
Rajysabha Election : भाजपने UP मधील 8 उमेदवारांची यादी केली जाहीर, दोन महिलांचा समावेश
भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीने राज्यसभेच्या द्विवार्षिक निवडणूकांसाठी (Rajysabha Election) उत्तर प्रदेशातील 8 उमेदवारांची यादी जाहीर केली. या यादीत दोन महिलांना उमेदवारी देण्यात आली आहे.
भाजपने जाहीर केलेल्या यादीनुसार धर्मपाल सिंह, राधाकांत ओझा, प्रकाश पाल, विद्यासागर सोनकर, गोपी कृष्ण पाण्डेय, प्रियंका सिंह रावत, राम प्रतापसिंह चौहान आणि श्रृती गंगवार यांना उमेदवारी दिली आहे.
उत्तर प्रदेशच्या 10 आणि उत्तराखंडच्या 1 सीटवर द्विवार्षिक निवडणूका होतील, तर पश्चिम बंगालच्या एका जागेवर उपनिवडणूक होईल. या सर्व जागांवर 16 ऑक्टोबरला मतदान होईल. उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडच्या 11 राज्यसभा सदस्यांचा कार्यकाळ नोव्हेंबर 2026 ला संपुष्टात येईल. त्याचमुळे या ठिकणी निवडणूका लागल्या आहेत.
त्याशिवाय पश्चिम बंगालची एक जागा रिकामी आहे. येथून तृणमूल काँग्रेसच्या राज्यसभा सदस्या रुक्मिणी मल्लिक यांनी 16 जुलै रोजी राजीनामा दिला होता. त्यांचा कार्यकाळ 2 एप्रिल 2032 पर्यंत होता. आता याच रिकाम्या जागी फेरनिवडणूक घेण्यात येणार आहे.
निवडणूक आयोगानुसार अर्ज भरण्याची अखेरची तारीख 6 ऑक्टोबरपर्यंत आहे. 7 ऑक्टोबरला अर्जांची छाननी होईल आणि 9 ऑक्टोबर शुक्रवारपर्यंत उमेदवारांना आपले नाव मागे घेता येईल. मतदान 16 ऑक्टोबरला होईल. वोटिंग सकाळी 9 वाजल्यापासून दुपारी 4 वाजेपर्यंत पार पडेल. त्याच दिवशी संध्याकाळी 5 वाजता मोजणीस सुरुवात होईल. निवडणूकीची संपूर्ण प्रक्रिया 19 ऑक्टोबरपर्यंत चालेल.
निवडणूक आयोगाने या निवडणूंकासाठी एक खास नियम ठरवला आहे. मतदान करण्यासाठी बॅलेट पेपरची मागणी झाल्यानंतर फक्त इंटीग्रेटेड वॉयलेट कलरचा स्केच पेनचाच वापर करता येईल. हा पेन रिटर्निंग ऑफिसरद्वारे दिला जाईल. कोणत्या इतर पेनच्या वापराने वोट करता येणार नाही.
आयोग म्हणाले की, निवडणूका स्वतंत्र व निष्पक्ष करण्यासाठी पर्यवेक्षकांची नियुक्ती केली जाईल व निवडणूक प्रक्रियेवर बारकाईने लक्ष ठेवले जाईल.