मुंबई : आयपीएलच्या (IPL) धर्तीवर आता भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) वतीने पहिल्या सत्राच्या महिला प्रीमियर लीगचे (Women Premier League) आयोजन करण्यात आले आहे. पहिल्या महिला प्रीमियर लीग (WPL) साठी खेळाडूंचा लिलाव सुरू झाला आहे. या आयपीएलमध्ये इंग्लंडचा अष्टपैलू सॅम करन (Sam Curran) आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला होता. तर महिलांमध्ये आज झालेल्या लिलावात स्मृती मानधनाला 3.4 कोटींना विकत घेण्यात आले.
मुंबईतील जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटरमध्ये हा लिलाव झाला. यामध्ये भारतीय संघाची सलामीवीर स्मृती मानधनाला बेंगळुरूने 3.40 कोटींना विकत घेतले. भारतीय संघाची कर्णधार हरमनप्रीत कौरला मुंबई इंडियन्सने 1.80 कोटी रुपयांची बोली लावली आहे तर गुजरातने वेस्ट इंडिजच्या डिआंड्रा डॉटिनला 60 लाखांमध्ये विकत घेतले. आयपीएलच्या छोट्या लिलावात 14 वर्षांच्या इतिहासातील सर्वात मोठी बोली लागली. 18.50 कोटींत विकला गेलेला इंग्लंडचा अष्टपैलू सॅम करन आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला. त्याला पंजाब किंग्जने विकत घेतले.
तसेच 17.5 कोटींत विकलेला कॅमेरून ग्रीनही आयपीएलचा दुसरा महागडा खेळाडू ठरला. त्याला मुंबई इंडियन्सने खरेदी केले. 405 खेळाडू लिलावासाठी उपलब्ध होते, पैकी 80 विकले. त्यात 19 परदेशी आहेत. भारताचा मयंक अग्रवाल (८.२५ कोटी) सर्वात महागडा ठरला. त्याला सनरायझर्स हैदराबादने खरेदी केले.