तंत्रज्ञान क्षेत्रातही महिलांची भरारी; डेटा, डिझाईनसारख्या क्षेत्रात मिळतंय १.६ कोटींपर्यंत पॅकेज
दिल्ली : तंत्रज्ञान क्षेत्रातही महिला आपली प प्रतिभा सिद्ध करत आहेत. डेटा सायंटिस्टची नोकरी असो किंवा उत्पादन व्यवस्थापन, क्लाऊड इंजिनीअर, सायबर सुरक्षा आणि यूआय किंवा यूएक्स डिझाईनसारख्या इतर नोकऱ्या असोत, महिलांचे वर्चस्व असते. अनेक जागतिक संधींसह, महिलांना करिअर वाढ आणि आर्थिक स्वातंत्र्यासाठी सुवर्णसंधी मिळत आहे. महिला त्यांच्या कौशल्याने आणि नेटवर्किंगने तंत्रज्ञान उद्योगात नवीन उंची गाठू शकतात. गेल्या काही वर्षांत या उद्योगात महिलांच्या सहभागात मोठी वाढ झाली आहे.
शाळेच्या पहिल्याचं दिवशी विद्यार्थ्यांना मोफत गणवेश मिळणार? सरकारकडून निधी मंजूर
नॅसकॉमचे म्हणणे आहे की, भारतातील आयटी उद्योग सुमारे २८ लाख लोकांना रोजगार देतो, ज्यामध्ये महिलांची मोठी भूमिका असते. ते केवळ डिझाईन आणि डेटा सायन्स क्षेत्रातच पुढे नाहीत, तर त्यांच्या तांत्रिक कौशल्याच्या मदतीने उत्पादन विकास आणि धोरणात्मक निर्णय घेण्यामध्येही पुढे जात आहेत. चांगल्या अनुभवामुळे महिलांना चांगले पॅकेजेस मिळत आहेत. ८ वर्षे किंवा त्याहून अधिक अनुभव असलेल्या महिलांना वरिष्ठ पदावर वार्षिक १.६ कोटी रुपयांपर्यंतचे पॅकेज देखील मिळू शकते.
२२ लाख रुपयांपर्यंतचे पॅकेज डेटा सायंटिस्टः कंपन्या गोळा केलेल्या डेटाचा योग्य वापर करून मोठे निर्णय घेतात. आजच्या काळात डेटा ही एक मोठी शक्ती मानली जाते. या क्षेत्रात फ्रेशर्सना दरवर्षी १८ लाख रुपयांपर्यंतचे पॅकेज मिळते.
उत्पादन व्यवस्थापकः उत्पादनाच्या सुरुवातीपासून ते लाँच होईपर्यंतच्या सर्व कामात हे पद महत्त्वाची भूमिका बजावते. ज्यामध्ये वापरकर्ता संशोधन, विकास. नियोजन यासारख्या सर्व गोष्टींचा समावेश आहे. उत्पादन व्यवस्थापकांसाठी, फ्रेशर्सना त्यांच्या कौशल्यानुसार दरवर्षी २२ लाख पदांसाठी दरवर्षी १.६ कोटी रुपयांपर्यंतचे रुपयांपर्यंतचे पॅकेज मिळू शकते. याशिवाय, वरिष्ठ पदावर वार्षिक १.६ कोटी रुपयांपर्यंतचे पॅकेज देखील मिळू शकते.
क्लाउड आर्किटेक्ट/इंजिनीअरः आजच्या काळात क्लाऊड आर्किटेक्ट किंवा क्लाऊड इंजिनीअरची खूप मागणी आहे. या क्षेत्रात महिलांची संख्येतही प्रचंड प्रमाणात वाढ होत आहे. यामध्ये, फ्रेशर्सना वार्षिक १४ लाख रुपयांपर्यंतचे पॅकेज मिळू शकते.
सुशिक्षित तरुणांसाठी आनंदाची बातमी ! FSSAI मध्ये ‘या’ महत्वाच्या पदांसाठी भरती, असा करा अर्ज
प्रकल्प व्यवस्थापन कार्यालयः कोणताही प्रकल्प सुरू झाल्यानंतर, तो प्रकल्प बजेट आणि निर्धारित वेळेत पूर्ण करण्याची जबाबदारी प्रकल्प व्यवस्थापन कार्यालयावर असते.