Big expansion in Union Cabinet? 23 ministers will be required
दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुसऱ्या कार्यकाळातील दोन वर्षांतील मंत्रालयाच्या कामाचा लेखाजोखा घेतला. यात त्यांनी 20 कॅबिनेट मंत्री आणि स्वतंत्र प्रभार असलेल्या मंत्र्यांच्या कामगिरीचा आढावा घेतला आहे. मोदींनी घेतलेला लेखाजोखा म्हणून मोठे फेरबदल आणि केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराची नांदी समजली जाते. या मंत्रिमंडळ विस्तार करताना मोदींच्या टीममध्ये 23 मंत्र्यांचा समावेश होण्याची शक्यता आहे.
केंद्रीय मंत्रिमंडळात पंतप्रधानांसह 55 मंत्री आहेत. दरम्यान, आता होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात 23 अजून मंत्र्यांचा समावेश होण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी आणि इतर मंत्र्यांसोबत बैठक घेतली. या बैठकीला परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर, केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक काही कारणांमुळे उपस्थित नव्हते. कॅबिनेट, राज्यमंत्री आणि स्वतंत्र प्रभार असलेल्ल्या मंत्र्यांना नेमून दिलेले कार्य पूर्ण करण्यासाठी लेखी रूपरेखा दिली होती. सरकारमधील काही महत्त्वाच्या विभागाच्या कामगिरीचा आढावा घेण्यास भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना निमंत्रित करण्यात आले होते.
जेडीयुला दोन कॅबिनेट मंत्रीपदे दिली जातील. वायएसआर-काँग्रेसची मंत्रिमंडळात सामील होण्याची इच्छा नसली तरी वायएसआर-काँग्रेसला लोकसभेचे उपाध्यक्षपद दिले जाऊ शकते. प. बंगाल, आसाम आणि महाराष्ट्रालाही प्रतिनिधित्व दिले जाणार आहे. महाराष्ट्राकडून खासदार नारायण राणे, रणजितसिंह नाईक-निंबाळकर, प्रीतम मुंडे आणि उदयनराजे भोसले यांच्या नावाची चर्चा आहे. उत्तर प्रदेशला अधिक प्रतिनिधित्व दिले जाणार आहे. केंद्रीय मंत्रिमंडळात तीन कॅबिनेट मंत्र्यांसह उत्तर प्रदेशचे 8 मंत्री आहेत.
[read_also content=”Very Good! अशीच जीरली पाहिजे चीनची https://www.navarashtra.com/latest-news/hit-china-economically-43-of-indians-did-not-buy-any-chinese-goods-nrvk-142904.html”]
[read_also content=”केस कधीच पांढरे होणार नाहीत; केसांच्या सर्व समस्यांवर एकच रामबाण उपाय https://www.navarashtra.com/latest-news/hair-will-never-turn-white-a-single-elixir-for-all-hair-problems-nrvk-140790.html”]
[read_also content=”दोन चमचे बिअरमध्ये… https://www.navarashtra.com/latest-news/beer-good-for-the-face-give-it-a-try-nrvk-138996.html”]
[read_also content=”तुमची बर्थ डेट काय आहे? https://www.navarashtra.com/latest-news/people-born-on-these-dates-are-lucky-in-terms-of-money-nrvk-138985.html”]
[read_also content=”अशी मौत कुणाला येऊ नये https://www.navarashtra.com/latest-news/husband-and-wife-die-due-to-electric-shock-in-bid-nrvk-138972.html”]