
RCB चाहत्यांसाठी आनंदाची बातमी! चिन्नास्वामी स्टेडियमवर क्रिकेटचे पुनरागमन (Photo Credit- X)
गेल्या वर्षी आरसीबी चॅम्पियन बनल्यानंतर बंगळुरूमध्ये जल्लोष साजरा करताना मोठी चेंगराचेंगरी झाली होती, ज्यामध्ये दुर्दैवाने काही लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. या घटनेनंतर खबरदारीचा उपाय म्हणून चिन्नास्वामी स्टेडियमवर आतापर्यंत एकाही सामन्याचे आयोजन करण्यात आले नव्हते. मात्र, आता सर्व सुरक्षा व्यवस्थांची पाहणी केल्यानंतर या ऐतिहासिक मैदानावर क्रिकेटचे पुनरागमन होत आहे.
Defending IPL champions Royal Challengers Bengaluru are all set to return to the M. Chinnaswamy Stadium, with five of their home games confirmed to take place in Bengaluru this season. The remaining two home matches of their IPL 2026 campaign will be staged at the Shaheed Veer… pic.twitter.com/5K2XE0A6YV — ANI (@ANI) March 3, 2026
विविध मीडिया रिपोर्ट्सनुसार, आयपीएल २०२६ चा उद्घाटन सोहळा याच ऐतिहासिक चिन्नास्वामी मैदानावर आयोजित केला जाणार आहे. आयपीएलच्या नियमांनुसार, गतविजेता संघ आपल्या होम ग्राऊंडवर पहिला सामना खेळतो. त्याप्रमाणे यंदाचा सलामीचा सामना बंगळुरूमध्ये पार पडणार आहे. विशेष म्हणजे, यंदाच्या हंगामातील सेमीफायनल आणि फायनलचे सामने देखील याच मैदानावर खेळवले जाण्याची दाट शक्यता वर्तवण्यात येत आहे.
यंदाच्या हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघ आपले एकूण ७ होम सामने खेळणार आहे. त्यापैकी एम. चिन्नास्वामी स्टेडियम (बंगळुरू) ५ सामने शहीद वीर नारायण सिंह इंटरनॅशनल स्टेडियम (रायपूर) २ सामने आपल्या रोमांचक वातावरणासाठी आणि हाय-स्कोअरिंग सामन्यांसाठी प्रसिद्ध असलेले चिन्नास्वामी स्टेडियम पुन्हा एकदा सज्ज झाले आहे. गतविजेता म्हणून मैदानात उतरणाऱ्या आरसीबीवर यंदा आपले विजेतेपद टिकवण्याचे मोठे दडपण असणार आहे.
बंगळुरूमध्ये सामन्यांच्या आयोजनासाठी सहकार्य केल्याबद्दल आरसीबी फ्रेंचायझीने कर्नाटक सरकार, कर्नाटक स्टेट क्रिकेट असोसिएशन (KSCA) आणि कर्नाटक पोलिसांचे मनापासून आभार मानले आहेत. फ्रेंचायझीने म्हटले आहे की, “वेळेत पायाभूत सुविधा आणि सुरक्षा उपाययोजना सुधारण्यासाठी सर्वांनी मिळून केलेल्या प्रयत्नांमुळेच डिफेंडिंग चॅम्पियन संघाला आपल्या घरच्या मैदानावर सामने खेळणे शक्य झाले आहे.”
Thala चा संघ IPL 2026 मध्ये दिसणार नव्या जर्सीत! फ्रँचायझीने शेअर केला धमाकेदार Video