फोटो सौजन्य: iStock
सरकारी नोकरीची तयारी करणाऱ्या तरुणांसाठी एक उत्तम संधी उपलब्ध झाली आहे. भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण (FSSAI) ने विविध पदांसाठी भरतीची अधिसूचना जाहीर केली आहे. पात्र आणि इच्छुक उमेदवार 15 एप्रिल 2025 पासून अर्ज करू शकतील, तर अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 30 एप्रिल 2025 आहे. विशेष बाब म्हणजे अर्ज ऑनलाइन भरल्यावर त्याची हार्ड कॉपी संबंधित पत्त्यावर पाठवणे आवश्यक आहे.
या भरती प्रक्रियेद्वारे एकूण 33 रिक्त पदांची भरती होणार असून, यामध्ये संचालक, सहसंचालक, व्यवस्थापक, सहाय्यक संचालक, प्रशासकीय अधिकारी, वरिष्ठ खाजगी सचिव, सहाय्यक व्यवस्थापक आणि सहाय्यक पदांचा समावेश आहे.
– संचालक – २ पदे
– सहसंचालक – ३ पदे
– वरिष्ठ व्यवस्थापक – २ पदे
– व्यवस्थापक – ४ पदे
– सहाय्यक संचालक – १ पद
– प्रशासकीय अधिकारी – १० पदे
– वरिष्ठ खाजगी सचिव – ४ पदे
– असिस्टंट मॅनेजर – १ पद
– सहाय्यक – ६ पदे
उच्च पदांसाठी केंद्र/राज्य शासन, विद्यापीठ किंवा संबंधित क्षेत्रातील अनुभव आवश्यक आहे. उदाहरणार्थ, प्रशासन, वित्त, मानव संसाधन किंवा दक्षता विभागात किमान 15 वर्षांचा अनुभव आवश्यक आहे. सहाय्यक पदासाठी संबंधित क्षेत्रात किमान 10 वर्षांचा किंवा 3 वर्षांचा अनुभव अनिवार्य आहे.
निवड झालेल्या उमेदवारांना दरमहा 1,23,100 ते ₹2,15,900 इतका आकर्षक पगार दिले जाणार आहे.
उमेदवार fssai.gov.in या वेबसाइटला भेट देऊन ऑनलाइन अर्ज करू शकतात. तसेच, अर्जाची हार्ड कॉपी, सर्व संबंधित कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे 15 मे 2025 पर्यंत “सहाय्यक संचालक, भरती कक्ष, एफएसएसएआय मुख्यालय, 312, तिसरा मजला, एफडीए भवन, कोटला रोड, नवी दिल्ली” या पत्त्यावर पोहोचली पाहिजेत.
या भरतीमध्ये सहभागी होऊ इच्छिणाऱ्या सर्व उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवर जाऊन सविस्तर सूचना वाचावी आणि सर्व कागदपत्रे आगाऊ तयार ठेवावीत. भरती प्रक्रियेतील कोणत्याही चुकीमुळे तुमची उमेदवारी रद्द होऊ शकते. उमेदवारांनी दिलेल्या तारखेच्या आत अर्ज करावा. शेवटच्या तारखेनंतर, उमेदवारांना अर्ज करण्याची संधी मिळणार नाही.