खरंच ChatGPT AI तुमचं वाचवू शकतं का
नातेसंबंधांमध्ये अनेकदा असे दिसून येते की Couples एकमेकांशी खूप वेगवेगळ्या विषयांवर बोलतात आणि अशा अनेक गोष्टी आहेत ज्या ते एकमेकांशी बोलत नसतील तर त्यांच्या मित्रांशी बोलतात. परंतु, आजकाल तरुणांनी त्यांच्या जोडीदाराशी किंवा मित्रांपेक्षा ChatGPT शी असलेल्या त्यांच्या नात्याबद्दलच्या भावना जास्त शेअर करायला सुरुवात केली आहे.
ChatGPT शी बोलताना, त्यांना केवळ आरामदायी वाटत नाही तर ChatGPT अशी उत्तरेदेखील देते जी त्यांना कदाचित ऐकायची असतील. सोशल मीडियावरील युजर्स आनंदाने सांगतात की ते ChatGPT चा वापर त्यांचा वैयक्तिक थेरपिस्ट म्हणून करतात. बऱ्याच वेळा जोडपे त्यांच्या नात्यातील समस्या AI ला सांगतात आणि AI द्वारे दिलेली उत्तरे स्वीकारून त्यांचे जीवन जुळवून घेण्याचा प्रयत्न करतात. परंतु, हा ट्रेंड कितपत योग्य आहे आणि याद्वारे नाते खरोखरच वाचवता येईल का, याबद्दल तज्ज्ञ सांगत आहेत. (फोटो सौजन्य – iStock)
ChatGPT खरंच नातं वाचवू शकतं का?
रोबोटशी बोलण्याची कल्पना एकेकाळी विचित्र वाटली असेल, परंतु ती आजच्या जीवनाची वास्तविकता बनली आहे. फोनवरून येणारा सिरीचा आवाज असो किंवा स्पीकरमधून येणारा अलेक्साचा आवाज असो, रोबोटशी बोलणे आता सामान्य झाले आहे. थेरपिस्ट लॉरेन रुथ मार्टिन यांनी USA Today ला सांगितले की कधीकधी अशा ठिकाणी सर्वकाही लिहिणे किंवा बोलणे खूप चांगले वाटते जिथे कोणालाही तुमच्याबद्दल काहीही माहिती नसते. परंतु, जिथे हे सांगितले जात आहे ती जागा सुरक्षित नसते.
द इंडिपेंडेंटमध्ये प्रकाशित झालेल्या अहवालानुसार, जरी एआय चॅटबॉट्स सहानुभूती दाखवत असले तरी, ते तुमच्या भावना समजत नाहीत. चॅटजीपीटी तुमचे मानसिक आरोग्यदेखील समजू शकत नाही. त्याच वेळी, चॅटजीपीटी दुसऱ्याला हानी पोहोचवण्याच्या किंवा तुमचे स्वतःचे मानसिक आरोग्य बिघडवण्याच्या तुमच्या विचारांना समर्थन देऊ शकते.
Relationship Tips: लग्नापूर्वी जोडीदारासह बोलून घ्या 4 गोष्टी, तरच टिकू शकतं नातं
ChatGPT थेरपीचा पर्याय असू शकत नाही
तज्ज्ञांचे म्हणणे आहे की AI हे एक चांगले साधन असू शकते परंतु ते थेरपीचा पर्याय असू शकत नाही. AI चा वापर स्ट्रक्चर्स हेल्पसाठी केला जाऊ शकतो, जसे की सकाळच्या दिनचर्यांसाठी, प्रॉडक्टिव्हिटी प्रॉम्प्ट तयार करण्यासाठी, गाईडेड ब्रिदींगसाठी किंवा इतर कोणत्याही उद्देशासाठी परंतु ते ट्रॉमा प्रोसेसिंग किंवा ट्रॉमा डंपिंगसाठी वापरले जाऊ नये. AI हा थेरपिस्ट नाही आणि त्याचा वापर थेरपिस्ट म्हणून करू नये.
कधीकधी तुम्ही तुमच्या नात्याबद्दल ChatGPT शी बोलू शकता परंतु ChatGPT वर पूर्णपणे अवलंबून राहणे आणि त्याला सर्व काही सांगणे किंवा त्याने सांगितलेल्या प्रत्येक गोष्टीशी सहमत असणे आवश्यक नाही.
नातेसंबंध वाचवण्यास ChatGPT कशी मदत करू शकते?
तुमचे शब्द आकार देण्यासाठी आणि तुमच्या जोडीदाराला असे काहीतरी कसे बोलावे जे तुम्हाला सांगणे कठीण वाटते हे जाणून घेण्यासाठी तुम्ही ChatGPT ची मदत घेऊ शकता. तुम्ही चॅटजीपीटीला विचारू शकता की तुमच्या जोडीदारासाठी कोणते सरप्राईज प्लॅन करायचे, कोणती भेट द्यायची किंवा जोडप्यांसाठी कोणते ठिकाण भेट द्यायचे ते चांगले आहे. परंतु, हे लक्षात ठेवणे महत्त्वाचे आहे की तुम्ही चॅटजीपीटीवर पूर्णपणे अवलंबून राहू नये.
अशा अनेक गोष्टी आहेत ज्या फक्त तुमचा मित्र समजू शकतो किंवा फक्त तुमचा जोडीदारच असे उत्तर देऊ शकतो ज्यामुळे तुम्हाला मनःशांती मिळेल. तुम्ही चॅटजीपीटीवर पूर्णपणे अवलंबून राहू नये कारण ते जोडीदार किंवा थेरपीची पोकळी अजिबात भरून काढू शकत नाही.