
दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळ Indira Gandhi International Airport उडवून देण्याची धमकी अलकायदा दहशदवादी या दहशदवादी संघटनेनं दिल्याची माहिली विमानतळ प्रशासनाने दिली आहे. या धमकीचा ई-मेल Email आल्याने आता विमानतळावरील सुरक्षेत वाढ Security tightened करण्यात आली आहे.
एएनआय ANI या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी संध्याकाळी दिल्ली पोलिसांना Delhi Police आलेल्या मेलमध्ये करणबीर सूरी Karanbir Suri उर्फ मोहम्मद जलाल Mohammad Jalal आणि त्यांची पत्नी शैली शारा Shayle Shara उर्फ हसीना Hasina रविवारी सिंगापूरहून Singapore भारतात येत असल्याचे म्हटले आहे. पुढील एक ते तीन दिवसांत विमानतळावर बॉम्ब लावण्याचा त्यांचा कट आहे. धोका मिळाल्यानंतर सुरक्षा एजन्सींना सतर्क करण्यात आले असून, सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.
Delhi:IGI PS informed Airport Operations Control Centre y'day about a bomb threat e-mail received on planned bomb blast by Al Qaeda Sargana at IGI airport. It stated Karanbir Suri alias Mohamad Jalal&his wife Shaily Shara alias Haseena are coming to India on Sunday from Singapore — ANI (@ANI) August 8, 2021
१५ ऑगस्टच्या 15 August Independence Day पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीत कडक सुरक्षा ठेवण्यात आली आहे. लाल किल्ल्यावरही Red Fort अभूतपूर्व सुरक्षा ठेवली गेली आहे. तिथे अनेक ठिकाणी बॅरिकेडींग करण्यात आले आहे. काही खलिस्तानी बंडखोरांकडून Khalistani rebels हल्ल्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सुरक्षा अधिक कडक करण्यात आली आहे. अतिसंवेदनशील ठिकाणी अँटी ड्रोन सिस्टीमही तैनात करण्यात आली आहे.
बॉम्ब हल्ल्याच्या धमक्यांचे मूल्यांकन करणाऱ्या समितीद्वारे अशा धमक्यांना नॉन स्पेसिफिक असल्याचं म्हटलं आहे. तरीही स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजरनुसार SOP सिक्युरिटी ऑपरेशन कंट्रोल सेंटरनही सर्व संबंधित यंत्रणा आणि सुरक्षा जवानांना अलर्ट केलं आहे. आयजीआय विमानतळावरील सर्व टर्मिनसवर कसून तपासणी केली जात आहे. आजूबाजूच्या नाक्यांवरही वाहनांची तपासणी केली जात असून गस्त वाढवण्यात आली आहे.