भुंकपाच्या धक्क्यातुन देश सावरला नसताना आता तुर्कस्तानला पुन्हा एकदा भूकंपाचा धक्का बसला (Earthquake In Turkey ) आहे. तुर्की आणि सीरियामध्ये गेल्या आठवड्यात झालेल्या दुहेरी भूकंपातील मृतांची संख्या अनुक्रमे 29,605 आणि 1,414 वर पोहोचली आहे. मात्र अशा परिस्थितीतही एक आंनददायी बातमी समोर आली आहे. चिनी आणि स्थानिक बचावकर्त्यांनी भूकंपानंतर 150 तासांनंतर रविवारी दुपारी हाताय प्रांतातील अंताक्या जिल्ह्यातील ढिगाऱ्यातून वाचलेल्याला बाहेर काढले. तुर्कीचे आरोग्य मंत्री फहरेटिन कोका यांनी 150 व्या तासात वाचवलेल्या मुलीचा व्हिडिओ पोस्ट केला आहे. ?? At last, we have the day’s savior! An infant who was found 128 hours after the earthquake. Feeling content after a refreshing shower and tasty meal? pic.twitter.com/gK9LkYFiB1 — Tansu YEĞEN (@TansuYegen) February 12, 2023
एकीकडे भुकंपातुन वाचलेल्यांचा जिवंत मिळण्याच्या आशा आशा धुसर होत आहेत. तर, दुसरीकडे बचाव कार्यादरम्यान ढिगाऱ्याखालुन अनेक लोकांना जीवंत बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश येत आहे. 65 वर्षीय महिलेला भूकंपानंतर 160 तासांनंतर हॅते प्रांतातील अंताक्या जिल्ह्यात बचावकर्त्यांनी बाहेर काढण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. स्थानिक बचाव पथकांनी भूकंपानंतर 150 तासांनंतर एका मुलीला रविवारी दुपारी हाताय प्रांतातील अंताक्या जिल्ह्यातील ढिगाऱ्यातून सुरक्षित बाहेर काढले. यापुर्वी ही एका नवजात बाळाला बाहेर काढण्यात यश आलं होतं. दरम्यान, रविवारी अल्जेरिया आणि लिबियानेही भूकंपग्रस्त भागात मदत सामग्रीने भरलेली विमाने पाठवली
भारतातून तुर्कस्तानला मोठ्या प्रमाणात मदत सामग्री पाठवली जात आहे. लष्कर आणि एनडीआरएफ टीमनंतर आता भारतातील लोक कडाक्याच्या थंडीत ब्लँकेटचे वाटप करत आहेत. तुर्कीचे राजदूत फिरात सनेल यांनी 100 ब्लँकेट पाठवण्याचे असेच एक पत्र ट्विट केले आहे. त्यांनी पत्रात वसुधैव कुटुंबकमचा संदेशही शेअर केला आहे. ९ फेब्रुवारीला संध्याकाळी ७.४८ वाजता शेअर केलेली पोस्ट आतापर्यंत १.१३ लाखांहून अधिक वेळा पाहिली गेली आहे आणि २.५ हजारांहून अधिक ट्विटर युजर्सनी लाइक केले आहे. त्यांनी भारतीयांचेही आभार मानले. कुलदीप, अमरजीत, सुखदेव आणि गौरव नावाच्या चार भारतीयांनी तुर्की भूकंपग्रस्तांसाठी 100 ब्लँकेट दान केले.
रविवारी जाहीर झालेल्या अधिकृत आकडेवारीनुसार, तुर्कीमध्ये जखमींची संख्या 80 हजारांहून अधिक आणि सीरियामध्ये 2,349 झाली आहे.तुर्कस्तानने भूकंपात कोसळलेल्या इमारतींच्या सदोष बांधकामात गुंतलेल्या १३४ संशयितांवर अटक वॉरंट जारी केले आहे, अशी माहिती न्यायमंत्री बेकीर बोझदाग यांनी रविवारी दिली. तर, बोझदाग यांनी पत्रकारांना सांगितले की, तीन संशयितांना अटक करण्यात आली आहे.