International Women’s Day: भारतात महिलांचे आर्थिक स्वातंत्र्य हळूहळू वाढत असून, त्या आपल्या हक्कांबाबत अधिक जागरूक होत आहेत. शिक्षण, नोकरी, व्यवसाय आणि वित्तीय निर्णयांमध्ये त्यांचा सहभाग वाढत आहे.देशातील महिला आता पूर्वीच्या तुलनेत त्यांच्या हक्कांबद्दल अधिक जागरूक झाल्या आहेत. त्या सक्षम होण्यासोबतच आर्थिकदृष्ट्याही स्वयंपूर्ण होत आहेत. या बाबतीत केरळच्या महिला आघाडीवर आहेत. हे आम्ही नाही, तर नीती आयोगाच्या एका अहवालात स्पष्ट झाले आहे.
“From Borrowers to Builders – Women’s Role in India’s Financial Growth Story” या शिर्षकाखाली नीती आयोगाच्या अहवालात देशभरातील महिलांच्या वाढत्या आर्थिक स्वातंत्र्यावर प्रकाश टाकण्यात आला आहे. या अहवालानुसार, केरळच्या महिला त्यांच्या क्रेडिट प्रोफाइलचे व्यवस्थापन अधिक प्रभावीपणे करत आहेत.
Satish Bhosale Raid : सतीश भोसले याच्या घरी वनविभागाची धाड; पोलिसांची हाती लागले घबाड
देशातील महिला कर्जदारांमध्ये केरळच्या महिलांची हिस्सेदारी ६ टक्के आहे, तर या बाबतीत केरळ देशात सहाव्या क्रमांकावर आहे. राज्याने आर्थिक समावेशन आणि सशक्तीकरणासाठी घेतलेली भूमिका स्पष्टपणे दिसून येते. केरळची लोकसंख्या तुलनेने कमी असली, तरीही कर्जाच्या बाजारात महिलांची सहभागिता वाढत आहे.
महिला कर्जदारांची संख्या महाराष्ट्रात सर्वाधिक १५ टक्के आहे. त्यानंतर ११ टक्के वाट्यासह तामिळनाडू दुसऱ्या क्रमांकावर आणि ९ टक्के वाट्यासह कर्नाटक तिसऱ्या क्रमांकावर आहे. उत्तर प्रदेश आणि तेलंगणामध्ये हा वाटा ७ टक्के आहे. अहवालात नमूद केल्याप्रमाणे, केरळमध्ये ४४ टक्के महिलांनी सहा महिन्यांच्या कालावधीत त्यांच्या क्रेडिट स्कोअरमध्ये सुधारणा पाहिली आहे. यावरून स्पष्ट होते की, राज्यातील महिलांमध्ये आर्थिक जागरूकता झपाट्याने वाढत आहे.
नीती आयोगाच्या या अभ्यासात असेही आढळले की, केरळमध्ये सर्वाधिक महिला कर्जदार नगरीय भागातील आहेत, त्यानंतर ग्रामीण आणि निमशहरी भागातील महिलांचा क्रम लागतो. तज्ज्ञांच्या मते, महिलांचे कर्ज घेणे केवळ देशाच्या अर्थव्यवस्थेसाठीच नव्हे, तर सामाजिक विकासासाठीही आवश्यक आहे.
शिक्षणाचा प्रसार:
स्वतःच्या उत्पन्नाचे स्रोत:
सरकारी योजना आणि मदत:
आर्थिक साक्षरता आणि क्रेडिट व्यवस्थापन:
स्वयंरोजगार आणि लघु उद्योग:
संतोष देशमुखांच्या हत्येवरुन काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सपकाळ संतापले; म्हणाले, आता सर्वांनी