Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

पाणीपुरवठा विभागासाठी 3 कोटी 11 लाखांचा निधी मंजूर; पाणीपुरवठा सभापती हादगे यांची माहिती

  • By Navarashtra News Network
Updated On: Sep 03, 2021 | 08:12 PM
पाणीपुरवठा विभागासाठी 3 कोटी 11 लाखांचा निधी मंजूर; पाणीपुरवठा सभापती हादगे यांची माहिती
Follow Us
Close
Follow Us:

सातारा : सातारा पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या माध्यमातून पाणी उपसा व जलशुध्दीकरण केंद्राचे अद्ययावतीकरण करण्यात येत आहे . या कामासाठी सर्वसाधारण सभेने 3 कोटी 11 लाख 63 हजार 89 रुपयांचा निधी मंजूर झाला आहे, याची माहिती पाणी पाणीपुरवठा सभापती सीता हादगे यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे दिली.

प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे, ११ जानेवारी २०२१ रोजी पाणी पुरवठा विभागाच्या सभापती पदाचा कार्यभार हाती घेतला. दुर्दैवाने मार्च २०२१ च्या शेवटच्या आठवड्यात सातारा जिल्ह्यात करोनाने फार मोठ्या प्रमाणावर शिरकाव केला. त्याचा गेल्या दोन वर्षात सातारच्या विकासकामांवर फार मोठा परिणाम झाला असला तरी या कालावधीत सातारकरांच्या समस्या काय आहेत ? मुबलक व स्वच्छ पाणी पुरवठा करण्याच्या दृष्टीने कोणत्या उपाययोजना केल्या पाहिजेत ? पाणीपुरवठा विभागाच्या माध्यमातून कोणती कामे प्राधान्याने हाती घेतली पाहिजेत? याचा सविस्तर अभ्यास करून आमचे नेते खासदार उदयनराजे भोसले, नगराध्यक्षा माधवी कदम, उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, पक्षप्रतोद ॲड. डी. जी. बनकर यांच्याकडे नगरपालिकेच्या माध्यमातून विकास कामांसाठी निधीची मागणी करण्यात आली होती.

त्यापैकी शुक्रवारी झालेल्या पालिकेच्या सभेमध्ये खास पाणी पुरवठा योजनेअंतर्गत सांबरवाडी फिल्टरेशन प्लांटमध्ये फिल्टर बेड व इतर अनुषंगिक कामासाठी ७५ लाख, युआयडीएसएस एमटी योजनेमधील डोंगर मार्गातील अपूर्ण राहिलेल्या पावर हाउस ते माची पेठ अखेर नवीन गुरुत्व नलिका, वितरण नलिका टाकण्यासह माची पेठ- नागझरी टाक्यांची वितरण नलिका टाकण्याच्या कामासाठी १ कोटी ३७ लाख, शहापुर पाणी पुरवठा योजनेअंतर्गत जकातवाडी फिल्टरेशन प्लांटमधील फिल्टर बेड व इतर अनुषंगिक कामासाठी ७५ लाख रुपये कामांना एक मंजुरी मिळाली आहे.

सातारा शहर परिसरातील पेठ करंजे लगतच्या बसप्पा पेठ, शिंदे मळा, भोसले नगर, शेलारवस्ती या भागाला सातारा तालुका पोलीस स्टेशन लगत असणाऱ्या पाण्याच्या टाकीतून पाणी पुरवठा केला जातो. या परिसरात ८ ते १० हजारांवर लोकवस्ती आहे. १० लक्ष लिटर क्षमतेची पाण्याची टाकी बांधण्यासाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडून काही निधी मंजूर झाला आहे.

टाकी बांधण्यासाठी जागा उपलब्ध झाली नसल्याने पुढील कार्यवाही करता आली नाही. मात्र, सद्यपरिस्थितीत जागा उपलब्ध झाली असल्याने या कामासाठी ९९ लाख ६३ हजार ८९ रुपये खर्चाच्या सुधारित अंदाजपत्रकास सर्वसाधारण सभेत मंजुरी मिळाली आहे. शहापूर पाणी पुरवठा योजनेअंतर्गत शहापूर पंप हाऊसमध्ये २१५ एचपी पंप बसवणे व इतर कामासाठी २४ लाख रुपयांच्या निधीला मंजुरी मिळाली आहे. ही विकास कामे मार्गी लावताना मला सातारकरांच्या ऋणातच राहणे आवडेल अशी प्रतिक्रिया सीता हादगे यांनी शेवटी दिली आहे.

शहापूर पाणीपुरवठा योजनेसाठी सोलरची मदत घेणार

शहापूर पाणीपुरवठा योजनेसाठी वापरण्यात येणाऱ्या विजेचे बिल प्रति महिना २५ लाख रुपये एवढे येत आहे. इतकी मोठी रक्कम खर्च करणे योग्य वाटत नसल्याने या योजनेसाठी सोलरची मदत घ्यावी, अशी आपण मागणी केली असून त्यासाठी शासनाने निधीची तरतूद करावी. सोलरसाठी निधी उपलब्ध करून दिला तर वीज बिलापोटी भराव्या लागणारी रक्कम वाचण्यास मदत होणार आहे. वाचलेली रक्कम इतर विकास कामासाठी वापरण्यात आल्यास ते सातारकरांसाठी हिताचे ठरेल असेही सीता हादगे यांनी प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे.

Web Title: 3 crore 11 lakh sanctioned for water supply department says water supply chairman nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Sep 03, 2021 | 08:12 PM

Topics:  

  • Satara Municipality

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.