Yogi Adityanath on Delhi Visit: उत्तर प्रदेशसारख्या राजकीय दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाच्या राज्यात भारतीय जनता पक्षासाठी (भाजप) नवीन प्रदेशाध्यक्षाची निवड करणे, ही मोठी आव्हानाची गोष्ट ठरत आहे. विविध जाती-जमातींच्या आणि प्रादेशिक समीकरणांच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून सखोल विचारमंथन सुरू असून, आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय अत्यंत निर्णायक ठरणार आहे.
गेल्या काही महिन्यांपासून भाजपकडून विद्यमान प्रदेशाध्यक्ष भूपेंद्र चौधरी यांची जागा कोण घेणार, याबाबत आतून तयारी सुरू आहे. पक्षाच्या संघटनात्मक पातळीवरील नेते, भाजपचे वरिष्ठ पदाधिकारी, तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) कार्यकर्ते यांचे मत जाणून घेतले जात आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा दिल्लीत सुरू असलेला दौरा विशेष महत्त्वाचा मानला जात आहे. ते आजच पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेण्याची शक्यता आहे. या भेटीत आगामी प्रदेशाध्यक्ष निवडीबाबत स्पष्ट संकेत दिले जाण्याची शक्यता आहे. योगी आदित्यनाथ पक्ष नेतृत्वास आपली भूमिका स्पष्ट करत प्रदेशाध्यक्षासाठी आपली पसंती व्यक्त करू शकतात, असे सुत्रांकडून समजते.
Plane Emergency Landing: फ्लाईटने उड्डाण भरले अन् आकाशात….; हैद्राबादमध्ये नेमके घडले तरी काय?
दरम्यान, भाजपकडून प्रदेशाध्यक्ष निवडीची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षांची निवड झाल्यानंतरच उत्तर प्रदेशसारख्या राज्यात प्रदेशाध्यक्ष कोण होणार, हे निश्चित होईल, असे बोलले जात आहे. लोकसभा निवडणुकीतील अपेक्षेपेक्षा कमी झालेल्या कामगिरीमुळे भाजप हायकमांड आता कोणताही धोका पत्करण्याच्या मूडमध्ये नाही.
उत्तर प्रदेशमध्ये दोन वर्षांनी विधानसभा निवडणुका होणार असून, त्या पार्श्वभूमीवर पक्ष नव्या नेतृत्वाच्या जोरावर जनतेत नव्याने आपली पकड निर्माण करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे नवीन प्रदेशाध्यक्षाची योगी आदित्यनाथ यांच्याशी असलेली समन्वयाची क्षमता, प्रशासनावर नियंत्रण आणि संघटनात्मक ताकद हे घटक अत्यंत महत्त्वाचे ठरणार आहेत.
नवीन अध्यक्ष कोणत्या सामाजिक गटातून असावा – ब्राह्मण, ओबीसी, दलित?
योगी आदित्यनाथ यांच्याशी संबंध – नव्या अध्यक्षाचे मुख्यमंत्री योगींसोबत समन्वय असणे आवश्यक.
प्रदेशाध्यक्ष पूर्वांचलमधून असावा की पश्चिम यूपीमधून?
राष्ट्रीय अध्यक्षांची निवड पूर्ण झाल्यावरच यूपीबाबत निर्णय घेण्यात येईल, असे दिल्लीतील सूत्र सांगत आहेत.
ChatGPT तुमचं नातं वाचवू शकतं का? तज्ज्ञांनी सांगितलं AI Therapy Trend नात्यासाठी योग्य आहे की नाही
पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः ओबीसी समाजातून असल्यामुळे भाजपमध्ये गैर-यादव ओबीसी नेतृत्वाला प्राधान्य देण्याचा विचार आहे. विशेषतः कुर्मी, पटेल, शाक्य, सैनी समाजातील नेतृत्वावर भाजप लक्ष केंद्रित करत आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत याच गटांचा भाजपपासून काही अंशी दूरावलेला भाग समाजवादी पक्षाकडे वळला होता, असे स्पष्ट झाले.
2024 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने उत्तर प्रदेशमध्ये फक्त ३३ जागा जिंकल्या, मित्रपक्षांसह ही संख्या ३६ इतकी झाली. २०१९ च्या तुलनेत एनडीएला २८ जागांचा फटका बसला. भाजपचा मतदानाचा टक्का ४९.६% वरून ४१.४% वर घसरला, म्हणजे तब्बल ८% घसरण झाली. त्याउलट, समाजवादी पक्षाने पीडीए (पिछडा-दलित-अल्पसंख्याक) फॉर्म्युलावर उत्तम कामगिरी करत ३७ जागा जिंकल्या. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत बसपा अधिक कमकुवत होऊन सपा विरुद्ध भाजप अशी थेट लढत दिसून येण्याची शक्यता आहे.