नवराष्ट्र / सोलापूर न्यूज नेटवर्क : सोलापूर जिल्ह्यातील ९ नगरपालिकांचा कालावधी येत्या एक दिवसात संपत आहे. कोरोना पार्श्वभूमीवर निवडणुकांची प्रक्रिया अद्याप सुरू झाली नसल्याने आता या सर्व नगरपालिकांवर प्रशासक नियुक्तीची कारवाई सुरू झाली आहे.
जिल्ह्यातील नगरपालिकांची निवडणूक तसेच महापालिकेची निवडणूक कपी होणार याविषयी अनिश्चिततेचं वातावरण आहे. कोरोना पार्श्वभूमीवर निवडणुकांना बंधन आहेतच यातच ओबीसी आरक्षण रद्द झाल्यानं या मुद्यावरही अनेकांची नाराजी आहे.
आरक्षणाविषयी अंतिम निर्णय झाल्याशिवाय निवडणूका घेऊ नयेत असं बहुतेक राजकीय पक्षांच मत पडलं आहे. नगरपालिकांवर प्रशासक नेमताना संबंधित तालुक्यांचे उपविभागीय अधिकारी किंवा त्या नगरपालिकेचं सध्याचे मुख्याधिकारी यांच्याकडेच प्रशासकीय कारभार दिला जाणार आहे. मुदत संपलेल्या सोलापूर जिल्ह्यातील नऊ नगरपरिषदेवर २९ डिसेंबरपासून प्रशासक नियुक्ती करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहे.
या प्रशासकीय अधिकाऱ्यांमध्ये उपविभागीय अधिकारी तहसीलदार मुख्याधिकारी यांची आपापल्या विभागात संबंधित नगरपरिषदेत प्रशासकपदी नियुक्ती करण्यात येत आहे. सोलापूर जिल्ह्यातील बार्शी, पंढरपूर, करमाळा, कुटूंबाडी, मेंदगी, मंगळवेढा येथे उपविभागीय अधिकारी तर सांगोला येथे तहसीलदार व अफलकोट व दूधनी येथे मुख्याधिकारी प्रशासक म्हणून नेमण्यात आले आहेत.
पुणे जिल्ह्यातील १०, सातारा जिल्ह्यातील ८. सांगली जिल्ह्यातील सोलापूर जिल्ह्यातील ९, कोल्हापूर जिल्ह्यातील ९ नगर परिषदेचा समावेश आहे. नगरविकास २ चे प्रधान सचिव महेश पाठक यांनी हा आदेश पारित केला. डिसेंबर २०२१ फेब्रुवारी २०२२ मध्ये पुणे विभागातील मुदत संपलेल्या ४२ नगरपरिषदेवर संबंधित मुख्याधिकारी तहसीलदार व उपविभागीय अधिकारी यांची प्रशासक म्हणून नेमणूक करण्यात आल्याचा शासन आदेश संबंधित पालिका प्रशासनाला प्राप्त झाला आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यातील १०, सातारा जिल्ह्यातील ८ सांगली जिल्ह्यातील ५, सोलापूर जिल्ह्यातील ९. कोल्हापूर जिल्ह्यातील ९ नगर परिषदेचा समावेश आहे. नगरविकास रचे प्रधान सचिव महेश पाठक यांनी
हा आदेश पारित केला असून, कोविड १९ च्या संक्रमणामुळे सार्वत्रिक निवडणुका वेळेवर पार पाहणे अशक्य असल्याने व स्थानिक संस्थांच्या निवडणुक प्रक्रिया पार पाडण्याकरिता अवधी असल्याचे निवडणूक आयोगाने कळविल्याने महाराष्ट्र नगरपरिषदा नगरपंचायती व औद्योगिक नागरी अधिनियमातील तरतूदी केलेल्या कलम ३१७ (३) प्रशासकाची नेमणूक करण्यात येत असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.