Photo Credit- Social Media काँग्रेसचे काही नेते भाजपची ‘बी-टीम’- राहुल गांधी
गुजरात: देशभरातील काही राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत झालेल्या पराभवानंतर काँग्रेस खासदार आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आपल्याच पक्षातील नेत्यांवर निशाणा साधला आहे. आपल्याच काँग्रेस पक्षातील काही नेतेच भाजपची बी टीम आहेत, पण ते एक साखळदंडाने बांधले गेलेत, अशा शब्दांत राहुल गांधींनी काँग्रेस नेत्यांनाच धारेवर धरलं आहे. गुजरात दौऱ्यावर असलेल्या राहुल गांधी यांनी हे विधान करून आपल्याच पक्षात एकच खळबळ उडवून दिली आहे. याचवेळी त्यांनी काँग्रेसमध्ये मोठ्या बदलाचेही संकेत दिले आहेत.
गुजरात दौऱ्यावर असलेल्या राहुल गांधींनी गुजरातमधील राजकीय परिस्थितीवर जोरदार टीका केली. ते म्हणाले, “गुजरात एका ठिकाणी अडकले आहे, त्याला पुढे जाण्याचा मार्ग दिसत नाही. गुजरात प्रगती करू इच्छित आहे, पण काँग्रेस पक्ष त्याला दिशा दाखवण्यात अपयशी ठरत आहे.”
Rohini Khadse : “एक खून माफ करणेबाबत…; महिलादिनी रोहिणी खडसे यांची खास मागणी, रंगलीये जोरदार चर्चा
राहुल गांधींनी स्पष्ट शब्दांत पक्षाच्या मर्यादा स्वीकारत म्हटले, “मी काँग्रेसचा सदस्य आहे आणि मी ठामपणे सांगतो की गुजरात काँग्रेस पक्ष राज्याला योग्य दिशा दाखवू शकत नाही. मी हे भीतीपोटी नाही, तर वस्तुस्थिती म्हणून सांगत आहे. पक्षातील कार्यकर्ते, महासचिव, प्रदेशाध्यक्ष किंवा मी स्वतः— कोणीही गुजरातला मार्ग दाखवू शकलेलो नाही.”
राहुल गांधींनी काँग्रेसमध्ये लवकरच मोठे फेरबदल होण्याचे संकेत दिले. ते म्हणाले, “जर पक्षातून १० ते ४० नेत्यांना काढावे लागले, तरी ते करायला हवे. काँग्रेसमध्ये धावपटू घोड्याला वरातीत जुंपले जाते, तर वरातीतील घोड्याला शर्यतीत उतरवले जाते.”
राहुल गांधींनी पक्षातील काही नेत्यांवरही अप्रत्यक्ष टीका केली. त्यांनी सांगितले की, “काँग्रेसमध्ये दोन प्रकारचे नेते आहेत. पहिले, जे थेट जनतेशी जोडले गेले आहेत आणि ज्यांच्या हृदयात काँग्रेस आहे. दुसरे, जे जनतेपासून दूर आहेत, त्यांना जनतेच्या समस्या समजत नाहीत, आणि ते जनतेमध्ये मिसळतही नाहीत.”
Satish Bhosale Crime: हरीण आणि काळविटाचे सांगाडे अन्…;सतीश भोसलेने काय काय केलयं, एकदा बघाच
त्यांनी पुढे गंभीर आरोप करत सांगितले, “या दुसऱ्या गटातील अर्धे नेते असे आहेत, जे प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे भाजपसाठीच काम करतात.”राहुल गांधींच्या या वक्तव्यामुळे गुजरात काँग्रेसमध्ये मोठी उलथापालथ होण्याची शक्यता आहे. पक्षसंघटनेत लवकरच मोठे बदल घडणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे.