Pak vs Ban: बांगलादेशने पाकड्यांना चारली धूळ; मायदेशातील पराभवामुळे पाकिस्तानचे WTC चे स्वप्न भंगले
सध्या पाकिस्तान आणि बांगलादेश यांच्यात २ सामन्यांची टेस्ट सिरीज खेळवली जात आहे. ही सिरीज पाकिस्तानमध्ये खेळली जात आहे. दरम्यान पाकिस्तानच्या रावळपिंडी येथे बांगलादेश विरुद्ध पाकिस्तान असा सामना खेळला गेला. या सामन्यात बांगलादेशने पाकिस्तानला पराभूत केले आहे. रावळपिंडी येथे सुरू असलेल्या सामन्यात बांगलादेशने पाकिस्तानला १० गडी राखून पराभूत केले आहे. अशा प्रकारे विजय मिळवून बांगलादेशने एक नवीन इतिहासच घडविला आहे. बांग्लादेशच्या विजयामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या गुणतालिकेत बदल पाहायला मिळत आहेत.
दोन सामन्यांच्या सिरीजमध्ये बांगलादेशने विजय प्राप्त करून १-० अशी आघाडी मिळविली आहे. या विजयाने डब्ल्यूटीसीची फायनल खेळण्याच्या पाकिस्तानच्या आशा धुळीस मिळवल्या आहेत. तर दुसरीकडे इंग्लंडने देखील श्रीलंकेविरुद्ध विजय मिळवला आहे. या सामन्यात बांगलादेशने टॉस जिंकत प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. दरम्यान पाकिस्तानने बांगलादेशला दुसऱ्या डावात ३० धावांचे लक्ष्य दिले होते. ते लक्ष्य बांगलादेशने एकही गडी न गमावता सामना जिंकला आहे.
आयसीसी वर्ल्ड चॅम्पिअनशिप २०२३-२०२५ मध्ये बांगलादेशविरुद्ध पराभव झाल्याने पाकिस्तानची सातव्या स्थानावरून आठव्या स्थानावर घसरण झाली आहे. त्यांच्या खात्यात आता २२ गुण जमा झाले आहेत. मात्र मायदेशातच प्रभाव झाल्याने पाकिस्तानची स्थिती बिकट झाली आहे. तर आजच्या विजयामुळे बांगलादेशने विजय मिळवल्याने सहाव्या स्थानावर पोहोचला आहे.
Bangladesh 🆚 Pakistan | 1st Test | Rawalpindi
Bangladesh won by 10 wickets 👏🇧🇩
PC: PCB#BCB #Cricket #BDCricket #Bangladesh #PAKvBAN #WTC25 pic.twitter.com/yqNmaQ6rsL— Bangladesh Cricket (@BCBtigers) August 25, 2024
इंग्लंडने श्रीलंकेविरुद्ध विजय मिळवल्यामुळे तीन सामन्यांचा सिरीजमध्ये पहिल्या सामन्यात विजय मिळवला आहे. त्यामुळे इंग्लंडच्या सांगणे डब्ल्यूटीसीच्या गुणतालिकेत मोठी झेप घेतली आहे. इंग्लंडचा संघ आता ४ त्या स्थानावर पोहोचला आहे. ऑस्ट्रेलिया दुसऱ्या स्थानावर आणि या गुणतालिकेत भारत अव्व्ल स्थानावर आहे.