Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

अल्कलाइन डाएट : खवय्यांसाठी नवीन खाद्यफंडा

आजचे युग हे रोज नवनवीन फंडे ऐकून त्याच्यामागे धावण्याचे आहे. खाण्याबाबत खूप चोखंदळ असलेल्या लोकांचा, ‘आहारात अल्कलाइन खाद्यपदार्थ असावेत,’ असा एक नवीन फंडा आजकाल खूप गाजू लागला आहे. अल्कलाइन आहाराची ही भानगड समजण्यासाठी, ऍसिड आणि अल्कली म्हणजे काय, ते समजावून घ्यायला लागेल. कुठल्याही द्रव पदार्थामधल्या रासायनिक गुणधर्माचे मोजमाप पीएचने होते. ही पीएच 1 ते 7 असल्यास तो पदार्थ आम्लकारक किंवा अॅसिडिक असतो आणि 7 पेक्षा जास्त पीएच असल्यास तो अल्कालाइन किंवा तुरट समजला जातो. अॅसिडिक पदार्थाला अल्कालाइन पदार्थ उदासीन किंवा न्यूट्रल करतो.

  • By Navarashtra Staff
Updated On: Jan 01, 2021 | 03:54 PM
अल्कलाइन डाएट : खवय्यांसाठी नवीन खाद्यफंडा
Follow Us
Close
Follow Us:

 आजचे युग हे रोज नवनवीन फंडे ऐकून त्याच्यामागे धावण्याचे आहे. खाण्याबाबत खूप चोखंदळ असलेल्या लोकांचा, ‘आहारात अल्कलाइन खाद्यपदार्थ असावेत,’ असा एक नवीन फंडा आजकाल खूप गाजू लागला आहे. अल्कलाइन आहाराची ही भानगड समजण्यासाठी, ऍसिड आणि अल्कली म्हणजे काय, ते समजावून घ्यायला लागेल. कुठल्याही द्रव पदार्थामधल्या रासायनिक गुणधर्माचे मोजमाप पीएचने होते. ही पीएच 1 ते 7 असल्यास तो पदार्थ आम्लकारक किंवा अॅसिडिक असतो आणि 7 पेक्षा जास्त पीएच असल्यास तो अल्कालाइन किंवा तुरट समजला जातो. अॅसिडिक पदार्थाला अल्कालाइन पदार्थ उदासीन किंवा न्यूट्रल करतो. पाण्याची पीएच 7 असल्याने ते न्यूट्रल समजले जाते. आहारामधल्या आंबट, गोड, तुरट, तिखट अशा चवी खाद्यवेड्या लोकांच्या जिभेवर नेहमीच रेंगाळत असतात. या पदार्थांमध्ये अॅसिड आणि अल्कली असेही गुणधर्म असतात. थोडक्यात चवीचे मोजमापसुद्धा पीएचनेच होते.

आपल्या जठरात अन्नपचनासाठी हायड्रोक्लोरिक आम्ल असतं. त्याची पीएच 2 ते 3 असते, त्यामुळे ते खूप तीव्र आम्ल असते. आहारातल्या तिखट गोष्टी, मांसाहार, चमचमीत मसालेदार पदार्थ, यांमुळे पोटातली पीएच वाढते. खाण्यात सतत अशाच पदार्थांची भरमार असेल, तर त्या व्यक्तीला पोटाचे त्रास सुरू होतात. अपचन, करपट ढेकर, छातीत जळजळणं, उलटी किंवा मळमळ होणे, अशी लक्षणे सतत दिसू लागतात. त्यामुळे आपल्या आहारात जर अल्कालाइन पदार्थ असतील, तर अॅसिडिक पदार्थांची तीव्रता कमी होते आणि शरीरात एक प्रकारचा समतोल निर्माण होतो. साहजिकच आरोग्य उत्तम राहते. या समजुतीत अशा व्यक्तींना पोटाचेच नव्हे, तर मूत्रपिंडाचे आणि हृदयाचे त्रासही कमी होतात.

अल्कलाइन पदार्थ
हिरव्या पालेभाज्या (Green leafy vegetables) : ताटात पालेभाजी दिसली, की अनेक जण नाक मुरडतात; पण हिरव्या पालेभाज्यांमध्ये शरीराला आवश्यक असे अनेक गुण आहेत. हिरव्या भाज्यांमध्ये फायबरचे प्रमाण भरपूर असते. ‘ए’, ‘सी’ आणि ‘के’ ही जीवनसत्त्वे आणि लोह असते. साहजिकच पालक, माठ, चाकवत, मेथी, चुका, अंबाडी, शेपू, शेवग्याची पाने, पुदिना, कोथिंबीर अशा पालेभाज्या खाल्ल्याने शरीरातील आम्ल नियंत्रित राहते.

फुलभाज्या (Cauliflower): कोबी, कॉलीफ्लॉवर, ब्रोकोली अशा फुलभाजा आहारात अल्कली स्वाद निर्माण करतात. या भाज्यात शरीराला उपयुक्त अशी फायटोकेमिकल्स असतात. ढोबळी मिरची, घेवडा, वाटाणा याबरोबर या भाज्या बनवल्यास त्यांचे पोषणमूल्य वाढते.

रसाची फळे (Juicy fruits) : लिंबू, संत्रे, मोसंबी, अननस अशी रसदार फळे आंबट असल्याने ती वरवर अॅसिडिक वाटतात; पण ती अल्कलाइन गुणधर्म वाढवणारी असतात, असे या समजुतीप्रमाणे मानले जाते. साहजिकच जेवल्यावर होणारे अपचन कमी होण्यास ही फळे उपयुक्त ठरतात. यामध्ये ‘क’ जीवनसत्व आणि फायबर भरपूर असते.

समुद्र वनस्पती (Sea Plants) : रेड अल्गी, ग्रीन अल्गी, ब्राऊन अल्गी, सी ग्रेप्स, दस्मिना अशा समुद्रवनस्पती खनिज पदार्थांनी समृद्ध असतात. आपल्याकडे या फारशा वापरल्या जात नाहीत; पण त्यांच्यात अल्कलाइन गुणधर्म असतो आणि शारीरिक स्वास्थ्याला त्या उपयुक्त असतात.

कंदमुळे (Tubers): गाजर, मुळा, रताळे, बीट, शिंगाडे अशी कंदमुळे अल्कलाइन गुणांनी आणि खनिजे, प्रथिने, पिष्टमय पदार्थांनी युक्त असतात. ती सलाड स्वरूपात कच्ची खाल्यास खूपच चांगली असतात. उकडून किंवा जास्त शिजवून खाताना त्यांच्यातली सत्वे नष्ट होऊ शकतात.

मोसमी फळे (Seasonal fruits) : अंजीर, सीताफळ, सफरचंद, कलिंगड, द्राक्ष, जर्दाळू, डाळिंब अशी त्या त्या मोसमात मिळणारी फळं अल्कलाइन असतात. त्यांच्यामध्ये जीवनस्निग्धसत्वे व खनिज पदार्थांची रेलचेल असते.

कवच असलेली फळे (Fruits with shells): काजू, अक्रोड, बदाम अशी सुकामेवा या वर्गवारीतील फळांत स्निग्ध पदार्थ भरपूर असतात शिवाय ती अल्कलाइन गुणांनी युक्त असतात. आपल्या रोजच्या आहारात त्याचा थोडा समावेश असणे चांगले असते.
कांदा, लसूण, आले याशिवाय भारतीय पद्धतीचा स्वयंपाक होऊच शकत नाही.

Web Title: Alkaline diet a new food fund for eaters

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 01, 2021 | 03:54 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.