Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

कडक मराठीचं, कडक गाणं…’मनी हाईस्ट’ मधील ‘Bella Ciao मराठी व्हर्जन’ ची चर्चा!

स्वप्निल संजय मुनोत आणि अक्षय मुनोत यांच्या 'अहमदनगर फिल्म कंपनी'ची निर्मिती असलेलं 'Bella Ciao चं कडक मराठी व्हर्जन ' ' कसा ला' गाण्याची कल्पना नितिश कटारिया आणि स्वप्निल  मुनोत यांची आहे.

  • By Sanchita Thosar
Updated On: May 13, 2021 | 07:15 PM
कडक मराठीचं, कडक गाणं…’मनी हाईस्ट’ मधील ‘Bella Ciao मराठी व्हर्जन’ ची चर्चा!
Follow Us
Close
Follow Us:

गेल्या वर्षीचा लॉकडाऊन कोणीच आयुष्यात विसरणार नाही. अनेकांनी खूप काही गमावलं, कमावलं, माणुसकी दिसून आली, चांगल्या कामात एकी सुद्धा दिसून आली. वर्क फ्रॉम होम असल्यामुळे प्रेक्षकांचे घरबसल्या मनोरंजन करण्यासाठी बरेच सिनेमे, वेब सिरीज आल्या . त्या दरम्यान प्रदर्शित झालेल्या अनेक वेबसिरीज पैकी एक ‘मनी हाईस्ट’ ही वेब सिरीज विशेष गाजली. या वेब सिरीजमधील ‘Bella Ciao’ हे गाणं सुद्धा खूप लोकप्रिय झालं आणि खूप कमी वेळेत सर्वांच्या पसंतीस सुद्धा पडलं.

नवीन वर्षात सर्वकाही सुरळीतपणे सुरू होईल अशी आशा जनतेने ठेवली होती, पण सुरुवातीचे काही महिने गेल्यावर पुन्हा लॉकडाऊन लागला आणि History Repeats असं म्हणावं लागेल. गेल्या वर्षी जी कोरोनाची लाट आली ती गंभीर होतीच पण आता ही दुसरी लाट महाभयंकर आहे आणि हे आपण सर्वजण पाहतोय. असं असूनही काही ठिकाणी गर्दी आणि मास्क हनुवटीच्या खाली आहेच. लोकांना त्यांच्या पद्धती नेच समजावून सांगण्यासाठी ‘कडक एंटरटेमेंट’ घेऊन आले आहे ‘Bella Ciao चं कडक मराठी व्हर्जन’.

स्वप्निल संजय मुनोत आणि अक्षय मुनोत यांच्या ‘अहमदनगर फिल्म कंपनी’ची निर्मिती असलेलं ‘Bella Ciao चं कडक मराठी व्हर्जन ‘ ‘ कसा ला’ गाण्याची कल्पना नितिश कटारिया आणि स्वप्निल  मुनोत यांची आहे.

“हल्ली काही लोकांना गोष्टी, परिस्थिती फिल्मी पद्धतीने समजवून सांगितल्यावर त्या जास्त लवकर समजतात असं एक माझं वैयक्तिक निरीक्षण आहे. एक चांगला संदेश समाजात पोहचावा, त्या गाण्यातून लोकांनी बोध घ्यावा, सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य ती पाऊलं उचलावी, स्वतःची आणि इतरांची पण काळजी घ्यावी हे सांगण्या मागचा एक छोटासा प्रयत्न म्हणून आमचं हे ‘Bella Ciao चं कडक मराठी व्हर्जन’. कोरोनाची पहिली लाट आणि दुसरी लाट पाहिली आणि आता ‘बस्स, पुरे!’ असं झालंय. त्यात तिसरी लाट येण्याची पण शक्यता वर्तवली जात आहे, हे सगळं आपण थांबवू शकतो फक्त मूलभूत काळजी घेऊन. त्यामुळे या गाण्याच्या मार्फत मी सर्वांना एकच विनंती करतो की, कृपया मास्क घाला, सुरक्षित अंतर ठेवा, सॅनिटायझर वापरा आणि गरज असल्याशिवाय बाहेर जाणं टाळा.”

कडक एंटरटेमेंट, नरेंद्र फिरोदिया, मयुरी स्वप्निल मुनोत आणि श्रुती अक्षय मुनोत हे या गाण्याचे प्रस्तुतकर्ते आहेत. तसेच, गाण्याचं दिग्दर्शन संदीप दंडवते यांनी केले असून गाण्याचे बोल अतिश हरेल आणि Sanja ( संजा) यांनी लिहिले आहे. वोकल आणि संगीत दिग्दर्शनाची जबाबदारी निरंजन पेडगांवकर यांनी सांभाळली आहे. कडक मराठीच्या युट्यूब चॅनेलच्या माध्यमातून घराघरांत पोहचलेले कलाकार महेश काळे, लहुकुमार चोभे, वैभव कुऱ्हाडे, तेजस अंधाळे, कन्हैया तिवारी, रोहित पोफाळे यांनी या गाण्यात अभिनय केला आहे.

Web Title: Bella ciao marathi version on kadak marathi nrst

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 13, 2021 | 07:15 PM

Topics:  

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.