'द फॅमिली मॅन'चे किती सीझन असणार?
ओटीटीवर प्रेक्षकांचा कल सर्वाधिक वाढत चालला आहे. कोरोना काळापासून प्रेक्षक सर्वाधिक ओटीटीवर कलाकृती पाहताना दिसतात. आता ओटीटी म्हटलं तर वेबसीरीज आल्याच. ओटीटीवर प्रेक्षकांच्या भेटीला वेगवेगळ्या धाटणीचे वेबसीरीज येत असतात. त्यातीलच एक म्हणजे ‘द फॅमिली मॅन’. ही वेबसीरीज 2019 मध्ये ॲमेझॉन प्राईम व्हिडिओवर रिलीज झाली होती. ह्या सीरीजच्या दोन्हीही सीरीजला प्रेक्षकांचा दमदार प्रतिसाद मिळाला होता. आता सध्या प्रेक्षक सीरीजच्या तिसऱ्या सीझनच्या प्रतिक्षेत आहेत. सध्या सीरीजच्या तिसऱ्या एपिसोडची शुटिंग सुरू आहे. ‘द फॅमिली मॅन’चा तिसरा सीझन रिलीज झालेला नाही तोच चौथ्या सीझनची महत्वाची अपडेट समोर आली आहे.
ह्या वेबसीरीजचे कथानक चार सीझनचेच असणार आहे. पण असं असलं तरीही श्रीकांत तिवारीचे पात्र अभिनेता मनोज वाजपेयीने साकारले होते. मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेता मनोज वाजपेयी या सीरीजचा हिस्सा नसणार आहे. मीड डेने दिलेल्या माहितीनुसार, वेबसीरीजच्या तिसऱ्या सीझनची शुटिंग सध्या सुरू आहे. निर्मात्यांनी वेबसीरीजच्या चौथ्या सीझनच्या स्क्रिप्टिंगच्या कामाला सुरूवात केली आहे. वेबसीरीजचा चौथा सीझन शेवटचा असणार आहे. पहिल्या आणि दुसऱ्या सीझनपेक्षा तिसरा सीझन फार वेगळा असणार आहे. तर चौथ्या सीझनबद्दल बोलायचे तर, तो ही इतर सीझनपेक्षा फार वेगळा असण्याची शक्यता आहे.
हे देखील वाचा – अक्षय कुमारच्या ‘मिशन मंगल’पासून ते ‘रॉकेट्री’पर्यंत ‘हे’ चित्रपट पहाच
मीड डेने दिलेल्या माहितीनुसार, तिसऱ्या सीझनला मिळणाऱ्या प्रतिसादावर चौथ्या सीझनचे कथानक तयार केले जाणार आहे. तिसरा सीझन रिलीज झाल्यानंतर कथानक कन्फर्म केले जाईल. सध्या तरी चौथ्या सीझनमध्येच कथा संपवण्याची योजना निर्मात्यांनी आखली आहे.