Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 19 नोव्हेंबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharastra Politics |
  • India Vs New Zealand |
  • Under 19 Asia Cup |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Tiger Shroff Comeback: गोळीबाराच्या घटनेनंतर टायगर श्रॉफचं धमाकेदार कमबॅक; ‘तेनु लेके जाना’चा टीझर रिलीज

Tiger Shroff Comeback: गोळीबाराच्या घटनेनंतर महिनाभराने टायगर श्रॉफ सोशल मीडियावर परतला. ‘तेनू लेके जाना’ गाण्याचा टीझर शेअर करताच चाहत्यांनी अभिनेत्यावर प्रेमाचा वर्षाव केला.

  • By अमृता यादव
Updated On: Nov 19, 2026 | 02:21 PM
(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

(फोटो सौजन्य-सोशल मीडिया)

Follow Us
Follow Us:

Tiger Shroff Comeback: बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ गोळीबाराच्या घटनेनंतर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. जवळपास महिनाभर सोशल मीडियापासून दूर राहिल्यानंतर अभिनेत्याने दमदार पुनरागमन केलं आहे. सोमवारी टायगरने त्याच्या आगामी ‘तेनू लेके जाना’ या गाण्याचा टीझर इन्स्टाग्रामवर शेअर केला. त्याचा डॅशिंग लूक आणि जबरदस्त डान्स पाहून चाहते आनंदित झाले असून, सोशल मीडियावर त्याच्यावर प्रेमाचा वर्षाव करत आहेत.

गोळीबाराच्या घटनेनंतर पहिली सोशल मीडिया पोस्ट

१८ ऑक्टोबर रोजी जुहू परिसरात टायगर श्रॉफवर गोळीबाराची घटना घडली होती. या घटनेनंतर अभिनेत्याची ही पहिली सोशल मीडिया पोस्ट आहे. शेअर केलेल्या टीझरमध्ये टायगर काळ्या रंगाच्या टक्सीडोमध्ये दिसत असून, त्याचा फिटनेस आणि डॅशिंग अंदाज चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे. त्याच्यासोबत अभिनेत्री केतिका शर्मा देखील दिसत आहे. टायगरच्या या पुनरागमनामुळे चाहत्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

‘तेनू लेके जाना’मध्ये टायगर-केतिकाची रोमँटिक केमिस्ट्री

टायगर श्रॉफचे ‘तेनू लेके जाना’ हे गाणे टी-सीरीजच्या बॅनरखाली १८ नोव्हेंबर २०२६ रोजी प्रदर्शित झाले आहे. हे २००९ मध्ये आलेल्या ‘जय वीरू’ चित्रपटातील ‘तेनू ले’ या गाण्याचे नवीन व्हर्जन आहे. मूळ गाणे ओमर इनायत यांनी गायले होते, तर त्यात कुणाल खेमू आणि अंजना सुखानी दिसले होते. नव्या व्हर्जनमध्ये टायगर श्रॉफ आणि केतिका शर्मा यांची जोडी प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.

‘एक और चांस, एक और डांस’; टायगरच्या डान्स मूव्ह्सची चर्चा

गाण्याचा टीझर शेअर करत टायगरने ‘एक और चांस, एक और डांस’ असे कॅप्शन दिले आहे. टीझरमध्ये त्याचे अप्रतिम डान्स मूव्ह्स, सिक्स पॅक अॅब्स आणि रोमँटिक अंदाज पाहायला मिळत आहे. केतिका शर्मासोबतची त्याची केमिस्ट्रीही चाहत्यांना आवडली आहे.

टायगरच्या बहिणी कृष्णा श्रॉफनेही भावाच्या कमबॅकवर आनंद व्यक्त केला आहे. तिने कमेंट सेक्शनमध्ये फायर इमोजी शेअर केला, तर दुसऱ्या कमेंटमध्ये ‘तो परत आला आहे’ असे म्हटले. चाहत्यांनीही टायगरच्या पोस्टवर भरभरून प्रतिक्रिया दिल्या. एका चाहत्याने ‘आमचा हिरो परत आला आहे’, तर दुसऱ्याने ‘टायगर २.० व्हर्जन लोड झाले आहे’ अशी कमेंट केली. अनेक चाहत्यांनी बऱ्याच दिवसांनंतर टायगरला सोशल मीडियावर पाहून आनंद व्यक्त केला.

Sunita Ahuja New Stylish Look: सुनीता आहुजाचा जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन; छोट्या केसांसह स्टायलिश अंदाज पाहून सून कश्मिराही फिदा!

सोशल मीडियासोबत शूटिंगलाही टायगरची सुरुवात

सोशल मीडियावर पुनरागमन करण्यापूर्वी टायगर श्रॉफ कामावरही परतला आहे. हिंदुस्तान टाइम्सच्या वृत्तानुसार, त्याने नुकतेच पुण्यात जान्हवी कपूरसोबतच्या आगामी ‘लग जा गले’ चित्रपटातील एका गाण्याचे चार दिवसांचे शूटिंग पूर्ण केले. हे चित्रीकरण पुण्यातील कल्याणी नगर परिसरातील एका प्रसिद्ध पबमध्ये झाले. या गाण्याचे नृत्यदिग्दर्शन बॉस्को मार्टिस यांनी केले आहे.

चित्रीकरणादरम्यान टायगर सोनेरी केसांच्या लूकमध्ये दिसला. शूटिंगच्या मधल्या वेळेत तो नर्तक आणि कर्मचाऱ्यांसोबत फोटो काढतानाही दिसल्याचे वृत्त आहे. त्यामुळे गोळीबाराच्या घटनेनंतर टायगर आता पुन्हा कामात सक्रिय झाला असून, त्याच्या आगामी प्रोजेक्ट्सकडे चाहत्यांचे लक्ष लागले आहे.

Aai Tuljabhavani Serial: महादेवांचं गुपित तुळजाईला समजलं; आता मायावी पानामुळे रंगणार अनोखा लपंडाव!

Web Title: Tiger shroff comeback after firing incident tenu leke jana teaser fans reaction

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 19, 2026 | 02:21 PM

Topics:  

  • entertainment
  • tiger shroff

संबंधित बातम्या

Samay Raina: समय रैनाच्या शोमध्ये नेमकं काय घडलं? स्पर्धकाचा रडतानाचा व्हिडीओ व्हायरल; बक्षिसाच्या रकमेवरही प्रश्न
1

Samay Raina: समय रैनाच्या शोमध्ये नेमकं काय घडलं? स्पर्धकाचा रडतानाचा व्हिडीओ व्हायरल; बक्षिसाच्या रकमेवरही प्रश्न

Sunita Ahuja New Stylish Look: सुनीता आहुजाचा जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन; छोट्या केसांसह स्टायलिश अंदाज पाहून सून कश्मिराही फिदा!
2

Sunita Ahuja New Stylish Look: सुनीता आहुजाचा जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन; छोट्या केसांसह स्टायलिश अंदाज पाहून सून कश्मिराही फिदा!

Aai Tuljabhavani Serial: महादेवांचं गुपित तुळजाईला समजलं; आता मायावी पानामुळे रंगणार अनोखा लपंडाव!
3

Aai Tuljabhavani Serial: महादेवांचं गुपित तुळजाईला समजलं; आता मायावी पानामुळे रंगणार अनोखा लपंडाव!

Ranbir Kapoor Ramayana Movie: १४ दिवसांत रणबीरच्या ‘रामायण’ची १५०० कोटींच्या क्लबमध्ये एंट्री! जगभरात बॉक्स ऑफिसवर घातला धुमाकूळ
4

Ranbir Kapoor Ramayana Movie: १४ दिवसांत रणबीरच्या ‘रामायण’ची १५०० कोटींच्या क्लबमध्ये एंट्री! जगभरात बॉक्स ऑफिसवर घातला धुमाकूळ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.