राजस्थानमध्ये जे कट-कारस्थान सुरु आहे व ते भाजपच्या किती पत्थ्यावर पडेल हे कालौघात दिसून जाईल, पण भाजपच्या नेत्या, राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजेंना मात्र त्यांच्या राज्यात अशोक गहलोतच मुख्यमंत्री हवेत. काँग्रेसच्या गहलोतांचे सरकार वाचविण्यासाठी त्या सातत्याने प्रयत्न करीत आहेत, कारण त्यांना सचिन पायलट मुख्यमंत्री नकोच. सचिन पायलट यांच्या भाजप प्रवेशात त्या स्पीड ब्रेकर आहेत हे सुद्धा हळूहळू स्पष्ट होत आहे. नागौर लोकसभेचे खासदार हनुमान बेनिवाल यांनी या संदर्भातच वसुंधरा राजेंवर भडास काढली आहे. त्यांन त्यांच्यावर गंभीर आरोप केलेत. ते म्हणाले, वसुंधरा राजे डुबत चाललेल्या गहलोतांचे आधार होऊन पुढे आल्यात. अल्पमताच्या सरकारचा त्या बचाव करीत असल्याचे खासदार बेनीवाल यांनी स्पष्ट केले आहे. राजस्थानच्या काँग्रेसच्या काही आमदारांनी त्यांच्यासोबत घनिष्ठता आहे. त्या आमदारांना त्यांनी गहलोत सरकारला पाठबळ असू द्या असे बजावले. सिफर व नागौर जिल्ह्यातील जाटांना व या समाजाच्या आमदारांना त्यांनी पायलटच्या सावलीत उभे राहू नका, असे स्पष्ट बजावले. काँग्रेसच्या काही आमदारांसोबत त्यांची एवढी घनिष्ठता आहे तेवढी भाजपवाल्यासोबत नसावी असे बेनीवाल म्हणाले. राजस्थान व हिंदुस्थान, वसुंधरा व गहलोत यांचि आंतरिक गठजोड समजून गेले. आतापर्यंत नूरा कुस्तीच होत गेली असेही सर्वांच्या ध्यानी आले. गहलोत व वसुंधरा राजे हे दोघेही भ्रष्टाचाराने बरबटले आहेत. एकमेकांच्या भ्रष्टाचाराच्या फायली ते दाबून बसलेत असे स्पष्ट करण्यासही बेनीवाल विसरले नाहीत. आधी भाजपात करणारे बेनीवाल व वसुंधरा राजे यांचे कधी पटलेच नाही
त्यांची सहमती हवी
सचिन पायलट लटकून पडले आहेत. ते काँग्रेसमध्ये परतण्याच्या मनस्थितीत नाहीत. त्यांना भाजपात सन्मानजनक स्थान मिळेल असे वाटत नाही. भाजपचे नेते व वसुंधरा यांना समजविण्याच्या प्रयत्न करीत आहेत. राजस्थान विधानसभेत ७२ जागांमध्ये ४५ जागा वसुंधरा गटाच्या आहेत. त्या चुप्पी साधून असल्यामुळे भाजपही कोंडीत सापडला आहे. धरले की चावते अन सोडले की पळते ही भाजपची स्थिती आहे.
वसुंधरांची चुप्पी का?
भाजपचे सारे दिग्गज नेते मुख्यमंत्री अशोक गहलोत यांच्यावर बरसले असताना वसुंधरांची चुप्पी कशी? त्यांच्या चुप्पीने अनेक प्रश्न उभे झाले आहेत. भाजपही हैरान आहे. भाजपत सर्वकाही आलवेल आहे. असे समजण्याचे कारणच उरले नाही. केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंह शेखावत भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष ओम माथूर, गुलाबचंद कटारिया सर्वच गहलोत यांच्यावर बरसत आहेत. पण या सर्वांना अपवाद राजे ठरत आहेत. गहलोत व काँग्रेसबाबत त्यांनी अजूनही एक शब्द उच्चारला नाही.
पहा व प्रतिक्षा करा
वसुंधरा राजे वरिष्ट नेत्या आहेत. भाजपात त्यांचा चांगला दबदबा आहे. भाजपचे नेते राजस्थानमध्ये सक्रिय झाले आहेत. गहलोत यांच्यावर गारपीट होत आहे. पायलटचे ते समर्थनही करत आहेत. पायलटसारख्या तरुणतुर्काला पक्षात घेण्यासाठी भाजपमध्ये चिंतन सुरु आहे. भाजपचे वरिष्ठ नेते यातूनच धास्तावले आहेत. मध्यप्रदेशात ज्योतिरादित्य शिंदे व त्यांच्या समर्थकांसोबत भाजपचे जुगाड जमले पण अनेक वयोवृद्ध नेतेही पक्षात नाराज झाले. यातूनच भाजपने देखील पायलट संदर्भात थांबा व वाट पहा धोरण अवलंबले आहे. सचिन पायलट यांच्या पुढील रणनीतीवर भाजप लक्ष ठेवून आहे. भाजपला राजस्थानमध्ये शक्तिप्रदर्शनाची प्रतीक्षा आहे.