Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • bigg boss marathi 6 |
  • IPL 2026 |
  • Gold Rate |
  • Ashok Kharat |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

बापटांकडे साताऱ्याचा पदभार

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 16, 2021 | 06:53 PM
बापटांकडे साताऱ्याचा पदभार
Follow Us
Close
Follow Us:

सातारा : सातारा पालिकेला मुख्याधिकारी कोण? या प्रश्नाला गुरुवारी पूर्णविराम मिळाला. पिंपरी चिंचवड महापालिकेच्या उपायुक्तपदासह सातारा पालिकेच्या मुख्याधिकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार अभिजित बापट यांच्याकडेच सोपविण्यात आला आहे. नगरविकास विभागाचे अवर सचिव सचिन सहस्त्रबुद्धे यांनी याबाबतचा नियुक्ती आदेश गुरूवारी काढला.

मंत्रालय स्तरावर जोरदार पाठपुरावा

सातारा पालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट यांची पिंपरी चिंचवड महापालिकेत उपायुक्तपदी पदोन्नतीने बदली झाली, तर भोरचे मुख्याधिकारी डॉ. विजयकुमार थोरात यांच्याकडे सातारा पालिकेची सूत्रे सोपविण्यात आली होती. नगरविकास विभागाने बदली आदेश काढल्यानंतर साताऱ्यात अनेक राजकीय घडामोडी घडल्या.

अभिजित बापट यांची बदली रद्द करण्यासाठी मंत्रालय स्तरावर जोरदार पाठपुरावाही करण्यात आला. या सर्व घडामोडी सुरू असतानाच अभिजित बापट यांनी पिंपरी चिंचवड आयुक्तांकडे आपले नियुक्तीपत्र सादर केले. मात्र, अद्याप त्यांच्याकडे कोणत्याही कार्यालयाची जबाबदारी सोपविण्यात आलेली नाही. तर डॉ. विजयकुमार थोरात साताऱ्यात येण्यापूर्वीच त्यांची पिंपरी चिंचवड महापालिकेत सहायक उपायुक्तपदी बदली झाल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात आले.

तीन दिवस पिंपरी, तर दोन दिवस सातारा

अभिजित बापट यांची घरवापसी होणार असल्याची चर्चा पालिका वर्तुळात सुरू होती आणि ती खरी ठरली.
नगरविकास विभागाचे अवर सचिव सचिन सहस्त्रबुद्धे यांनी अभिजित बापट यांच्याकडे सातारा पालिकेच्या मुख्याधिकारीपदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्याबाबतचा आदेश गुरुवारी काढला. त्यामुळे अभिजित बापट आता तीन दिवस पिंपरी, तर दोन दिवस सातारा पालिकेतून कामकाज करणार आहेत. बापट यांना साताऱ्यात आणण्याची राजकीय खेळी यशस्वी झाली असली तरी आता बापट यांच्यावर कामाचा भारही वाढणार आहे. त्यामुळे अभिजित बापट ही जबारबदारी कशी पार पाडतात, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Web Title: Abhijit bapat as the chief officer of satara municipality nrka

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 16, 2021 | 06:53 PM

Topics:  

  • Satara Municipality

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.