Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 3 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Video – अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ पहिल्यांदाच एकत्र करणार काम, ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ चित्रपटाचा टीझर एकदा नक्की बघा

अक्षय कुमार (Akshay Kumar) लवकरच अभिनेता टायगर श्रॉफसोबत (Tiger Shroff) ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ (Bade Miyan Chote Miyan Teaser Release) या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाचा एक टीझर प्रदर्शित झाला आहे.

  • By साधना
Updated On: Mar 14, 2022 | 03:33 PM
bade miyan chote miyan teaser

bade miyan chote miyan teaser

Follow Us
Follow Us:

अभिनेता अक्षय कुमार (Akshay Kumar) गेल्या काही दिवसांपासून लागोपाठ अनेक चित्रपटांची घोषणा करत आहे. अक्षय कुमारने आता आणखी एका चित्रपटाची घोषणा केली आहे. तसेच या चित्रपटाचा टीझरही रिलीज करण्यात आला आहे. अक्षय कुमार लवकरच अभिनेता टायगर श्रॉफसोबत ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ (Bade Miyan Chote Miyan Teaser Release) या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाचा एक टीझर प्रदर्शित झाला आहे. या चित्रपटात अक्षय कुमार हा ‘बडे मियाँ’ची भूमिका साकारत आहे. तर टायगर श्रॉफ (Tiger Shroff) हा ‘छोटे मियाँ’ची भूमिका साकारताना दिसत आहे.


अक्षय कुमारने सोशल मीडियावर या चित्रपटाचा टीझर शेअर केला आहे. या पोस्टमध्ये त्याने टायगर श्रॉफला टॅग केले आहे. “ज्यावर्षी तू या जगात पदार्पण केलेस म्हणजे जन्म घेतलास, त्याच वर्षी मी चित्रपटांमध्ये पदार्पण केले. तरीही तू माझ्याशी सामना करणार आहेस का, छोटे मियाँ ? चला तर मग करुया फुल ॲक्शन”, असे त्याने म्हटले आहे.

या चित्रपट ॲक्शनने भरलेला असल्याचे टीझरमध्ये दिसत आहे. या टीझरमध्ये अमिताभ बच्चन आणि गोविंदाचा यांचा लोकप्रिय चित्रपट ‘बडे मियाँ छोटे मियाँ (१९९८)’ चा टायटल ट्रॅकही पाहायला मिळत आहे. हा चित्रपट पुढच्या वर्षी म्हणजेच २०२३ च्या ख्रिसमसमध्ये प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या निमित्ताने अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफची जोडी पहिल्यांदाच मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे.

[read_also content=”सचिनने गांगुलीला करीअर संपवण्याची धमकी दिली होती! या किरकोळ प्रकरणावरून मोठा वाद https://www.navarashtra.com/sports/cricket/tendulkar-had-threatened-ganguly-to-end-his-career-big-argument-over-this-minor-issue-234562/”]

‘बडे मियाँ छोटे मियाँ’ या चित्रपटाचे दिग्दर्शन अली अब्बास जफर करत आहेत. तर पूजा एन्टरटेन्मेंट आणि वाशू भगनानी हे या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. यात अक्षय कुमार हा ‘बडे मियाँ’ची भूमिका साकारणार आहे. तर टायगर श्रॉफ हा ‘छोटे मियाँ’च्या भूमिकेत पाहायला मिळत आहे.

Web Title: Bade miyan chote miyan teaser realease akshay kumar and tiger shroff to share the screen nrsr

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 08, 2022 | 02:51 PM

Topics:  

  • Akshay Kumar
  • tiger shroff

संबंधित बातम्या

Nusrat Bharucha Bali Accident: ऑक्सिजन सपोर्टवर मुंबईत पोहोचली नुसरत! अभिनेत्रीचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत
1

Nusrat Bharucha Bali Accident: ऑक्सिजन सपोर्टवर मुंबईत पोहोचली नुसरत! अभिनेत्रीचा व्हिडीओ पाहून चाहते चिंतेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.