Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कर्करोग बरा होईल या अंधश्रद्धेतून पोटच्या मुलाला आईनेच गंगेत बुडवलं; मुलाचा दुर्दैवी मृत्यू

आजार बरा करण्यासाठी पोटच्या मुलाला आईने गंगेमध्ये बुडवले आणि त्यामध्ये मुलाचा दुर्देवी मृत्यू झाला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Jan 25, 2024 | 01:04 PM
कर्करोग बरा होईल या अंधश्रद्धेतून पोटच्या मुलाला आईनेच गंगेत बुडवलं; मुलाचा दुर्दैवी मृत्यू
Follow Us
Close
Follow Us:

हरिद्वार : विज्ञान तंत्रज्ञानाच्या आधुनिक युगामध्ये देखील अंधश्रद्धेवर (Superstitions) विश्वास ठेवणारे अनेक लोक आहेत. यामधून देशभरामध्ये अनेक लोकांचा हाकनाक बळी देखील जात असतो. अशीच धक्कादायक घटना हरिद्वारमधून (Haridwar) समोर आली आहे. आजार बरा करण्यासाठी पोटच्या मुलाला आईने गंगेमध्ये बुडवले आणि त्यामध्ये मुलाचा दुर्देवी मृत्यू झाला (Haridwar Crime Case) आहे. या घटनेवर देशभरातून संतप्त प्रतिक्रिया समोर येत आहे.

हरिद्वारमध्ये गंगा स्नान (Ganga Snan) करणे अगदी साहजिक मानले जाते. एका आई आपल्या मुलासह गंगास्नानसाठी घाटावर उतरली. लोकांना सुरुवातीला गंगास्नान करत असल्याचे वाटले मात्र खूप वेळानंतर देखील मुलाला नदीबाहेर न काढता त्याला बुडवून ठेवत असल्यामुळे लोकांनी त्या महिलेला विचारणा करण्यास सुरुवात केली. याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

या महिलेने आपल्या मुलाला गंभीर आजार आहे तो बरा व्हावा यासाठी गंगा नदीच्या पवित्र पाण्यामध्ये स्नान घालत असल्याचे सांगितले. मात्र तिच्या धारणेमुळे महिलेने तिच्या अगदी पाच वर्षाच्या मुलाला खूप वेळ पाण्यामध्ये बुडवून ठेवले. यामुळे आसपासच्या लोकांनी त्या दांपत्यांसोबत हुज्जत घालायला सुरुवात केली. एका माणसाने पुढाकार घेत त्या मुलाला जबरदस्तीने बाहेर काढले आणि पोलिसांना याबाबत माहिती दिली. चिमुकल्याला पाण्याबाहेर काढल्यानंतर बराच वेळ त्याची आई त्याला मांडीवर घेऊन विमनस्क अवस्थेत हसत असल्याचं दिसून आलं. आपला मुलगा आत्ता उठून उभा राहील, असं वारंवार म्हणत ही महिला मधूनच हसत असल्याचंही दिसून आलं. पोलिसांनी तातडीने मुलाला रुग्णालयामध्ये दाखल केले. मात्र तोपर्यंत त्या चिमुकल्याचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.

#Haridwar अंधविश्वास ने एक 7 साल के बच्चे की जान ले ली …!! ब्लड कैंसर से पीड़ित बच्चे को उसकी मौसी ने चमत्कार की आस में करीब पांच मिनट तक गंगा में डुबकियां लगवा दीं ….!! बच्चे की मौत हो गई है ….!! pic.twitter.com/kLCPcHsIY8 — Firdaus Fiza (@fizaiq) January 24, 2024

वृत्तवाहिनीने दिलेल्या माहितीनुसार, सदर मुलाला रक्ताचा कर्करोग झाला होता. गंगेवर येण्याआधी या दाम्पत्यानं मुलाला रुग्णालयात दाखवलं होतं. मात्र, डॉक्टरांनी त्याची परिस्थिती गंभीर असल्याचे स्पष्ट सांगितले. त्यानंतर हे दाम्पत्य गंगेत स्नान केल्यानं मुलाचा आजार बरा होईल, या धारणेतून तिथे आलं आले आणि पुढे हा सगळा प्रकार घडला. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत असून गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे.

Web Title: Woman dip son with blood cancer in ganga river at haridwar video viral nrpm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 25, 2024 | 01:04 PM

Topics:  

  • Uttarakhand

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.