फोटो सौजन्य- सोशल मीडिया
Gadhinglaj Social Update: गडहिंग्लज येथील चैतन्य अपंगमती विकास विद्यालय (निवासी) येथे नुकताच कै. अनुप दत्तात्रय कोरवी यांचा पहिला स्मृतिदिन अत्यंत भावपूर्ण वातावरणात पार पडला. या निमित्ताने कोरवी परिवार आणि मित्रपरिवाराच्या वतीने विद्यालयातील लहान मुलांना खाऊचे वाटप करण्यात आले. अनुप यांच्या आठवणींना उजाळा देत उपस्थितांनी त्यांच्या समाजकार्याचा व मनमिळाऊ स्वभावाचा गौरव केला.
मनोगत व्यक्त करताना मान्यवरांनी अनुप यांचा मनमिळाऊ स्वभाव आणि त्यांचा हासरा चेहरा उपस्थितांसमोर उभा केला. अनुप यांची इच्छा व आकांक्षा आपण सर्वजण मिळून पूर्ण करूया, अशी भावना व्यक्त करण्यात आली. तसेच, सर्व मित्रपरिवाराने एकत्र येऊन सातत्याने चांगले समाजकार्य करावे आणि याद्वारे अनुप यांच्या आठवणी कायम जिवंत ठेवाव्यात, असे भावनिक आवाहन पत्रकार मेघराज हट्टी आणि महाकाल सेना अध्यक्ष प्रसाद ताडे यांनी आपल्या मनोगतात केले. दिव्यांग मुलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवत एका चांगल्या उपक्रमाने अनुप कोरवी यांना उपस्थितांनी आदरांजली अर्पण केली.
या कार्यक्रमास चैतन्य अपंगमती विकास विद्यालयाच्या मुख्याध्यापक अपर्णा कांबळे, विद्यालयाचा पूर्ण स्टाफ, तसेच दिवंगत अनुप यांचे वडील दत्तात्रय आप्पा कोरवी, काका विलास आप्पा कोरवी, भाऊ नागराज दत्तात्रय कोरवी आणि संयुक्त श्री राम सेना गडहिंग्लजचे अध्यक्ष अमोल रमेश कोरवी उपस्थित होते. तसेच महाकाल सेना कडगावचे अध्यक्ष प्रसाद ताडे, पत्रकार तथा निवेदक मेघराज हट्टी, कट्टा ग्रुपचे वैभव ठोंबरे, टायगर ग्रुप गडहिंग्लज तालुका अध्यक्ष कुमार शिंदे, ह्युमन राइट्सचे विकास दिवटे, सौरभ कोरी, ओमकार इंदुलकर, विघ्नेश दळवी, बाळू जाडे, पवन आणि अमोल कोरवी यांच्यासह अनेक मान्यवर व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होता.
Ans: गडहिंग्लज येथील चैतन्य अपंगमती विकास विद्यालय (निवासी) येथील लहान मुलांना खाऊचे वाटप करून सामाजिक बांधिलकी जपत आदरांजली अर्पण करण्यात आली.
Ans: हा कार्यक्रम १७ ऑक्टोबर २०२६ रोजी चैतन्य अपंगमती विकास विद्यालय, गडहिंग्लज येथे पार पडला.






