
उर्फी जावेदची तब्येत बिघडली
कायमच विचित्र फॅशनमुळे अभिनेत्री उर्फी जावेद कायमच चर्चेत राहते. अनेकदा तिला तिची विचित्र फॅशन अंगलटही आली आहे. तिला सर्वाधिक प्रसिद्धी ‘बिग बॉस ओटीटी’च्या माध्यमातून मिळाली आहे. उर्फी विशेष अभिनयामुळे प्रकाशझोतात आलेली नाही. सध्या उर्फीची एक मुलाखत सोशल मीडियावर चर्चेत आली आहे. या मुलाखतीत उर्फीने तिच्या स्ट्रगलच्या दिवसांवर भाष्य केले आहे.
फिल्मीज्ञानला दिलेल्या मुलाखतीत उर्फीने सांगितले की, “करियरच्या सुरुवातीच्या दिवसांत मी टेलिव्हिजनमध्ये काम करायचे. त्यामुळे मला अनेकदा तासंतास काम करायला लागायचे. त्यामुळे माझी अवस्था फार खराब व्हायची. मी सुरूवातीच्या दिवसांत ‘मेरी दुर्गा’ मालिकेमध्ये काम करायचे. त्यावेळी मी अनेकदा बॅक टू बॅक 50 तास काम केलं होतं. बॅक टू बॅक काम केल्यामुळे माझी तब्येत ढासळली होती आणि सेटवरच चक्कर येऊन पडली होती.”
हे देखील वाचा – प्रसिद्ध फॅशन एन्फ्लूएंसरवर कोसळला दु:खाचा डोंगर, पोस्ट शेअर करत झाली भावुक
“माझ्या शरीराला सलग 50 तास काम करून वर्कलोड सहन झाला नसल्यामुळे मला चक्कर आली होती. आम्ही पहाटेचा सीन शूट करत होतो. त्यावेळी मला चक्कर आली होती आणि मी बेशुद्ध पडली होती.” यापूर्वीही अनेकदा अभिनेत्रीने टेलिव्हिजन इंडस्ट्रीबद्दल अनेक गोष्टींचा खुलासा केला होता. मुलाखतीमध्ये उर्फीने सांगितले की, “आम्हाला शुटिंग दरम्यान फार कमी तास झोप मिळायची. बाकीच्या वेळी इतर कलाकार आपला सीन शुट करून घ्यायचे. आराम करण्यासाठी फार कमी वेळ मिळत असल्यामुळे फार त्रास व्हायचा. साईड रोल करणाऱ्या सेलिब्रिटींना मालिकेच्या निर्मात्यांकडून आणि दिग्दर्शकांकडून चांगली ट्रिटमेंट मिळत नाही.”
हे देखील वाचा – The Family Man चे किती सीझन असणार? वेबसीरीजबद्दल महत्वाची अपडेट आली समोर
उर्फी जावेदच्या कामाबद्दल बोलायचे तर, अभिनेत्रीने ‘बिग बॉस ओटीटी 1’, ‘बडे भैय्या की दुल्हन’, ‘चंद्रनंदिनी’, ‘आये मेरे हमसफर’ सारख्या अनेक शोजमध्ये काम केले आहे. तर उर्फीने बॉलिवूडमध्ये ‘लव्ह सेक्स और धोका 2’ चित्रपटातून डेब्यू केले आहे. तर ‘फॉलो करलो यार’ या सीरीजमधून तिने ओटीटी क्षेत्रात डेब्यू केले.