Asuddin Owaisi
हिजाबबाबत (Hijab Controversy) सुरू असलेल्या वादात अद्याप कोणताही अंतिम निर्णय झालेला दिसत नाही. दोन्ही बाजू आपापल्या मतावर ठाम आहेत. दरम्यान, एमआयएमचे (MIM) नेते असदुद्दीन ओवैसी (Asduddin Owaisi) यांनी हिजाबवरील कोणत्याही बंदीला विरोध करणार असल्याचे म्हटले आहे. मी कोणाचा गुलाम नाही, टोपी आणि दाढी ठेवणार आणि माझी मुलगी हिजाब घालणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
[read_also content=”मुंबई पालिका प्रभाग पुनर्रचनेविरोधातील याचिका कोर्टाने दंडासहित फेटाळली, भाजप नेते सिंह आणि मनसेचे देवरे यांना प्रत्येकी २५ हजारांचा दंड https://www.navarashtra.com/mumbai/kokan/mumbai/mumbai-high-court-rejected-pil-related-to-ward-reorganization-in-mumbai-nrsr-242884.html”]
सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला जात आहे. त्यात असदुद्दीन ओवैसी इशारा देत आहेत की, “तुम्हाला माझी दाढी आवडत नसेल तर काळजी करू नका, मी दाढी ठेवेन, तुम्हाला माझ्या डोक्यावरची टोपी आवडली नाही तर मी टोपी घालेन, तुम्ही काळजी करू नका. तुम्हाला हिजाब घातलेला आवडत नाही, माझी मुलगी हिजाब घालेल. मी तुमचा गुलाम नाही, मी जगात राहिलो तर भारतीय राज्यघटनेनुसार माझी प्रतिष्ठा राखून जगेन”.
मैं किसी का ग़ुलाम नहीं हूं, मैं टोपी भी पहनूंगा और दाढ़ी भी रखूंगा और मेरी बेटी भी हिजाब पहनेगी। pic.twitter.com/S1z5pSbjah
— Asaduddin Owaisi (@asadowaisi) February 20, 2022
हा व्हिडिओ कुठला आहे हे अद्याप कळलेले नाही. मात्र रविवार, २० फेब्रुवारी रोजी त्यांच्या सार्वजनिक सभा सवैजपूर, लखीमपूर खेरी, खलीलाबाद आणि संदिला येथे होत्या. हा व्हिडिओ त्या बैठकीचा आहे की वेगळा बनवला आहे, हे स्पष्ट झालेले नाही. हिजाब ते दाढी आणि टोपीवर आपली भूमिका स्पष्ट करताना ओवैसी यांनी कोणाचीही गुलामी सहन करणार नसल्याचे सांगितले. आपला फक्त भारतीय संविधानावर विश्वास आहे आणि त्या अंतर्गत राहून आपल्या शब्दावर ठाम असल्याचे सांगितले.