पालिका निवडणुका पुन्हा लांबणीवर
जम्मू : जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुकीचे मतदान एकूण तीन टप्प्यात होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानुसार, आता तिसऱ्या आणि शेवटच्या टप्प्यासाठीतील 40 जांगासाठी आज मतदान होत आहे. यामध्ये राज्यातील तब्बल 39 लाखांपेक्षा जास्त नागरिक आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
हेदेखील वाचा : नेपाळमध्ये अडकलेल्या भारतीय नागरिकांसाठी दुतावासाकडून सूचना जारी; ‘हा’ आहे हेल्पलाईन क्रमांक
तिसऱ्या टप्प्यात सात जिल्ह्यांतील 40 जागांवर मतदान होत आहे. 39 लाखांहून अधिक नागरिक मतदान करणार आहेत. उत्तर काश्मीरमधील बांदीपोरा, कुपवाडा आणि बारामुल्ला जिल्ह्यांतील कर्नाह, त्रेहगाम, कुपवाडा, लोलाब, हंदवाडा, लंगेट, सोपोर, रफियााबाद, उरी, बारामुल्ला, गुलमर्ग, वाघोरा-क्रेरी, पट्टण, सोनवारी, बांदीपोरा, गुरेझ (एसटी) मधील 16 विधानसभा जागा जागांसाठी मतदान होणार आहे. यासाठी चोख सुरक्षा यंत्रणा ठेवण्यात आली आहे. त्यानुसार, 40 हजार सुरक्षा कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत.
दरम्यान, तिसऱ्या आणि अखेरच्या टप्प्यातील निवडणुकीचा प्रचार शांततेत पार पडला. कलम 370 रद्द केल्यानंतर आणि राज्याचे दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन केल्यानंतर पहिल्यांदाच जम्मू-काश्मीर विधानसभा निवडणुका होत आहेत. त्यामुळे उमेदवारांच्या निवडणूक प्रचाराचे मुख्य मुद्दे ‘कलम 370’ आणि ‘राज्याचा दर्जा’ हे होते.
जागा 40 अन् 415 उमेदवार रिंगणात
अंतिम टप्प्यात 40 जागांसाठी 415 उमेदवार रिंगणात आहेत. त्यात 5060 मतदान केंद्रांवर 39 लाखांहून अधिक मतदार मतदान करतील. त्यानुसार, चोख सुरक्षा व्यवस्थाही तैनात करण्यात आली आहे.
चोख सुरक्षा व्यवस्था तैनात
जम्मू विभागातील कठुआ जिल्ह्यातील बानी, बसोली, कठुआ, जसरोटा आणि हिरानगर या जागांवर 10 हजार सुरक्षा कर्मचारी असतील. सांबा जिल्ह्यातील विजयपूर, रामगड आणि सांबा या जागांवर सहा हजार सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या देखरेखीखाली मतदान होणार आहे.