीवन कठीण होत आहे. मध्य प्रदेशनंतर उत्तर प्रदेश आणि राजस्थान देखील व्याघ्र राज्याचा दर्जा मिळविण्याकडे वाटचाल करत आहेत.
२९ जुलैला जगभरात सगळीकडे आंतरराष्ट्रीय व्याघ्र दिन साजरा केला जातो. वाघांच्या संख्येत मोठ्या प्रमाणावर घट झाल्यामुळे यंदाच्या वर्षी वाघांच्या संरक्षणाच्या दृष्टीने 'चला वाघ वाचवू' ही संकल्पना राबवण्यात आली आहे.
नुकत्याच झालेल्या प्राणी जनगणेत या प्रकल्पात 63 वाघ आढळून आल्याने व्याघ्र दर्शनाच्या अनेकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. असे असले तरी तुलनात्मक ताडोबात पर्यटकांची संख्या घटली आहे.
रामटेक वनपरीक्षेत्रातील बोरडा ग्रामपंचायत अंतर्गत सत्रापूर गावात आठवड्यापासून वाघाने धुमाकूळ घातला असून भरदिवसा प्राण्यांवर दररोज होणाऱ्या हल्ल्यांमुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
भारतीय वाघांचे संरक्षण केवळ या भव्य प्राण्याच्या अस्तित्वाचे नव्हे, तर जंगल, जैवविविधता आणि पर्यावरण या त्याच्या संपूर्ण अधिवासाच्या संतुलनाचा एक महत्त्वाचा भाग आहे.
नागपूर जिल्ह्यातील उमरेड-कऱ्हांडला-पवनी अभयारण्यातील वाघिणी आणि पिल्लांचा मार्ग रोखल्याच्या प्रकरणाची मुंबई उच्च न्यायालयाने दखल घेतली आहे. त्यामुळे वनविभागही सतर्क झाला आहे. आता विभागाने यासाठी नियम लागू केले आहेत.
राज्यात अनेक व्याघ्र प्रकल्प राबवण्यात आले आहेत. त्यातील पेंच व्याघ्र प्रकल्पात असलेल्या पूर्व पेंच वन परिक्षेत्रातील सिल्लारी जवळ असलेल्या गाभा क्षेत्रामध्ये पर्यटकांसमोर एका वाघिणीचा मृत्यू झाला आहे.
ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमध्ये मरोडा येथील एका जणाचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाला (A man from Maroda died in a tiger attack). ही घटना रविवारी सकाळी साडेआठ वाजता समोर आली.…